Posts

हे सूडचक्र की दबावतंत्र? प्रहार रविवार, दि.21 मे 2017

Image
प्रहार रविवार, दि.21 मे 2017 हे सूडचक्र की दबावतंत्र? मोदींचे राजकारण हे सूडाचे राजकारण आहे आणि म्हणूनच शिवसेनेच्या संदर्भात मोदी नेमकी कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे, कदाचित राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा समाचार घेतला जाईल, कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सेनेची मते महत्त्वाची ठरू शकतात. एकंदरीत मोदींच्या कारकिर्दीत देश किती पुढे गेला किंवा पुढे गेलाच नाही, हा वादाचा विषय ठरू शकतो, परंतु मोदींच्या राजकारणाने विरोधी पक्ष मात्र होता तिथपासून खूप मागे ढकलल्या गेला, किंवा जवळपास निर्जीव झालाय आणि सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने हीच खरी चिंतेची बाब आहे. काल-परवापर्यंत सत्तेपासून लांब असल्याने सत्त्व आणि सतीत्व टिकून राहिलेल्या भाजपला आता सत्तेची बाधा झाली आहे. अर्थात भाजप यावेळी पहिल्यांदाच केंद्राच्या सत्तेत आली असे नाही, परंतु यापूर्वी वाजपेयींच्या काळात जी सत्ता भाजपच्या वाट्याला आली होती ती आजच्या सारखी निरंकुश नव्हती. जया, ममता, जयललितांनी अटलजींना त्या त्यावेळी अक्षरश: नाचविले होते. अनेक पक्षांची आघाडी असल्यामुळे सगळ्यांच्याच मर्जी सांभाळून वाजपेयींना राज्यकारभार करा...

सध्या बिनपाण्याने सुरू आहे...! प्रहार रविवार, दि.14 मे 2017

Image
प्रहार रविवार , दि .14 मे   2017            सध्या बिनपाण्याने सुरू आहे ...! शेतकऱ्यांच्या कोणत्याच उत्पादनाला भाव नाही . तुरीची दैना तर सर्वांनाच ठाऊक आहे ; परंतु इतर उत्पादनांनाही अगदीच मातीमोल भाव दिला जात आहे . मिरची , हळद , चणा , गहू , तांदूळ असो , भाजीपाला असो , की फळफळावळ असो प्रत्येक ठिकाणी शेतकरी नागवला जात आहे . शेतकऱ्यांची ही दैना सरकारला दिसत नाही का ? नक्कीच दिसत आहे ; परंतु शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण आहे . आपल्याकडे साधारण कुणीही भेटल्यावर काय कसे काय सुरू आहे , या प्रश्नाला चांगले चालले आहे , बरे चालले आहे , असेच उत्तर देतो . अगदी शेतकरीदेखील ते कितीही संकटात असले तरी बरे चालले आहे , असेच म्हणतात . एक सकारात्मक भावना त्यातून दिसून येते , ' फिल गूड ' चा भाव निर्माण होतो . त्यामुळे सगळ्यांचाच समज असा होतो , की जेवढी सांगितली जाते तेवढी काही वाईट परिस्थिती नाही , हा एकप्रकारे सत्याचा अपलाप आहे . खरी परिस्थिती समोर यायलाच हवी आ...