ग्रामीण तरुणांनी भानावर यावे! प्रहार रविवार, दि.11 जून 2017
प्रहार रविवार,
दि.11 जून
2017
ग्रामीण तरुणांनी
भानावर यावे!
शेतकऱ्यांचा वापर
करून राजकारण
करणारेच अधिक
आहेत. या
लोकांचे राजकारण
यशस्वी होण्यासाठी
शेतकऱ्यांच्या तरुण
पोरांनी आपले
आयुष्य का
पणाला लावायचे?
शेतकऱ्यांच्या तरुण
पोरांना नावे
ठेवण्यासाठी किंवा
त्यांना दोष
देण्यासाठी मी
सगळे सांगत
नाही, तर
त्यांनी वास्तवाचे
भान राखून
आपले आयुष्य
चांगल्या रितीने
जगावे, कष्ट
करून पैसा
कमवावा आणि
आपल्या घराचा
मजबूत आधार
त्यांनी व्हावे.
बेरोजगारी
ही
आपल्या
देशासमोरची
खूप
गंभीर
समस्या
आहे.
त्यातही
ग्रामीण
भागात
या
समस्येची
तीऋाता
अधिकच
जाणवते.
नोकरी
केंद्रित
शिक्षण
व्यवस्था
हे
त्यामागचे
एक
मुख्य
कारण
असले,
तरी
तरुणांची
विशेषत:
ग्रामीण
भागातील
तरुणांची
मानसिकता
हीदेखील
तितकीच
चिंतेची
बाब
आहे.
आज
कोणत्याही
गावात
गेलो
तरी
स्टॅन्डवरच्या हॉटेलात,
पानटपरीवर
किंवा
एखाद्या
पारावर
इतस्तत:
विखुरलेली
तरुण
मंडळी
केवळ
टाईमपास
करताना
दिसतात.
दहावी,
बारावी
किंवा
ग्रॅज्यूएट
झालेले
तरुण
ग्रामपंचायतीच्या
'राजकारणापासून ते
थेट
अमेरिकेच्या
'ट्रम्प
तात्याचे
काय
चुकते?'
असे
आपले
ज्ञान
पाजळत
असतात.
बहुतेकांचे
वयाच्या
पंचविशीत
लग्न
झालेले
असते
आणि
घरची
सगळी
जबाबदारी
सांभाळण्याची
जबाबदारी
बायको
कशीबशी
सांभाळत
असते.
शेतात
राबून
कुटुंबाला
आर्थिक
हातभार
लावण्याची
जबाबदारी
तिचीच
असते.
चार
बुके
शिकली
म्हणून
यांना
शेतात
काम
करण्याची
लाज
वाटते
आणि
दुसरीकडे
शिक्षणाच्या
आधारावर
कुठे
नोकरी
मिळण्याची
शक्यता
नसते.
अर्थात
सगळेच
तरुण
असे
असतात
असे
नाही,
परंतु
बेरोजगारी
आणि
कामाप्रती
उदासिनता
ही
बहुतांश
ग्रामीण
तरुणांची
समस्या
आहे.
त्यात
क्रिकेटसारख्या तद्दन
फालतू
खेळाने
आणि
इडियट
बॉक्सवरील
तितक्याच
भिकार
मालिकांनी
आणि
आता
भरीसभर
'व्हॉट्सअॅप'ने
या
तरुण
पिढीला
पुरते
भ्रमित
केले
आहे.
तरुण
पिढीने
एक
गोष्ट
लक्षात
घ्यायला
हवी,
की
सरकारी
नोकरीमागे
धावणे
म्हणजे
मृगजळाचा
पाठलाग
करण्यासारखे
आहे.
देशातील
बेरोजगारांची
संख्या
आणि
उपलब्ध
सरकारी
नोकऱ्या
यात
प्रचंड
तफावत
आहे.
देशातील
भिकारचोट
आणि
दूरदर्शीपणा
नसलेल्या
सरकारमुळे
खासगी
क्षेत्रातही
त्या
प्रमाणात
रोजगार
नाही
आणि
खासगी
क्षेत्रात
नोकरी
करायची
असेल
तर
नुसते
लिहिता-वाचता
येणे
पुरेसे
नाही.
काही
तरी
तांत्रिक
ज्ञान
सोबतीला
हवे,
ते
मिळविण्याची
जिद्द
फार
कमी
तरुणांमध्ये
दिसते.
घरच्या
दोन-पाच
एकरांत
माय-बाप, बायको
खपत
असते
आणि
सगळ्यांच्या
पोटापुरते
पिकवत
असते.
त्यात
आता
अन्नसुरक्षा
योजनेमुळे
पोट
भरण्याची
फारशी
भ्रांत
राहिलेली
नाही.
चार-दोन
रुपये
किलोने
मुबलक
धान्य
रेशनवर
मिळते,
त्यामुळे
पोटापाण्याची
चिंता
करण्याचे
कारणच
नसते.
सत्तरच्या
दशकात
ज्वारीचा
भाव
तीन
रुपये
किलो
होता
आणि
शेतमजुराची
मजुरी
एक
रुपया
होती.
आता
मजुरी
दोनशे
ते
चारशे
रुपये
आणि
रेशनवर
ज्वारी
नव्हे,
तर
गहूदेखील
दोन-तीन
रुपये
किलोने
मिळतो.
असे
असेल
तर
कष्ट
करायचे
कशासाठी?
त्यात
बायको
कमावती
असेल,
तर
रोजच्या
खर्चाला
'पॉकेटमनी'
हक्काने
मिळतो.
सांगायचे
तात्पर्य
ग्रामीण
भागातील
तरुणांची
अकर्मण्यता
हा
केवळ
त्यांच्यापुरता चिंतेचा
विषय
नसून
ही
इतकी
मोठी
काम
करू
शकणारी
मानवी
शक्ती
केवळ
पानटपऱ्यांवर
गुटखा
चघळण्यात
व्यर्थ
जात
असल्याने
त्यातून
देशाचेही
खूप
नुकसान
होत
आहे.
अशा
या
बेरोजगार
तरुणांचा
राजकारणी
मात्र
अतिशय
कुशलतेने
वापर
करून
घेतात.
राजकीय
नेत्यांच्या
सभांना,
आंदोलनांना
गर्दी
जमविण्याचे
काम
या
तरुणांकडून
करून
घेतले
जाते,
अर्थात
त्यासाठी
पैसे
मोजले
जातात.
असे
कार्यकर्ते
पोसणे
ही
जवळपास
प्रत्येक
नेत्याची
आज
गरज
झाली
आहे
आणि
ही
गरज
भागविण्याचे
काम
गावखेड्यातील
तरुण
करीत
असतात.
नेत्यांकडून
मिळणाऱ्या
बिदागीवर
किंवा
तुकड्यांवर
ही
तरुण
मंडळी
खूश
असतात,
त्यांचा
खर्च
परस्पर
निघत
असतो
आणि
घर
खर्च
चालविण्याची
जबाबदारी
माय-बापाने, बायकोने
घेतलेली
असते.
नेतेमंडळीच्या कृपेने
या
तरुणांना
बरेचदा
जीवाची
'मुंबई'
करण्याची
संधीदेखील
मिळत
असते.
नेत्यांचे
वाढदिवस
किंवा
अन्य
असेच
कोणते
प्रसंग
असले,
की
गावातील
मुख्य
चौकात
लागलेल्या
बॅनरवर
आपली
छबी
झळकली
की
या
तरुणांना
अगदी
धन्य
धन्य
झाल्यासारखे
वाटते.
फारसे
काही
कष्ट
न
करता
चार
पैसे
हातात
पडतात,
एखाद्या
भाऊसाहेबांचा,
दादासाहेबांचा कार्यकर्ता
म्हणून
ऐटीत
मिरवायला
मिळते
म्हटल्यावर
कष्ट
करून
पैसा
कमविण्याची
किंवा
आपल्याच
शेतात
घाम
गाळण्याची
बुद्धी
त्यांना
होईलच
कशी?
अर्थात
राजकारणी
मंडळी
या
कार्यकर्त्यांवर विनाकारण
खर्च
करीत
नसतात.
त्यांच्या
एकूण
मिळकतीपैकी
अगदीच
मामुली
खर्च
करून
या
तरुणांचा
ते
वेठबिगारासारखा वापर
करून
घेतात.
आणि
स्वत:ला
मोठ्ठा
नेता
म्हणून
`हाय
कमांड'
किंवा
श्रेष्ठीसमोर
मिरवत
असतात.
आजवर
झालेले
शेकडो
आंदोलने
याची
साक्ष
आहेत,
की
या
आंदोलनात
कोणत्याही
नेत्याला
साधे
खरचटले
नाही,
परंतु
पोलिसांच्या
लाठ्या,
प्रसंगी
गोळ्या
या
तरुणांना
खाव्या
लागल्या.
पोलिस
केसेस
या
तरुणांवर
दाखल
झाल्या,
पुढचे
आयुष्य
कोर्टाचे
हेलपाटे
घेण्यात
या
तरुणांचे
बरबाद
झाले.
आंदोलन
यशस्वी
झाले
तर
गवगवा
नेत्यांचा
होतो,
किंवा
मग
नेता
त्या
पक्षात
लाखो
करोडोची
उड्डाणे
घेतो;
मात्र
ते
आंदोलन
आपल्या
जीवाची
बाजी
लावून
नेटाने
रेटून
नेणारा
आणि
दुसऱ्या
पक्षातील
कार्यकर्त्याशी भांडणारा
कार्यकर्ता
पुढे
कुठेच
दिसत
नाही.
फार
फार
तर
कुठल्या
तरी
एखाद्या
समितीवर
एखाद्या
कार्यकर्त्याची वर्णी
लावल्या
जाते,
एखाद्याला
छोटे-मोठे
कंत्राट
मिळते,
परंतु
ते
भाग्य
फार
थोड्यांच्या
नशिबी
येते,
बाकी
सगळे
नुसते
राबवून
घेतले
जातात.
ग्रामीण
भागातील
तरुणांनी
राजकारणाचे
हे
अर्थ
किंवा
अनर्थशास्त्र
समजून
घ्यायला
हवे.
सरकारी
नोकरीच्या
किंवा
कोणत्याही
नेत्याच्या
मागे
न
लागता
आपल्या
शेतातच
राहून
श्रम
करायला
हवे,
नाविण्यपूर्ण
पद्धतीने
शेती
करायला
हवी,
आणि
त्यातील
उत्पादित
माल
स्वत:च विकायला
हवा
किंवा
प्रक्रिया
करायला
हवा.
चार
बुके
शिकलेली
असतात
त्या
ज्ञानाचा
वापर
करून
आधुनिक
शेतीचे
तंत्र
समजून
घेतले
पाहिजे,
बाजारातील
चढउताराचा
अभ्यास
करून
शेती
करायला
शिकले
पाहिजे.
शेतकऱ्यांच्या पोरांनी
आंदोलन
करू
नये,
आपल्या
न्याय्य
मागण्यांसाठी
लढू
नये,
असे
कुणी
म्हणणार
नाही;
परंतु
हा
लढा
देताना
त्या
लढ्याचे
नेतृत्व
कुणाकडे
आहे,
नेते
किती
प्रामाणिक
आहेत.
त्यांचे
बॅकग्राऊंड
काय
आहे
आणि
त्या
आंदोलनाचा
शेवट
नेमका
कशात
होणार
आहे,
याचा
विचार
अवश्य
करावा.
वर
म्हटल्याप्रमाणे या
तरुणांचा
शिडीसारखा
वापर
करीत
राजकारणात
भराभर
वर
चढणाऱ्या
नेत्यांची
या
देशात
कमतरता
नाही.
अशा
तरुणांचा
बळी
देऊन
आपला
राजकीय
स्वार्थ
साधू
पाहणाऱ्या
नेत्यांपासून
शेतकऱ्यांच्या पोरांनी
चार
हात
दूरच
राहायला
हवे.
अगदी
ताजे
उदाहरण
द्यायचे
झाल्यास
मध्यप्रदेशातील देता
येईल.
तिथे
शेतकऱ्यांनी
उग्र
आंदोलन
केले,
या
आंदोलकांना
पांगविण्यासाठी पोलिसांनी
गोळीबार
केला
आणि
पाच
शेतकरी
त्यात
मारल्या
गेले.
आता
आंदोलन
शांत
झाले
आहे,
आता
तिथे
राजकीय
नेत्यांचे
दौरे
सुरू
झाले
आहेत,
आंदोलनाचा
राजकीय
लाभ
उचलण्याचा
प्रयत्न
हे
नेतेमंडळी
करीत
आहेत,
परंतु
त्या
पाच
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे
काय?
आणि
त्या
आंदोलनात
खटले
दाखल
झालेल्यांचे
काय?
सरकारने
काही
लाखांची
मदत
त्या
कुटुंबियांना
घोषित
केली
असेलही,
परंतु
घरातला
कर्ता
माणूस
गेल्याचे
दु:ख त्या
पैशाने
भरून
निघणार
आहे
का?
त्या
माऊलीला
आपला
लेक,
त्या
बायकोला
आपला
नवरा
आणि
त्या
लेकरांना
आपला
बाप
पुन्हा
डोळ्याने
दिसणार
आहे
का?
आणि
त्यांच्या
बलिदानातून
शेवटी
साध्य
काय
झाले?
त्या
शेतकऱ्यांची
एक
तरी
मागणी
पूर्ण
झाली
का?
आजवरच्या
शेतकरी
आंदोलनाचा
इतिहास
हा
असाच
शापीत
आहे,
कारण
शेतकऱ्यांना
प्रामाणिक
नेतृत्व
कधी
लाभले
नाही.
शेतकऱ्यांचा
वापर
करून
राजकारण
करणारेच
अधिक
आहेत.
या
लोकांचे
राजकारण
यशस्वी
होण्यासाठी
शेतकऱ्यांच्या तरुण
पोरांनी
आपले
आयुष्य
का
पणाला
लावायचे?
शेतकऱ्यांच्या तरुण
पोरांना
नावे
ठेवण्यासाठी
किंवा
त्यांना
दोष
देण्यासाठी
मी
सगळे
सांगत
नाही,
तर
त्यांनी
वास्तवाचे
भान
राखून
आपले
आयुष्य
चांगल्या
रितीने
जगावे,
कष्ट
करून
पैसा
कमवावा
आणि
आपल्या
घराचा
मजबूत
आधार
त्यांनी
व्हावे,
हक्कासाठी
जरूर
लढावे.
या
पोटतिडकीतून
हे
मी
सांगत
आहे.
फुकट
मिळणाऱ्या
पैशाची
किंमत
वाटत
नाही
आणि
विनासायास
मिळणारा
पैसा
मनुष्याला
व्यसनाधिन
बनवतो.
आपले
आयुष्य
फक्त
आपले
नसते,
आपले
माय-बाप, आपली
बायको,
लेकरे
या
सगळ्यांशी
आपण
बांधलेले
असतो,
आपले
काही
बरेवाईट
झाले,
आपण
आयुष्यात
खंबीरपणे
उभे
राहू
शकलो
नाही
तर
त्याची
किंमत
या
सगळ्यांनाच
मोजावी
लागते,
त्यांचा
कोणताही
दोष
नसताना,
हे
शेतकरी
तरुणांनी
खासकरून
लक्षात
घ्यायला
हवे.
आपल्या
शेतात
कष्ट
करा,
ती
काळी
आई
तुम्हाला
उपाशी
नक्कीच
झोपू
देणार
नाही
आणि
थोडे
व्यवस्थापकीय,
अर्थशास्त्रीय कौशल्य
वापरले
तर
ती
तुमच्या
पदरात
अगदी
भरभरून
दान
टाकेल,
आणि
हक्कासाठी
जर
एकत्रित
येऊन
लढले
तर
महासत्ताही
तुमच्या
समोर
झुकतील,
यावर
विश्वास
ठेवा.
फेसबुकवर
प्रहार
वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर
भेट
देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप
करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile
No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया
देताना
कृपया
आपले
नाव,
गाव
लिहा.

Comments
Post a Comment