आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com 'तुम्ही बदला अन्यथा लोक तुम्हाला बदलतील'..... मांजरीला एका कोपऱ्यात ढकलत नेले , तर शेवटी भिंतीला पाठ लागल्यावर ती उलटून हल्ला करते . आपल्या देशातील तरुणांच्या बाबतीत एक दिवस हेच होणार आहे . पिळवणूक , अडवणूक असह्य झाली , तर ही युवाशक्ती रस्त्यावर उतरेल आणि सारेच काही बदलून टाकेल . ते होण्याआधी अजूनही संधी आहे , सरकारने , प्रशासनाने आपल्यात योग्य तो बदल घडवून आणावा , अन्यथा कुणीतरी कृष्ण म्हणून नक्कीच अवतरेल . देशाच्या उद्यमशीलतेला अजगरी करांचा आणि 'लायसन्स-परमिटराज'चा विळखा पडला ...