प्रहार रविवार, दि.25 फेब्रुवारी 2018
`कर्म-ज्ञान; सप्ताहाचे आयोजन करा...!
गरजेचे आहे. आज आपला शेतकरी मागे आहे, आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीत जीवन जगत आहे
कारण आधुनिक जगाशी, आधुनिक विचारांशी त्याने जुळवून घेतलेले नाही. आजही रिकामा
वेळ तो पुस्तक वाचण्याऐवजी टाळ कुटण्यात, पायदळ वारी करण्यात किंवा देव-देव करण्यात
घालवतो. तुकाराम महाराज आज असते तर त्यांनी पुन्हा एकदा; बुडती हे जन पाहावेना डोळा,
म्हणून कळवळा येतसे; असेच म्हटले असते.
माझ्या मागच्या ;प्रहारवर असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, ईमेलद्वारे तुम्ही खूप
सुंदर विवेचन केल्याचे सांगितले. त्या सगळ्यांचे आभारच आहे; परंतु मला या कौतुकापेक्षा कृतिशीलता अधिक अपेक्षित
आहे. एखादा विचार ऐकल्यावर, एखादे पुस्तक वाचल्यावर खूप सुंदर अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर
पडते, ते त्या विचाराचे, पुस्तकाचे यश असले तरी ते खूप मर्यादित यश ठरते. अशा पुस्तकापासून, अशा विचारांपासून
प्रेरणा घेऊन लोक कामाला लागतात, त्या विचारांचे कृतिशील अनुसरण करतात तेव्हाच तो विचार, ते पुस्तक खऱ्या
अर्थाने यशस्वी ठरते. शेतकऱ्यांच्या संदर्भात मी जो काही विचार गेल्या दोन-तीन प्रहारमधून मांडला आहे, तो आमच्या
शेतकरी बांधवांना पटत असेल, तर त्यांनी आता त्या विचारानुसार कृतिप्रवण व्हायला हवे.
हे आम्ही पुन्हा एकदा आग्रहाने आणि निक्षून सांगत आहोत, की शेतकऱ्यांच्या मदतीला कुणीही येणार नाही. कोणतेही
सरकार, कोणताही नेता किंवा कोणतीही संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही किंवा त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न
सोडविण्यात रूचीच नाही. त्या सगळ्यांना शेतकऱ्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घ्यायचा आहे.
आजवरच्या अनुभवाने हेच सिद्ध केले आहे. त्यामुळे आता इतर कुणावर विसंबून राहण्याऐवजी शेतकऱ्यांनी स्वत:च
पुढाकार घेऊन आपले प्रश्न सोडवायला हवेत, सरकार मदतीला आले तर उत्तमच! तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र
आता थांबून चालणार नाही. शेतकऱ्यांची मुख्य समस्या त्यांना होणारे उणे उत्पन्न हीच आहे. विशेषत: रासायनिक
शेतीचा अवलंब केल्यापासून शेती व्यवसाय तोट्यातच गेला आहे. त्यावर कर्जमाफी, अनुदान वगैरे उपाय अगदीच
कुचकामी आहेत. आजवर किमान चार वेळा सरकारने कर्जमाफी दिली आहे; परंतु तरीदेखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
झालेला नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. कारण प्रश्नाच्या मुळापर्यंत कुणीच गेलेले नाही. त्या
पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनीच आता आपले कुठे चुकते आणि काय करायला हवे याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे. यासाठीच
शेतकऱ्यांनी अधिक तार्किक, अधिक बुद्धिनिष्ठ व्हायला हवे. मागच्या प्रहारनंतर थोडा सखोल तपास केल्यावर मला असे
आढळून आले, की हे सप्ताह वगैरे करणारे महाराज, बुवा त्यांच्या प्रवचनाचे दररोज पन्नास हजार ते एक लाख रुपये
घेतात. शिवाय मंडप, जेवण, महाप्रसाद, लायटिंग, बैठक व्यवस्था, व्हिडिओ शूटिंग आणि इतर खर्चाचा हिशेब धरला,
तर एक सप्ताह काही लाखांपर्यंत चुना लावून जातो. हे सगळे पैसे अर्थातच शेतकऱ्यांच्या खिशातून जात असतात. हाच
पैसा शेतकऱ्यांनी योग्य ठिकाणी खर्च केला, धार्मिक सप्ताहाऐवजी ;कर्म-ज्ञान; सप्ताहाचे आयोजन केले, तर यापेक्षा
कितीतरी कमी पैशात शेतकऱ्यांना मूलभूत आणि अतिशय गरजेचे असलेले शेतीविषयक आणि वस्तुनिष्ठ ज्ञान मिळू शकते.
मागच्या प्रहारमध्ये हा सप्ताह कसा असावा, कोणते विषय त्यात असावे याचा उल्लेख मी केलेलाच आहे. जसे, सप्ताह लावायचाच असेल, तर पहिला दिवस शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि पैसा कसा वाचेल म्हणजेच जैविक शेती कशी करावी,
याचे प्रशिक्षण, दुसरा दिवस शेतीमालावर प्रक्रिया आणि मूल्यसंवर्धन, तिसरा दिवस माती आणि तिचे आरोग्य, चौथा दिवस शेतकऱ्यांना मदत करणारे गाय, साप, कीटक यांची ओळख आणि उपयोग, पाचवा दिवस शेतकऱ्यांना छळणारे आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे कायदे, सहावा दिवस सरकारी योजना आणि त्यातील फोलपणा, सातवा दिवस शेतीचा हिशोब, उत्पादन खर्च, विमा योजना, अटी आणि नियम यांवर मार्गदर्शन असा सप्ताह ठेवा.
वर म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची खरी समस्या उणे उत्पन्न ही आहे आणि ती दूर करायची असेल तर कमी खर्चाची जैविक शेती हा एक अगदी योग्य उपाय आहे. राज्यात अनेक ठिकाणी जैविक शेतीचे यशस्वी प्रयोग केले जात आहेत.
अनेक तरुण, उच्चशिक्षित शेतकरी आपल्या शेतीत नवेनवे प्रयोग करून नफ्याची शेती करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील एक गाव तर बंगलेवाल्या शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. कायम पाचवीला पूजलेल्या दुष्काळावर जलसंधारणाच्या माध्यमातून मात करीत या गावातल्या शेतकऱ्यांनी डाळिंबाची शेती फुलविली आणि आज परिस्थिती अशी आहे, की या गावातल्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचे आपल्या शेतात फार्महाऊस आहे, अनेकांच्या दारात अगदी फॉर्च्यूनर सारख्या चार-चाकी गाड्या उभ्या आहेत. या सगळ्यांना जमले ते आपल्याला का जमू नये? आपणही परिस्थितीवर मात करू शकतो, फक्त अभ्यासाची, जिद्दीची आणि कष्टाची गरज आहे. फार दूर कशाला अगदी अकोल्याजवळच देवीदास धोत्रे, मु.विवरा, ता. पातूर, जि. अकोला, तसेच अकोला शहरापासून 8 किलोमीटर दूर असलेल्या घुसर गावातील राहुल गोपनारायण यांच्याकडे गेलो, तरी तुम्हाला तिथे चमत्कार पाहायला मिळू शकतो किंवा बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ- पिसरूळ या गावाला जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करता येऊ शकते. एखाद्या बुवा-बाबाला दोन-चार लाख रुपये देऊन त्याच्या वायफळ गप्पा ऐकण्यापेक्षा अशा यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले तर त्यातून काही तरी हाती लागेल. हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटागटाने अभ्यासदौरे आयोजित करायला हवे, त्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असेल तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. आपल्या गावात खऱ्या अर्थाने तज्ज्ञ असलेल्या शेती अभ्यासकांना आमंत्रित करून त्यांचा ज्ञान सप्ताह आयोजित करायला हवा. धार्मिक सप्ताहासाठी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अशा ज्ञान सप्ताहांना फारच कमी खर्च येईल. अशा खूप गोष्टी आहेत की ज्यांची माहिती नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आपण आता एकविसाव्या शतकात आहोत, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. हे रॉकेट सायन्सचे युग आहे. भोळसट धार्मिक कल्पना, रूढीवादी विचार, अंधश्रद्धा या सगळ्यांना आता थारा नाही. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
ग्लोबलायझेशनमुळे जग आता एका खेड्यासारखे झाले आहे. गावात पिकविले आणि गावात किंवा तालुक्यात जाऊन विकले, अशी परिस्थिती आता राहिली नाही. शेतमालाच्या भावावर थेट आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम होत असतो.
गावाची मागणी काय याला आता काहीच अर्थ राहिलेला नाही, जगाची गरज काय हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजाराचा अभ्यास करावाच लागणार आहे. नाहीतर आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या शहरांचा म्हणजे मुंंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांचा तरी किमान विचार करायला हवा. पीक नियोजन करताना जागतिक बाजारपेठेचा अभ्यास उपयुक्त ठरतो. शिवाय सरकारच्या आयात-निर्यात धोरणावरही शेतकऱ्यांचे लक्ष असायला हवे. हवामानातील बदलाची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला इतकी सगळी अद्यावत माहिती ठेवणे शक्य नाही, त्यासाठीच आपल्या परिसरातील या क्षेत्रात माहीतगार असलेल्या तज्ज्ञासोबत शेतकऱ्यांनी सातत्याने संपर्क ठेवायला हवा. आपल्या घरामध्ये असलेल्या अगदी 12वी पास मुलालासुद्धा एका साध्या अॅन्ड्रॉइड फोनवरून ही सगळी माहिती मिळू शकते. मागच्याही प्रहारमध्ये मी ही गोष्ट सांगितली आणि आताही ती सांगणे गरजेचे वाटते ती ही, की शेतकऱ्याने आपल्या प्रत्येक पैशाचा आणि प्रत्येक मिनिटाचा हिशेब ठेवायलाच हवा. आपला वेळ आणि पैसा वाया जाणार नाही, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी. ज्या कंपनीचे बियाणे आपण घेत आहोत त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्या बियाण्यांची गुणवत्ता काय आहे, आधीचे रिझल्ट कसे आहेत या सगळ्यांचा अभ्यास
शेतकऱ्यांना असायलाच हवा आणि आजकाल ही माहिती मिळविणे फारसे कठीण राहिलेले नाही. इंटरनेटच्या
महाजालात सगळे काही उपलब्ध आहे. दहा रुपये शेतीत गुंतवून पंधरा रुपये हाती येत असतील आणि त्यावर आपण
समाधानी राहत असू तर तो आपला मूर्खपणाच म्हणायला हवा. इतक्या कमी प्रॉफिट मार्जिनवर कुणीही धंदा करीत
नाही. दहा रुपये गुंतविल्यावर किमान तीस रुपयेे तरी हाती यायला हवे. गुंतवणुकीच्या प्रमाणात उत्पन्न होत नसेल तर
धंदा बंद करा किंवा धंद्याचे स्वरूप बदला, हेच पर्याय असतात. आपल्याकडे तर शेती अगदी उणे उत्पन्नावर म्हणजेच
तोट्यात केली जाते. ती नफ्याची करता येत नसेल तर शेती सोडणेच योग्य आणि शेती सोडवत नसेल तर उत्पन्न
वाढविण्याचे पर्याय शोधायलाच हवे. वर म्हटल्याप्रमाणे अनेक तरुण, धडपड्या शेतकऱ्यांनी अशा विपरीत परिस्थितीवर
कर्म आणि ज्ञानाची सांगड घालून मात केली आहे. त्यांचे आदर्श समोर ठेवायला हवे. अशा लोकांचे मार्गदर्शन आपल्या
गावात उपलब्ध करून देण्याची किंवा अशा लोकांच्या शेतीला भेट देण्याची व्यवस्था आम्ही करून द्यायला तयार आहोत.
याकरिता सूर्यकांत भारतीय- मो. नं.9921009662, लोकनाथ काळमेघ- मो. नं.9096494894, संजय रोमन- मो. नं.
9822311096 किंवा श्री. मोहने- मो. नं. 9850385196 यांच्याशी संपर्क साधू शकता. याच खरिपाच्या हंगामापासून
शेतकऱ्यांनी ज्ञानवादी बदलाचा स्वीकार करावा. चांगले विचार, चांगल्या कल्पना केवळ डोक्यात भरून चालत नाही,
त्यावर अंमल होणे गरजेचे आहे. आज आपला शेतकरी मागे आहे, आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीत जीवन जगत आहे कारण
आधुनिक जगाशी, आधुनिक विचारांशी त्याने जुळवून घेतलेले नाही. आजही रिकामा वेळ तो पुस्तक वाचण्याऐवजी टाळ
कुटण्यात, पायदळ वारी करण्यात किंवा देव-देव करण्यात घालवतो. तुकाराम महाराज आज असते तर त्यांनी पुन्हा
एकदा बुडती हे जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येतसे; असेच म्हटले असते.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments
Post a Comment