‘प्रहार’ रविवार, दि. २८ फेब्रुवारी २०२१ ‘शेतकरी जगला , तरच देश जगेल!' (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष, ‘किसान ब्रिगेड’) असे म्हणतात की, 'अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी...!' हे जाणूनच दिल्लीत लाखो शेतकरी सलग तीन महिन्यांपासून घरदार सोडून आणि लाखो ट्रॅक्टर घेऊन देशभरातल्या शेतकर्यांच्या हक्काची लढाई जेव्हा लढत आहेत, तेव्हा आपण किमान सायकल मार्च तर काढू शकतो!!! त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता 'किसान ब्रिगेड'तर्फे ३ मार्च ते १७ मार्च, अशी १४ दिवसांची सायकल यात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३ तारखेला मातृतीर्थ सिंदखेडराजाहून या सायकल यात्रेला प्रारंभ होणार आहे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा, अमरावती मार्गे अकोल्याला समारोप असा ६ जिल्ह्यांतील एकंदर ९०० कि.मी.चा प्रवास ही यात्रा करणार आहे. समाजातील प्रत्येक जण या यात्रेत सहभाग घेऊ शकतो. तुम्ही जंगलात आग लागली असताना चोचीत पाणी नेऊन टाकणार्या चिमणीची बोधकथा ऐकली असेल. ...