Posts

प्रहार ...तरीही माझा भारत `महान'!रविवार, दि. 24 जुलै 2016

Image
देशभक्ती हे मूल्य आहे , दैनंदिन जीवनाशी निगडीत मूल्य आहे , परंतु अलीकडील काळात हे मूल्य आपल्या जीवनातून हद्दपार होत असल्याचे दिसते . हा देश आपला असेल , नव्हे तो आपलाच देश आहे , तर या देशाला स्वच्छ , सुंदर , प्रदूषणमुक्त , अराजकमुक्त , भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे , आपल्या देशभक्तीची खरी परीक्षा तिथेच होते आणि ही जरी देशभक्तीची परीक्षा असेल , तर दुर्दैवाने आपण बहुसंख्य भारतीय त्या परीक्षेत साफ अनुत्तीर्ण होतो , ही वस्तुस्थिती आहे . देश ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नाही , माझा देश म्हटल्यावर त्या भूमीसोबत आपले एक वेगळे आत्मियतेचे नाते तयार होते . खरे तर दगड , माती , नद्या , पर्वत सगळ्याच देशांत असतात ; परंतु इतर देशांबद्दल आपल्याला आत्मियता वाटत नाही , उलट असेच दगड - मातीचे बनलेले काही देश तर आपल्यासाठी शत्रू असतात . तात्पर्य केवळ दगड - माती , नद्या , डोंगर - पर्वत यांचा मिळून बनलेला विशिष्ट आकाराचा भूभाग म्हणजे देश भलेही होत असेल ; परंतु तो आपला देश असेलच अस...