Posts

आधी केले तुकडे,आता जोडायचा आग्रह! प्रहार रविवार, दि.19 मार्च 2017

Image
प्रहार रविवार ,  दि .19 मार्च   2017     आधी केले तुकडे , आता जोडायचा आग्रह ! ' कसेल त्याची जमीन ' हे तत्त्व चांगले आहे , आकर्षक आहे यात शंका नाही . कष्ट करणाऱ्याला त्याचा पुरेसा आणि योग्य मोबदला मिळायला हवा , त्या पृष्ठभूमीवर आज त्या निर्णयाची चिकित्सा करताना नेमका हाच प्रश्न उपस्थित होत आहे , या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य आणि पुरेसा मोबदला मिळत आहे का ? त्याचे उत्तर नकारार्थी असेल तर तो दोष सर्वस्वी सरकारचा आहे . सरकारच्या धोरणांमुळे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आज मरणाच्या दारात उभा झाला आहे . पूर्वी जेव्हा सिलिंग कायदा नव्हता , तेव्हा शेतकरी आत्महत्या करीत नव्हते आणि आता शेतीचे मालक झाल्यावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करीत आहेत , हे कशामुळे होत आहे याचे उत्तर सरकारने द्यावे . आज समूह शेतीचा आग्रह धरणाऱ्या सरकारने सिलिंग कायदा चुकीचा होता किंवा आहे , हे मान्य करावे . ` दुनिया गोल है ', असे म्हटले जाते , याचा अर्थ पुन्हा पुन्...