आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !
*'प्रहार'*, रविवार दि. २८ अॉक्टोबर २०१८
*आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !*
(लेखक : *प्रकाश पोहरे*
मुख्य संपादक, दै. देशोन्नती)
(लेखक : *प्रकाश पोहरे*
मुख्य संपादक, दै. देशोन्नती)
_शेतकऱ्यांनीच कुणावरच विसंबून न राहता अंतर्मुख होऊन विचार करावा. मागच्या प्रहारमध्ये मी सांगितल्या नुसार काहीतरी वेगळी संकल्पना राबविल्याशिवाय आता केवळ शेतीमध्ये गुजारा होऊ शकत नाही हे पक्के ध्यानी धरा आणि त्याकरिता हातपाय हलवायला आजच सुरुवात करा, अन्यथा नाकातोंडात पाणी गेलेले आहेच , आता बुडायला फार वेळ लागणार नाही._
न्यूयॉर्कच्या ब्रुक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला. त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती.
त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते.
आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
१३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेला एक जुना कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?"
जॉर्डन उत्तरला "असेल १ डॉलरचा" वडील म्हणाले, "याला तू कुणाला तरी २ डॉलरला विकू शकशील का?"
"हा जर २ डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल"
जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, "मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही"
जॉर्डनने कपडा स्वछ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती, म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला.
५-६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिऱ्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून २ डॉलरला विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला.
१० -१२ दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, "जे कापड तू २ डॉलरला विकलेस त्याला १० डॉलर किम्मत येईल का रे?"
जॉर्डन म्हणाला "कसं शक्य आहे? २ डॉलर मिळताना नाकी नऊ आले"
वडील म्हणाले "प्रयत्न तरी करून बघ"
खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर 'डोनाल्ड डक' आणि 'मिकी माऊस'ची चित्रे रंगवली आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.
एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आई जवळ हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून १० डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून १० डॉलर त्याला टीप दिली.
२० डॉलर ही मोठी रक्कम होती, जवळ जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी.
जेव्हा जॉर्डनने वडिलांना २० डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेंव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कापडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, "हा कपडा तू २०० डॉलरला विकू शकशील का?"
आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले.
२-३ महिन्यानंतर सुप्रसिद्ध चित्रपट "Charlie's Angels" ची नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकांमार्फत तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली.
त्याचा निरागस चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.
आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, "Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या"
थोड्याच वेळात ते कापड त्याने ३०० डॉलरला विकलं.
तो जेंव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि ३०० डॉलर त्यांच्या हातात दिले, तेंव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "मला तुझा अभिमान आहे, तू करून दाखवलंस"
रात्री जेंव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेंव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, "बाळा, तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास?"
जॉर्डन म्हणाला, "जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो"
वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, "तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो, तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय?"
"आपण काळे-सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते"
वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.
*वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही* ? स्वतःला कमीपणा घेण्यात काहीच हित नाही.
त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल.
काही वर्षांनी *मायकेल जॉर्डन* उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.
*स्वत:वर विश्वास ठेवा।*

*सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग*
हे सगळे सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच की शेतकऱ्यांनी आता केवळ 'शेती एके शेती' करून उपजीविका करण्याचे दिवस आजकाल संपले आहेत. तुम्ही जोपर्यंत काही नवीन कल्पकता शेती करिता वापरणार नाही तोपर्यंत सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये आपला उदरनिर्वाह चालू शकत नाही हे निश्चित . कारण की परिस्थिती आता शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेली आहे . मी माझ्या मागच्या 'प्रहार'मध्येच म्हटल्याप्रमाणे शेतकरी आता "दाता म्हणून न राहता याचक झाला आहे". त्यामुळे पूर्वीप्रमाणे पिके तो घेऊ शकत नाही . कारण त्या पिकांना आता मागणी-पुरवठ्याच्या नियमानुसार अति पुरवठा झाल्यामुळे किमती मिळू शकत नाहीत . सरकार आपल्या मदतीला येईल , हा नाहीतर तो पक्ष मदतीला येईल या भ्रमामध्ये आता शेतकऱ्यांनी राहणे सोडून दिले पाहिजे, कारण *कुठलेही सरकार आले तरी जोपर्यंत उद्योगधार्जिण धोरणे बदलून शेतकरी धार्जिन धोरण किंवा देशाच्या विकासाचे खरे धोरण नजरेसमोर ठेवून काम करणारा पक्ष सत्तेत येत नाही तोपर्यंत शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत जाणार आहे .*
त्यामुळे आता शेतकऱ्यांनीच कुणावरच विसंबून न राहता अंतर्मुख होऊन विचार करावा. मागच्या 'प्रहार'मध्ये मी सांगितल्या नुसार काहीतरी वेगळी संकल्पना राबविल्याशिवाय आता केवळ शेतीमध्ये गुजारा होऊ शकत नाही हे पक्के ध्यानी धरा आणि त्याकरिता हातपाय हलवायला आजच सुरुवात करा, अन्यथा नाकातोंडात पाणी गेलेले आहेच , आता बुडायला फार वेळ लागणार नाही.

प्रकाश पोहरे
9822593921
pohareofdeshonnati@gmail.com
9822593921
pohareofdeshonnati@gmail.com
Really sir
ReplyDelete