Posts

प्रहार इंडियासाठी जीवनावश्यक वस्तू नेमक्या कोणत्या? रविवार, दि.21 ऑगस्ट 2016

Image
सरकार अत्यंत चलाखीने शेतकऱ्यांचे सूक्ष्म म्हणजे लक्षात येणार नाही अशा पद्धतीने शोषण करीत आहे . इतरांना असे वाटते , की सरकारची तिजोरी केवळ शेतकऱ्यांसाठीच रिकामी होते . दरवर्षी कोणत्या ना कोणत्या पिकाची नुकसान भरपाई , दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले जाते . काही वर्षांपूर्वी म्हणजे 2007 साली देशोन्नतीच्या सततच्या रेट्यामुळे आणि आम्ही पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतल्यानंतर 72 हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर झाले ; मात्र प्रत्यक्षात त्यातील फक्त 18 हजार कोटीच देण्यात आले . त्यातही चलाखी करून 5 एकरांखालील शेतकरी अशी मेख मारल्यामुळे आत्महत्याग्रस्त विदर्भात 2 हजार कोटी रुपये तर एकही आत्महत्या नसलेल्या पश्चिम महाराष्ट्रात 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वसूल न होणाऱ्या ( एनपीए ) कर्ज खात्यात जमा करण्यात आले . म्हणजेच ती मदत एका अर्थाने बँकांना करण्यात आली . बदनाम मात्र शेतकऱ्यांना करण्यात आले . त्यामुळे सरकार शेतकऱ्यांन...