प्रहार रविवार, दि.4 मार्च 2018
लेकरांना कधीच उपाशी ठेवत नाही, तसेच शेतीचेही आहे, शेती आपल्याला कधीच मरू देणार
नाही; परंतु कष्ट, संघर्ष, जिद्द आणि हे सगळे योग्य दिशेने जाणे गरजेचे आहे. त्याला दुसरा
कोणताही पर्याय नाही.
शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत. त्यातील काही खरोखरच अगदी जीवघेण्या स्वरूपाच्या आहेत; परंतु समस्या आहेत म्हणून हातपाय गाळून बसता येणार नाही. खरे तर समस्या कठीण नसत्या तर त्या समस्याच नसत्या, म्हणजे त्या कठीण आहेत म्हणूनच समस्या आहेत आणि एक गोष्ट माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी की प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच, कधी ते थोड्या प्रयत्नाने मिळते तर कधी त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; परंतु प्रयत्न आवश्यक आहेत.
त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मनोवृत्ती बदलायला हवी. सगळ्यात आधी आपल्या समोरचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधावी. कुणी तरी मदतीला येईल, सरकार साथ देईल या आशेवर बसण्यात अर्थ नाही.
कुणी मदतीला आले तर ते चांगलेच आहे, परंतु कुणाच्या मदतीवर कायमचे विसंबून राहणे आपल्याला पंगू करून जाते. हे पंगुत्व मानसिक स्वरूपाचे असते आणि ते शारीरिक पंगुत्वापेक्षा अधिक घातक ठरते. आपण जेव्हा आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देत असतो तेव्हा आपण आपल्या कर्तृत्वहिनतेची कबुलीच देत असतो. आपल्या हक्काचे कुणी पळवत असेल तर आवाज उठवायलाच हवा, परंतु हे कशामुळे होत आहे याचाही त्याचवेळी विचार करायला हवा. उगाच उठताबसता सरकारला तसेच प.महाराष्ट्राला किंवा नशिबाला दोष देण्यात काही अर्थ नाही. प. महाराष्ट्राने आमच्या हक्काचे पाणी पळविले, प. महाराष्ट्राने आमचा विकासनिधी पळविला, अशी ओरड करण्यात काही अर्थ नाही. ते हे सगळे पळवून नेत होते तेव्हा तुमचे हात कुणी बांधले होते, शेवटी तीदेखील तुमच्या आमच्या सारखी हाडामासाचीच माणसे आहेत. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने का होईना आज तिकडच्या शेतकऱ्यांनी नेतृत्व उभे करून आपले शेतशिवार हिरवेगार केले आहे, त्यांच्या शेतात, घरात समृद्धी नांदत आहे, हे सगळे काही त्यांना आयते मिळाले नाही. त्यांच्या अपार मेहनतीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. खरे पाहिले तर विदर्भाच्या तुलनेत प. महाराष्ट्राची शेतजमीन तितकी सुपीक नाही. विदर्भातील काळ्या मातीची सर तिकडच्या जमिनीला येत नाही. इकडे अगदी चालताचालता चार दाणे फेकले तरी ते सहज तरारून वर येतात. प्रश्न जमिनीच्या सुपिकतेचा कधीच नव्हता. प्रश्न कष्टाचा, प्रश्न विचार करण्याच्या पद्धतीचा, प्रश्न जिद्दीचा होता. नेमक्या याच बाबतीत प.महाराष्ट्रातील शेतकरी आणि तेथील नेतृत्व अधिक उजवे ठरले आणि तिकडच्या भागाचा कायापालट झाला. तिकडची परिस्थिती शेतीसाठी आपल्यापेक्षा अधिक विपरीत होती, परंतु त्या विपरीत परिस्थितीवर तिकडच्या शेतकऱ्यांनी जिद्दीने मात केली. असे म्हटले जाते, की जनता जशी असेल तसे नेतृत्व जनतेला लाभते. प. महाराष्ट्रातील नेते आक्रमक, प्रभावी आणि आपल्या भागाच्या विकासासाठी वाट्टेल ते करणारे असतील तर याचा अर्थ तिकडचे लोक तसेच असतील, आपल्याकडचे नेतृत्व बोटचेपे, कुचकामी असेल तर ते आपल्या मनोवृत्तीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
सांगायचे तात्पर्य दोन हात, दोन पाय, खांद्यावरचे डोके हे एवढे भांडवल कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी पुरेसे असते, त्याचा योग्य वापर केला तर आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो, कुणाच्या मदतीची वाट पाहण्याची गरज नाही. देवाने बोलायला, विचारायला तोंड दिले आहे, वाचण्यासाठी डोळे दिले आहेत. त्याचा वापर करायचा. आपल्याला काही कळत नसेल तर थोडा नम्रपणा स्वीकारून ज्याला कळते त्याच्याकडून शिकून घ्यायचे. एक बाब कायम ध्यानात ठेवावी की पाणी थबकले, की त्याचे डबके होते, ते प्रवाही राहिले तरच शुद्ध राहते, त्यात जीवन फुलते. आपणही कायम प्रवाही असलो पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान या संतउक्तीचा आपण अगदी चुकीचा अर्थ घेतला आहे. ठेविले अनंते याचा अर्थ हातावर हात देऊन बसणे नक्कीच नाही. प्रयत्न हाच परमेश्वर असतो, त्या प्रयत्नाला कधी अपयश आले तरी खचून जायचे नाही, ते अपयश परमेश्वरी इच्छा समजायची आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे. चित्ती समाधान असायलाच हवे, परंतु हे समाधान कर्तृत्वाचे हवे, कष्टाचे हवे. त्या कष्टाचे चीज झाले,
नाही झाले हा वेगळा भाग आहे; परंतु दे रे हरी खाटल्यावरी ही वृत्ती कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. सांगायचे तात्पर्य आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी हजार वाटा चोखाळा, कोणत्या तरी वाटेवर ते मिळेलच. हातपाय गाळून बसल्याने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. आपण यशस्वी लोकांची श्रीमंती, समृद्धी पाहून स्तिमित होतो, त्यांचा हेवा करायला लागतो; परंतु ही श्रीमंती, समृद्धी एका रात्रीत आलेली नसते. त्यासाठी त्या लोकांनी किती कष्ट उपसले असतील, याची आपल्याला कल्पना नसते. आजही मुकेश अंबानी दिवसातले सोळा तास काम करतात, खरे तर त्याची काहीच गरज नाही; परंतु आपण आळस केला तर हा वैभवाचा डोलारा केव्हाही कोसळू शकतो, हे त्यांना माहीत आहे. कोणताही व्यवसाय, कोणताही धंदा अगदी सुरू केला आणि भरभराटीला आला, असे होत नाही.
सुरुवातीला सगळ्यांनाच प्रचंड संघर्ष करावा लागतो, त्यातून यश मिळते आणि पुढे हे मिळालेले यश टिकविण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवावा लागतो. शेती त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. शेती हा शेवटी एक उद्योगच आहे, त्यामुळे ती नफ्यात कशी राहील आणि तो नफा वाढत कसा जाईल, या एकाच दिशेने शेतकऱ्याने विचार करावा. नवे तंत्रज्ञान, नवी माहिती, नवे प्रयोग यांसाठी त्याने कायमच तत्पर राहायला हवे. उत्पन्न वाढविणे आणि ते स्थिर ठेवणे हे एक आव्हानच आहे. एकवेळ काही तरी करून उत्पन्न वाढविता येईल; परंतु ते स्थिर ठेवणे खूपच जिकरीचे असते. त्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो. आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, त्यातून कोणते आणि किती पीक घेणे योग्य ठरेल, खतांची मात्रा कितपत योग्य राहील, एखादेवेळी ती पडीक ठेवणे गरजेचे आहे का, हा सगळा अभ्यास शेतकऱ्यांनी करायलाच हवा. पंजाबमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध होताच तिथल्या शेतकऱ्यांनी शेतीचा कस अगदी ओरबाडून काढला, एक-दोन पिढ्या ते खपून गेले, साऱ्या देशाला पंजाबने गहू पुरविला; परंतु आता परिस्थिती अशी आली आहे की त्याच पंजाबमधील शेतजमीन मोठ्या प्रमाणात टाकाऊ होत चालली आहे. जमिनीतला कसच निघून गेला आहे, सोबतच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे पंजाबमध्ये कर्करोगाचे प्रमाण खूप अधिक वाढले आहे. शेतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसण्याचे हे फलित आहे. दोन पिढ्यांनी पाहिलेली समृद्धी तिसऱ्या पिढीत आटू लागताच, तिथल्या शेतकऱ्यांच्या पोरांचे
मानसिक आरोग्य ढासळू लागले आणि त्याचा परिणाम म्हणून पंजाबमध्ये आणि त्यातही ग्रामीण भागात नशेखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. उडता पंजाब या चित्रपटात तिथल्या परिस्थितीचे सार्थ चित्रण करण्यात आले आहे. सांगायचे तात्पर्य आपण आपल्या शेतीला काळी आई म्हणतो, तिची सेवा केल्याने येणारी समृद्धी चिरकाल टिकणारी ठरेल, तिला ओरबाडून शेवटी हाती काहीच लागणार नाही. आपली आई आपल्या लेकरांना कधीच उपाशी ठेवत नाही, तसेच शेतीचेही आहे, शेती आपल्याला कधीच मरू देणार नाही; परंतु कष्ट, संघर्ष, जिद्द आणि हे सगळे योग्य दिशेने जाणे गरजेचे आहे. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. तुमचे ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती अगदी अप टू डेट असायलाच हवी.
अधिक उत्पादन म्हणजे अधिक नफा हे सूत्रच मुळात चुकीचे आहे. मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र आहे. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की भाव पडतात आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाव वाढतात. त्यामुळे ज्या मालाला मागणी आहे तोच माल उत्पादित करणे गरजेचे आहे.
आज जगात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यात मधूमेह म्हणजेच डायबेटीस, हृदयरोग आणि कॅन्सर हे महत्त्वाचे तीन रोग आहेत; आणि या तिन्ही रोगांच्या मुळाशी विषयुक्त अन्न हेच महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे आता लोकांमध्ये विषमुक्त अन्नाचा शोध आणि मागणी सुरू झाली आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांनी इष्टापत्ती समजून समजून कामाला लागले पाहिजे. त्यामुळे कमी खर्चाची जैविक शेती करून उत्पादित मालाला चांगली किंमत मिळू शकते. तसेच अशा मालावर माफक प्रक्रिया केल्यास अतिरिक्त पैसा मिळून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने `अच्छे दिन येऊ शकतात.
फेसबूकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
संघर्षाला पर्याय नाही!
आपण आपल्या शेतीला काळी आई म्हणतो, तिची सेवा केल्याने येणारी समृद्धी चिरकाल
टिकणारी ठरेल, तिला ओरबाडून शेवटी हाती काहीच लागणार नाही. आपली आई आपल्यालेकरांना कधीच उपाशी ठेवत नाही, तसेच शेतीचेही आहे, शेती आपल्याला कधीच मरू देणार

Comments
Post a Comment