आजच्या विज्ञानयुगातही लालबागचा राजा नवसाला पावतो म्हणून त्याच्या हुंडीत अक्षरश: करोडोंचे दान टाकणारे लोक कोणत्या भारताचे प्रतिनिधीत्व करतात, एकविसाव्या शतकातील की सोळाव्या शतकातील? गणेशाला बुद्धिची देवता मानली जाते, तसे असेल तर आता त्या गणेशाकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की या तुझ्या भक्तांना थोडी तरी बुद्धी दे, त्यांना सांग की पैशाचे आमिष दाखवून कोणत्याच देवाकडून कोणतेच काम केले जाऊ शकत नाही, ही सगळी शोषणवादी व्यवस्था काही स्वार्थी लोकांनी केवळ आपल्या भल्यासाठी उभी केली आहे, त्यांना हेही सांग की देवाची खरी भक्ती करायची असेल तर गरीब, अज्ञानी, पिडलेल्या, पिचलेल्या लोकांची सेवा करा, तुमच्या सारखे त्यांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्या! राज्यभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले आणि पोलिस विभागांसकट सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. ही एक विटंबनाच म्हणायला हवी की देवादिकांच्या उत्सवातच सामाजिक शांतता सर्वाधिक धोक्यात येते, सामाजिक ऐक्याचे प्रतिक वगैरे म्हणविले जाणारे उत्सवच सामाजिक शांतता ढवळून काढत असतात, यावेळी तसे काही झाले नाही याबद्दल खरे तर गणेशाचे आभा...
Comments
Post a Comment