Posts

प्रहार, रविवार,दि.11 जानेवारी 2015 त्याग काय शेतकऱ्यांनीच करावा?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com     रविवार , दि. 11 जानेवारी 2015 त्याग काय शेतकऱ्यांनीच करावा ? रासरकारी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेत राज्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत कोणत्याही वाढीव भत्त्याची किंवा पगारवाढीची आणि पेन्शनची मागणी करणार नाही , अशी भूमिका घ्यायला हवी. तुमच्या शेजारचा शेतकरी गरिबीला कंटाळून आपल्या बायका-पोरांना उघड्यावर टाकत आत्महत्या करतो आणि तुम्ही महागाई भत्ता वाढवून मिळावा म्हणून सरकारला वेठीस धरता , हे संवेदनशील माणूसपणाचे लक्षण नक्कीच नाही. ज्याच्या खस्ताहाल तिजोरीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी कदाचित कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही कर्ज काढण्याची पाळी येऊ शकते , असे विधान केले. केंद्राने लागू केलेला सात टक्के महागाई भत्ता देण्याच्या संदर्भात कर्मचारी संघटनेने आग्रह धरला असता , मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले होते. हा महागाई भत्ता लागू करायचा झाल्यास राज्याच्या तिजोरीवर 1800 कोटींचा बोजा पडेल आणि तो सहन करण्याची आर्...