'प्रहार' रविवार, दि.१४ जुलै २०१९
समारंभातील ध्वनीप्रदूषणामुळे
वैचारिक आदान-प्रदान थांबले....!
(लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती)
लग्न असो अथवा इतर कोणताही कार्यक्रम असो, तो ठरल्यावेळी पार कसा पडेल, शांततेने पार कसा पडेल याची काळजी आयोजकांनी घ्यायला हवी. अलीकडे तसे होत नसल्याचे दिसते. विशेषत: लग्न समारंभात अनावश्यक गोंधळच अधिक दिसून येतो. संवाद साधता येत नाही, शांततेने कुणाशी बोलता येत नाही, लग्नाची वेळ पाळली जात नाही. ध्वनीप्रदूषण हा तर मुद्दा आहेच; परंतु त्यासोबतच अपेक्षित वैचारिक देवाण-घेवाणीला जो अडथळा निर्माण होतो, तो अधिक काळजीचा विषय ठरतो.
वैचारिक आदान-प्रदानातून सामाजिक बदल होत असतात, क्रांती होत असते. नवे विचार समाजात नव्या बाबी रूजवत असतात. हे वैचारिक आदान-प्रदान वेगवेगळ्या स्तरांवर होत असते. बहुजन समाजात कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. अशा कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटत असतात, विचारांचे आदान-प्रदान होते. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचा हेतू कदाचित ½वेगवेगळा असेल; परंतु संवाद साधणे हा सामाईक भाग असतो. कार्यक्रम हे एक निमित्त असते. एखाद्याला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयरीक संबंध जुळवायचा असतो, कुणाला आपल्या उपवर मुलीकरिता योग्य मुलगा शोधायचा असतो, तर कुणाला मुलासाठी योग्य मुलगी पाहायची असते. राजकीय लोकांसाठी असे कार्यक्रम म्हणजे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम असते. अशा कार्यक्रमांतूनच राजकीय मंडळींना लोकांचा कल समजत असतो, आपल्याबद्दल आणि इतरांबद्दल म्हणजे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याबद्दल काय बरे-वाईट बोलले जात आहे याचा अदमास राजकीय पुढारी अशा कार्यक्रमांतून घेत असतात. त्यातूनच पुढे निवडणुकीचे आराखडे आकारास येतात. नातेवाईकांना आपल्या इतर नातेवाईकांची भेट घ्यायची असते, क्षेमकुशल विचारायचे असते. बायकांना आपली सुख-दु:खे इतरांसोबत शेअर करायची असतात. शेतकऱ्यांना कोणते नवीन बियाणे आले, कशाला काय
भाव मिळाला किंवा मिळणार आहे, उत्पादन आणि उत्पन्न, पीकविमा, पीककर्ज इत्यादी संदर्भात चर्चा करायची असते. काही लोकांना आपली जुनी नाती नव्याने पुनरुज्जीवित करायची असतात. बहुतेकवेळा ही सगळी कामे किंवा हा सगळा संवाद लग्नसमारंभातच होत असतो; परंतु अलीकडील काळात आणि विशेष करून बहुजन समाजातील लग्नसमारंभाचे बदलते स्वरूप पाहता हे वैचारिक आदान-प्रदान जवळपास थांबल्याचे दिसत आहे. त्यामागे मुख्य कारण अशा संवादासाठी जो निवांतपणा आणि शांतता हवी असते तीच या समारंभातून लोप पावत आहे.
पूर्वी लग्नाच्या प्रसंगी मंडपात सनईचे सूर घुमत असत. त्यातून वातावरणाचे मांगल्य अधिकच वाढायचे, कोलाहाल नसायचा, गोंधळ नसायचा. आता ही सनई आणि चौघडा जवळपास लुप्त झाला आहे. त्याची जागा ऑर्केस्ट्राने किंवा डीजेने घेतली आहे. लग्नाचा मुहूर्त हादेखील एक चिंतेचा विषय आहे. आजकाल लग्नपत्रिकेवर लग्नाचा मुहूर्त लग्न किती उशीरा लागले हे समजण्यासाठीच छापला जात असावा, अशी शंका येऊ लागली आहे. पाच-पंधरा मिनिटांचा उशीर समजून घेता येईल; परंतु दोन-दोन, तीन-तीन तास उशीरा लागणाऱ्या लग्नामुळे सगळ्यांचा खोळंबा होतो, कार्यक्रमाचाही विचका होतो. हा वेळ भरून काढण्यासाठी काही लोक गप्पागोष्टींचा, चर्चेचा आधार घेऊ पाहत असतात; परंतु वर म्हटल्याप्रमाणे अक्षरश: कर्णकर्कश्श ऑर्केस्ट्रामुळे साधे बोलणेही अशक्य होते. अगदी कानाजवळ तोंड नेऊन बोलण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला काही ऐकू येत नाही, कदाचित ऑर्केस्ट्रा उत्तम असल्याची तीच कसोटी असावी. यजमानाला कदाचित असे वाटत असेल की येणाऱ्या पाहुण्यांनी कधीच ऑर्केस्ट्रा ऐकलेला नाही, त्यांनी कधीच गाणेबजावणे पाहिलेले नाही, त्यामुळे आपल्या पाहुण्यांची ही हौस भागविण्यासाठी यजमान बिचारे असा आर्केस्ट्रा तिथे लावत असावेत. विशेष म्हणजे या आर्केस्ट्रातून वाजणाऱ्या गाण्यांचा आणि त्या प्रसंगाचा काहीही संबंध नसतो. प्रसंग कोणता, गाणी कोणती, आवाजाचा स्तर काय असावा, असा कशाकशाचा ताळमेळ नसतो. लग्नसमारंभामध्ये अगदी मंद
आवाजात पार्श्वभूमीवर संगीत आणि तेही प्रसंगाला साजेसे असेल, असे संगीत मंद आवाजात वाजत असेल तर त्याला कुणाचा आक्षेप असण्याचे तसे काहीच कारण नाही, उलट प्रसंगाचे मांगल्य त्यातून अधिकच वाढत असते; परंतु हे भान यजमानाला नसते, कदाचित ऑर्केस्ट्राच्या आवाजाचा संबंध यजमानाच्या प्रतिष्ठेशी जोडला जात असावा, त्यातून हे होत असेल; परंतु अशा प्रकारामुळे कार्यक्रमाचे मांगल्य तर प्रभावित होत असतेच, शिवाय ध्वनीप्रदूषणही होत असते. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा कार्यक्रमांना ज्या उद्देशाने लोक येत असतात तोच उद्देश मुळात बाधीत होत असतो. चर्चेसाठी, एकमेकांचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आवश्यक असलेला निवांतपणा, आवश्यक असलेली शांतताच तिथे राहत नाही. एकमेकांशी बोलणे होत नाही, बोलण्याचा प्रयत्न केला तरी एकूणच गलका इतका प्रचंड असतो की कुणाचे कुणाला काहीही ऐकू येत नाही. मोबाईल घेता येत नाही, घेतला तर त्यावर ना बोलू शकत, ना धड ऐकू शकत, एवढा आवाज ऑर्केस्ट्राचा असतो. बाब तशी साधी आहे, परंतु त्यातून सामाजिक संवादाचा धागा तुटत चालला आहे, हे मात्र गंभीरच म्हणावे लागेल. तसेही आजकालची जीवनशैली इतकी वेगवान झाली आहे की मुद्दामहून वेळ काढून कुणाशी भेटणे, बोलणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळेच अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिकच अधोरेखीत होते. त्या पृष्ठभूमीवर अशा सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या लोकांना आपापसात संवाद साधताना आपला बडेजाव विघ्न ठरू नये, याची काळजी यजमानांनी घेतली तर अधिक बरे होईल.
वर म्हटल्याप्रमाणे निव्वळ संवादातून, समन्वयातून अनेक गोष्टींचे, समस्यांचे निराकारण होऊ शकते, सामाजिक वीण अधिक घट्ट होऊ शकते, कारण अशा कार्यक्रमांत अनेक जातींचे, वर्गांचे, वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतले लोक एकत्र येत असतात, त्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांच्यात संवाद घडून येत असतो, कदाचित काही समज-गैरसमज झाले असतील तर ते दूर होऊ शकतात, त्यामुळेच अशा कार्यक्रमांचे महत्त्व मोठे ठरते. हे सगळे लक्षात घेऊन अशा कार्यक्रमांमध्ये गलका, गोंधळ, अनावश्यक मोठा आवाज टाळून लोकांमध्ये सहज संवाद प्रस्थापित होण्यास यजमानांनी थोडा हातभार लावणे गरजेचे झाले आहे. अशा कार्यक्रमांसाठी एकत्र येणाऱ्या प्रत्येकाचा वेळ तितकाच महत्त्वाचा असतो, याचेही भान यजमानांनी राखायला हवे. लोक पत्रिकेवर दिलेली वेळ पाहून आलेले असतात, त्यांचे इतर नियोजित कार्यक्रम त्या वेळेनुसार ठरविलेले असू शकतात, हेदेखील यजमानांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. लग्न असो अथवा इतर कोणताही
कार्यक्रम असो, तो ठरल्यावेळी पार कसा पडेल, शांततेने पार कसा पडेल याची काळजी आयोजकांनी घ्यायला हवी. अलीकडे तसे होत नसल्याचे दिसते. विशेषत: लग्न समारंभात अनावश्यक गोंधळच अधिक दिसून येतो. संवाद साधता येत नाही, शांततेने कुणाशी बोलता येत नाही, लग्नाची वेळ पाळली जात नाही. ध्वनीप्रदूषण हा तर मुद्दा आहेच; परंतु त्यासोबतच अपेक्षित वैचारिक देवाण-घेवाणीला जो अडथळा निर्माण होतो, तो अधिक काळजीचा विषय ठरतो. ही समस्या बहुजन समाजाच्या कार्यक्रमांमध्ये अधिक दिसते. अभिजन समाज घटकांच्या कार्यक्रमांमध्ये तुलनेत खूप अधिक शांतता दिसून येते, वाद्यांचा अनावश्यक गोंधळ नसतो, वेळेनुसार कार्यक्रम पार पाडल्या जातो, शिस्त पाळली जाते. लोकांचा एकमेकांशी संवाद होताना दिसतो. त्यातून सामाजिक वीण अधिक घट्ट होत जाते. किमान त्याकडे पाहून तरी बहुजन समाजाने काही धडा घेणे आवश्यक ठरते. आपल्या प्रतिष्ठेचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याऐवजी लोकांकडून अशा कार्यक्रमांना सामाजिक सौहार्द्राचे स्वरूप दिल्या गेले, तर ते अधिक उपयुक्त ठरेल आणि ते गरजेेचेही आहे.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments
Post a Comment