Posts

प्रहार, रविवार ,17 ऑगस्ट 2014 शेतकर्यांनी वन्यप्रान्यांची हत्या सुरु करावी का?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार ,17 ऑगस्ट 2014 शेतकर्यांनी वन्यप्रान्यांची हत्या सुरु करावी का? संकटे कधी एकट्याने येत नाही असे म्हणतात , शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. यावर्षी पावसाने ओढ दिली. जून महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस तब्बल महिनाभर उशिराने आला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या पिकांचे वेळापत्रक कोलमडले. एरवी पोळ्याच्या सुमारास हाताशी येणारी मुंग , उडीद सारखी पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. सोयाबिनचा पेरा वाढला , त्यात बोगस बियाण्यांनी शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फेरले. शेकडो हेक्टरवरील पीक अंकुरलेच नाही. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्या त्यांना पेरणीनंतर पावसाची प्रतीक्षा करावी लागली.   विदर्भात , विशेषत: पश्चिम विदर्भात तर गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. मराठवाड्यात तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 75 तालुक्यांत सरकारने द...