सत्तालोलुपांची गाजर पेरणी! प्रहार रविवार, दि.19 फेबु्रवारी 2017
प्रहार रविवार, दि.19 फेबु्रवारी 2017
सत्तालोलुपांची गाजर
पेरणी!
केंद्रातील, राज्यातील
सत्तेचा वापर
करून नवनवे
सत्ताकेंद्र आपल्या
ताब्यात घेण्याचा
सपाटाच भाजपने
लावला आहे,
परंतु या
देशाच्या इतिहासाचा
त्यांना विसर
पडत आहे.
सत्तांध झालेल्या
अनेकांना या
देशातील मतदारांनी
अगदी पालापाचोळ्यासारखे बाजूला
सारले आहे.
तुमच्या पापाचे
आयुष्य पाच
वर्षांपेक्षा अधिक
असू शकत
नाही. लोक
एखाद्या नेत्याला,
पक्षाला विकासाची
अपेक्षा बाळगूनच
समर्थन देत
असतात. लोकांच्या
या अपेक्षेला
सुरूंग लावण्याचे
काम कुणी
केले तर
त्याचे राजकीय
आयुष्य संपल्यात
जमा होते.
सत्ता
आणि
संपत्ती
माणसाचे
चारित्र्य,
नीतिमत्ता
ढासळण्यासाठी
बरेचदा
कारणीभूत
ठरत
असते.
विशेषत:
या
गोष्टी
अवचित
मिळाल्या
तर
हमखास
चारित्र्यपतन
होते.
हा
न्याय
राजकीय
पक्षांनाही
लागू
होतो.
दीर्घकाळ
विरोधी
बाकांवर
काढलेल्या
भाजपला
एकाचवेळी
केंद्रात
एक
हाती
आणि
राज्यात
बहुमतात
सत्ता
मिळाली.
विजयाचा
हा
झपाटा
इतका
तीऋा
होता
की
लोकसभा,
विधानसभा
पाठोपाठ
नगरपालिका
निवडणुकीतही
भाजपला
उल्लेखनीय
यश
मिळाले;
परंतु
या
जनमताचा
योग्य
आदर
राखणे
भाजपच्या
नेत्यांना
जमले नाही.
सत्ता
त्यांच्या
डोक्यात
शिरली
आणि
सत्तेच्या
या
नशेतच
त्यांनी
ज्यांच्या
खांद्यावर
पाय
देऊन
सत्तेचे
शिखर
गाठले
त्यांनाच
खोल
दरीत
ढकलण्याचे
काम
सुरू
केले.
अटलजी,
अडवाणींच्या
काळात
भाजप
'पार्टी
विथ
डिफरन्स'
वाटत
होता,
त्यावेळी
भाजपचे
नेते
सत्तेसाठी
हपापलेले
नव्हते
आणि
म्हणूनच
सत्ता
मिळविण्यासाठी निलाजऱ्या
तडजोडी
त्यांनी
केल्या
नाहीत,
परंतु
आता
भाजपचा
चेहरा
आणि
चरित्र
बदलले
आहे.
सत्तेच्या
गुळाला
चिकटणाऱ्या
मुंगळ्यासारखी या
पक्षाची
अवस्था
झाली
आहे.
काहीही
करून
सत्ता
टिकवायची
आणि
ती
मनमानेल
तशी
राबवायची,
हेच
भाजपचे
सध्याचे
धोरण
दिसते.
सत्तेचा
गुळ
सध्या
या
पक्षाच्या
ताब्यात
असल्यामुळे
अर्थातच
हिस्सेवाटीच्या मारामाऱ्याही
याच
पक्षात
अधिक
दिसून
येत
आहेत.
प्रत्येक
जिल्ह्यात,
प्रत्येक
तालुक्यात
या
पक्षाला
गटबाजीने
पोखरले
आहे.
कुठे
आमदारांचे
त्या
भागातील
खासदारांशी
पटत
नाही
तर
कुठे
मंत्र्यांचा
आमदारांवर
विश्वास
नाही,
असेच
चित्र
सगळीकडे
दिसते.
केवळ
महाराष्ट्रातच नव्हे
तर
संपूर्ण
देशात
हीच
परिस्थिती
आहे.
उत्तरप्रदेशात तिकिटासाठी
इच्छुक
परंतु
डावलले
गेलेल्या
भाजप
कार्यकर्त्यांनी थेट
मोदी
आणि
अमित
शहांचे
पुतळे
जाळण्याचे
काम
केले.
उत्तराखंडमध्येही या
पक्षात
प्रचंड बेदिली
माजली
आहे,
कदाचित
त्यामुळे
सत्ता
हस्तगत
करण्याच्या प्रयत्नांना
सुरूंग
लागू शकतो.
मोदी,
शहांनी
आता
'काँग्रेसमुक्त देश'
हा
नारा
बाजूला
सारून
भाजप
आणि
काहीही
तडजोडी
करून
फक्त
भाजपच
या
धोरणावर
वाटचाल
सुरू
केली
आहे.
अर्थात
तशी
महत्त्वाकांक्षा ठेवण्यात
गैर
काहीही
नाही,
परंतु
हे
धोरण
राबविताना
जी
पद्धत
आणि
हतकंडे
वापरले
जात
आहेत
ते
या
देशाच्या
लोकशाही
व्यवस्थेलाच
नख
लावणारे
आहे.
अरूणाचलमध्ये
भाजपच्या
नेत्यांनी
अख्खा
सत्ताधारी
पक्षच
आपल्याकडे
खेचून
घेतला.
त्यासाठी
नक्कीच
काहीतरी
प्रलोभन
दाखविण्यात
आले
असेल
किंवा
केंद्रातील
सत्तेच्या
माध्यमातून
दडपण
आणले
असेल.
आताही
जिथे
जिथे
निवडणुका
आहेत
तिथे
तिथे
भाजपचे
नेते
केंद्रात
आमची
सत्ता
आहे,
राज्यात
आमची
सत्ता
आहे
आणि
म्हणूनच
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्येही आम्हालाच
सत्ता
द्या,
तरच
या
भागाचा
विकास
होईल
असे
सांगत
फिरत
आहेत.
हे
सभ्य
शब्दात
धमकाविणेच
आहे.
आम्हाला
निवडून
द्या,
अन्यथा
या
भागाचा
विकास
आम्ही
होऊ
देणार
नाही,
अशी
धमकीच
अप्रत्यक्षपणे दिली
जात
आहे.
ज्या
विकासाचा
दाखला
भाजपचे
नेते
देत
आहेत
त्या
विकासाची
पोलखोल
सध्या
सगळीच
माध्यमे
करीत
आहेत.
कल्याण-डोंबिवलीसाठी
6500 कोटी
देण्याचे
भरीव
आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी
2014 साली
प्रचारादरम्यान दिले
होते,
त्यातील
एक
छदामही
आतापर्यंत
मिळालेला
नाही.
इंदूमिलच्या
परिसरात
बाबासाहेब
आंबेडकरांचे
भव्य
स्मारक
उभारण्याचे
वचन
दिले
होते,
आतापर्यंत
एक
साधी
वीटदेखील
तिथे
लावल्या
गेलेली
नाही.
जिजाऊ
जन्मस्थानाच्या विकासासाठी
500 कोटी
देणार
होते,
अजून
पाच
रुपयेदेखील
मिळालेले
नाही.
अरबी
समुद्रात
शिवरायांचे
भव्य
स्मारक
उभारण्याची
घोषणा
करण्यात
आली,
पंतप्रधानांच्या हस्ते
अगदी
थाटात
जलपूजन
करण्यात
आले,
त्यानंतर
पुढे
काहीच
झालेले
नाही.
या
स्मारकासाठी
आवश्यक
ते
परवानेच
अद्याप
मिळाले
नसल्याची
बातमी
आहे.
प्रचारादरम्यानच्या आश्वासनांना
नंतर
'चुनावी
जुमले'
म्हणत
लोकांचा
विश्वासघात
करण्याचे
काम
भाजपने
केले
आहे.
शेतकऱ्यांना
सोयाबीनला
6000 /- रु.
तर
कापसाला
8000 /- रु.
ची
मागणी
फडणविसांनी
2014 साली
विरोधी
पक्ष
नेता
म्हणून
काढलेल्या
दिंडीत
केली
होती
आणि
शेतकऱ्यांच्या मालासाठी
योग्य
हमीभाव
देण्याचे
आश्वासन
शेतकरी
आत्महत्याग्रस्त विदर्भातच
नरेंद्र
मोदींनी
दिले
होते,
त्या
आश्वासनाचे
पुढे
काय
झाले
हे
वेगळे
सांगण्याची
गरज
नाही.
लोकांनी
आपल्या
हाती
सत्ता
दिली
ती
लोकांची
लूट
करण्यासाठीच,
असा
काहीसा
या
लोकांचा
समज
झालेला
दिसत
आहे.
केंद्रातील,
राज्यातील
सत्तेचा
वापर
करून
नवनवे
सत्ताकेंद्र
आपल्या
ताब्यात
घेण्याचा
सपाटाच
भाजपने
लावला
आहे,
परंतु
या
देशाच्या
इतिहासाचा
त्यांना
विसर
पडत
आहे.
सत्तांध
झालेल्या
अनेकांना
या
देशातील
मतदारांनी
अगदी
पालापाचोळ्यासारखे बाजूला
सारले
आहे.
इंदिरा
गांधींसारख्या बलाढ्य
नेत्याला
याच
सामान्य
लोकांनी
पराभवाची
धूळ
चारली
होती.
चारशेपेक्षा
अधिक
खासदारांचे
दान
भरभरून
पदरात
टाकणाऱ्या
लोकांनी
त्याच
राजीव
गांधींना
पुढच्याच
निवडणुकीत
विरोधी
बाकांवर
बसविले.
ही
लोकशाहीची
ताकद
आहे.
तुमच्या
पापाचे
आयुष्य
पाच
वर्षांपेक्षा
अधिक
असू
शकत
नाही.
लोक
एखाद्या
नेत्याला,
पक्षाला
विकासाची
अपेक्षा
बाळगूनच
समर्थन
देत
असतात.
लोकांच्या
या
अपेक्षेला
सुरूंग
लावण्याचे
काम
कुणी
केले
तर
त्याचे
राजकीय
आयुष्य
संपल्यात
जमा
होते.
गेल्या
निवडणुकीत
हा
धडा
लोकांनी
काँग्रेसला
शिकविला,
परंतु
काँग्रेसच्या
या
अनुभवातून
शहाणपण
शिकण्याचे
काम
भाजपने
केले
नसल्याचे
दिसत
आहे.
काँग्रेसने
ज्या
चुका
केल्या
त्याच
हे
लोक
करीत
आहेत,
उलट
अधिक
उर्मटपणाने
करीत
आहेत.
गेल्या
दोन-अडीच
वर्षांत
प्रचारादरम्यान दिलेले
एकही
ठोस
आश्वासन
पूर्ण
झालेले
नाही.
उलट
नोटाबंदी
सारखा
निर्णय
घेऊन
गरिबीने
आधीच
गांजलेल्या
शेतकऱ्यांची
या
सरकारने
अक्षरश:
क्रूर
चेष्टा
केली
आहे.
दरवर्षी
दहा
लाख
बेरोजगारांना
रोजगार
उपलब्ध
करून
देण्याचे
आश्वासन
या
लोकांनी
दिले
होते,
आजची
परिस्थिती
काय
आहे,
तर
नवे
रोजगार
उपलब्ध
होणे
दूरच
राहिले,
नोटाबंदीमुळे
चाळीस
लाख
लोकांचा
रोजगार
हिरावल्या
गेला.
भुकेने
कासाविस
झालेल्या
लोकांना
हे
सरकार
मेट्रो,
बुलेट
ट्रेनचे
स्वप्न
दाखवित
आहे,
हे
तर
त्या
रशियन
झारसारखेच
झाले,
'भाकरी
मिळत
नसेल
तर
केक
खा'
असे
तो
लोकांना
सांगायचा.
त्या
उर्मट
झारशाहीचा
किती
भीषण
अंत
झाला,
हे
नव्याने
सांगण्याची
गरज
नाही.
हे
सरकारदेखील
त्याच
वाटेने
निघाले
आहे.
चारही
बाजूंनी
सामान्य
लोकांची
लूट
चालली
आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या
कायम
आहेत,
नव्हे
त्या
नव्या
जोमाने
वाढत
आहेत,
बेरोजगारीचा
प्रश्न
दिवसेंदिवस
अधिकच
तीऋा
होत
आहे,
कायदा-सुव्यवस्थेची
स्थिती
अशी
आहे
की
गृहखाते
स्वत:कडेच
ठेवणाऱ्या
मुख्यमंत्र्यांच्या शहरातच
दिवसाढवळ्या
खून
पडत
आहेत,
संतप्त
नातेवाईकांचे
मोर्चे
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर
धडकत
आहेत.
सत्तेचा
आधार
घेऊन
आपल्या
गुंडशाहीला
राजाश्रय
मिळवून
देण्याचा
गोरखधंदा
सध्या
अगदी
जोरात
सुरू
आहे.
राज्यातील
अनेक
बडे
'हिस्ट्रीशिटर'
भाजपमध्ये
दाखल
झाले
आहेत.
निष्ठावान भाजपा
कार्यकर्त्यांना बाजूला
सारून
अनेक
ठिकाणी
त्यांना
उमदेवारीदेखील देण्यात
आली
आहे.
उल्हासनगरमध्ये पप्पू
कलानीचा
मुलगा
ओमी
कलानी
भाजपसोबत
आघाडी
करून
निवडणुकीच्या
रिंगणात
उतरला
आहे.
नाशिक,
पुणे,
पिंपरी-चिंचवडमधील
अनेक
नामचिन
गुंडे
भाजपमध्ये
आले
आहेत
आणि
त्यांच्या
मदतीने
निवडणुका
जिंकण्याची
रणनीती
भाजपनेते
आखत
आहेत.
भाजपचे
चरित्र
आणि
चारित्र्य
आता
पुरते
बदलले
आहे.
हा
पक्ष
आता
सर्वभक्षी
झाला
आहे,
सगळे
काही
सामावून
घेण्याच्या
वृत्तीने
या
पक्षाचा
चेहराच
विद्रूप
झाला
आहे.
पक्षाच्या
नेत्यांना
सत्तेची
नशा
चढली
आहे,
माज
आला
आहे.
परवा
नांदेडमध्ये
मराठा
आरक्षणाच्या
संदर्भात
घोषणा
देणाऱ्या
कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोटो
काढून
झाले
असतील
तर
बाजूला
व्हा,
या
शब्दात
झिडकारले,
हा
उर्मटपणा
ज्या
सत्तेच्या
ताकदीने
आला
आहे
ती
सत्ता
कोणत्याही
क्षणी
खेचल्या
जाऊ
शकते,
याचे
भान
या
लोकांनी
राखायला
हवे.
खरे
तर
भाजपला
सत्ताभ्रष्ट
करण्याची
सुरुवात
लोकांनी
केली
आहेच.
जिल्हापरिषद
आणि
महापालिका
निवडणुकीच्या
निकालानंतर
ते
स्पष्ट
होईलच.
एकवेळ
सत्ता
गेली
की
या
पक्षाचा
माज
आणि
त्यातून
आलेली
सूजदेखील
आपोआप
उतरेल,
हे
तर
होईलच,
परंतु
तोपर्यंत
हे
सरकार
राज्यातील,
देशातील
सामान्य
जनतेचे
किती
अपरिमित
नुकसान
करून
जाईल,
हा
खरा
काळजीचा
प्रश्न
आहे;
आणि
भाजपाऐवजी
जर
काँगे्रस
हाच
पर्याय
लोकांसमोर
असेल
तर
मग
खरी चिंतेची बाब
आहे.
फेसबुकवर
प्रहार
वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर
भेट
देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप
करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile
No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया
देताना
कृपया
आपले
नाव,
गाव
लिहा.

Comments
Post a Comment