नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करा......

.
हे जग सध्या नवीन जातींमध्ये विभागल्या गेले आहे . त्या नवीन जाती म्हणजे मोबाइलवाला, टेबल पी.सी वाला , लॅपटॉपवाला , अन्द्रोइडवाला , इंटरनेटवाला , कॉम्पुटर फ्रेंडली हे जो समजून घेईल तोच पुढे जाईल . मात्र लोक अशे सुशिक्षित झाले, श्रीमंत झाले तर मग राजकारण्यांना / नोकरशाहीला हुंगणार नाही त्यामुळे मग जनसामान्यांना अशाच प्रकारे अज्ञानात खितपत ठेवणे, त्यांना आपसात भांडत ठेवणे , लाचार ठेवणे ह्यावरच तर सध्या राजकारण्यांचे जग चालले आहे.गरज आहे हि नवीन क्रांती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची .संत गाडगे बाबा सांगून गेले कि बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या ! पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा. हातावर भाकरी खा .बायाकोले लुगड कमी भावाचे घ्या पण मुलाले शाळेत घातल्या विना राहू नका .......आणि आजचा मंत्र हा आहेकी बापहो आपल्या मुलाले कॉम्पुटर आणि इंटरनेटचे शिक्षण द्या . पैसे नसतील तर घरचा टी.व्ही. विका . मोटरबाईक विका. काही दिवस अर्धपोटी रहा, कपड्यांची शान शौकीनता कमी करा पण घरी कॉम्पुटर आणि इंटरनेट असावाच , तोच व्यक्ती ह्या जगात सुशिक्षित म्हणवल्या जाईल

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017