प्रहार रविवार, दि.18 मार्च 2018
जगायचे कशासाठी हे सांगत असेल, तर ही ज्ञानवारी जगायचे कसे हे सांगून जाईल. ज्ञान आता केवळ कीर्तन,
प्रवचनातूनच मिळत नाही, अनेक आधुनिक साधने आता तुमच्या हाताशी आहेत. लिहिता-वाचता येणाऱ्यांचे
प्रमाण आता खूप वाढले आहे, त्यामुळे उत्तम पुस्तके, संगणक, मोबाईल या सगळ्यांच्या माध्यमातून आधुनिक
ज्ञान प्राप्त करा. तुमचे आध्यात्मिक आयुष्य जितके महत्त्वाचे तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तुमचे
भौतिक आयुष्य आहे.
`कर्म ज्ञान सप्ताहाचे आयोजन करा! या माझ्या 25 फेब्रुवारीला प्रकाशित `प्रहार'वर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी बहुतांश सकारात्मक होत्या, योग्य विचार परखडपणे मांडल्याचे अनेकांनी कळविले; परंतु काही लोकांनी मात्र त्या लेखाचा उद्देश आणि आशय समजून न घेता केवळ संधी मिळाली म्हणून टीका करण्याचा उद्योग केला. बहिष्कार वगैरेची भाषा बोलल्या गेली. खरे तर त्या लेखात मी ईश्वरभक्ती करू नये, असे कुठेच म्हटले नव्हते, फक्त ती जाणतेपणाने करावी, खरा ईश्वर कोठे आहे, कशात आहे, हे समजून घ्यावे, हीच अपेक्षा व्यक्त केली होती. अलीकडील काळात भक्तीचे अवडंबरच खूप माजविले जाते, त्यात भक्ती कमी आणि इतर गोष्टीच अधिक असतात. अशा अवडंबराचा आपल्या संतांनीही नेहमीच निषेध केला आहे; परंतु आपण संतवचनदेखील सोईनुसार स्वीकारतो, असे दिसते. अन्यथा ''नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी'' या संतवचनाचा खरा अर्थ आपण समजून घेतला असता. ''जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन'' यातील 'शहाणे करून सोडणे' म्हणजे नेमके काय याची चिकित्सा आपण
नक्कीच केली असती. ईश्वरभक्तीवर कुणाचा आक्षेप असण्याचे कारणच नाही; परंतु या भक्तीचा आणि अध्यात्माचा ज्यांनी बाजार मांडला आहे, त्यांच्या कच्छपी लागणे नक्कीच चुकीचे आहे. त्याच लेखात मी एक संतवचन उद्धृत केले होते,
''देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या'' असे आपल्याच संतांनी म्हटलेले आहे, या संतवचनाचा अर्थ काय होतो? या वचनातून संतांनी भक्तीच्या अवडंबराचा निषेधच केलेला नाही का? परंतु बुद्धिची, विवेकाची कवाडे बंद असलेल्यांना किंवा झापडबंद विचार करण्याची सवय लागलेल्यांना कोणताही वेगळा विचार पचविणे जड जाते, त्यातूनच मग काहीतरी वेगळे अर्थ काढून निषेध, बहिष्काराची भाषा केली जाते. ज्यातून हाती काहीच लागत नाही त्यावर हजारोंची उधळण करण्यापेक्षा तोच पैसा खऱ्या ज्ञानाच्या संपादनासाठी वापरावा, या आवाहनात गैर काय आहे?
कथा, प्रवचने, सप्ताह वगैरे करणारे लोक निखळ धंदेवाईक असतात. पैसा घेऊन किंवा उकळून ते भ्रामक ज्ञानाचा प्रसार करतात, जो कधीच कुणी पाहिला नाही, त्या मोक्षाची महती सांगणाऱ्या या लोकांचा कीर्तन, प्रवचनाचा दर पाहिला तर मोक्षाची खरी महती यांनाच समजावून सांगण्याची गरज आहे, असेच दिसते. अनेक बुवा, महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या कीर्तन-प्रवचनासाठी अक्षरश: हजारो रुपयांची बिदागी मागतात. हजारो रुपये घेऊन हे लोकांना देतात तरी काय? त्यांच्या कीर्तन-प्रवचनाचा तसूभरही परिणाम झाला असता तर आज गुन्हेगारीचे प्रमाण खूप खाली आले असते, भ्रष्टाचार खूप कमी झाला असता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या, व्यसनी लोकांचे प्रमाण घटले असते; परंतु यापैकी काहीही झालेले दिसत नाही. झाले असेल तर एवढेच की ही सगळी महाराज मंडळी आणि त्यांचे मठ श्रीमंत झाले. इंदोरीकर महाराज नावाचे एक मोठे प्रस्थ आहे. एकेका कीर्तनाचे ते पन्नास हजार घेतात म्हणे आणि त्यांनीच एका प्रवचनामध्ये(?) म्हटले आहे, की ते महिन्यातून नव्वद म्हणजे दिवसाला तीन प्रवचने करतात. हिशेबच करायचा झाल्यास हे महाराज महिन्याकाठी साधारणपणे 45 लाख कमावतात, त्याचा इन्कमटॅक्स तरी ते भरतात काय?
त्यांचे कीर्तन-प्रवचन कुणी ऐकले असेल त्याच्या हे लक्षात येईल, की त्या कीर्तन-प्रवचनात कुठलेही धार्मिक ज्ञान नसते, अध्यात्मिक चर्चा नसते आणि सामाजिक मुद्देही गांभीर्याने मांडलेले नसतात, असते ते केवळ थिल्लर किंवा उथळ मनोरंजन. विदर्भ-मराठवाड्यातील अडाणी, भोळसट शेतकऱ्यांची नाडी त्यांनी बरोबर ओळखली आहे आणि म्हणून इकडच्या भागातच त्यांच्या प्रवचनांचा सपाटा असतो, तिकडे प. महाराष्ट्रात त्यांना कुणी विचारत असेल असे वाटत नाही. मागील तो लेख लिहिताना हे असे महाराज, बुवा माझ्या डोळ्यासमोर होते. या अशा लोकांवर पैसे उधळण्याऐवजी शेतकऱ्यांनी कर्म-ज्ञान सप्ताहाचे आयोजन करावे, असे मी म्हटले तर चुकले काय? वारकरी समाजासाठी ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ अशी सगळी संतमंडळी अत्यंत पूज्य आहेत. या संतांच्या अभंगातून, ओव्यातून, भारूडातून वारकऱ्यांना ज्ञानाचे अमृतच मिळत असते; परंतु वर म्हटल्याप्रमाणे सोईनुसार स्वीकारण्याची सवय ही एकप्रकारची आत्मवंचनाच ठरते. पैसा किंवा मोबदला घेऊन कीर्तन, प्रवचन करणाऱ्यांसाठी तुकाराम महाराजांनी काय म्हटले आहे, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तुकाराम महाराज म्हणतात, ''कीर्तनाचा विकरा मातेचे गमन, भाडखाऊ धन
विटाळ तो''; म्हणजेच पैसे किंवा कुठल्याही स्वरूपाचे धन घेऊन कीर्तन करणे म्हणजे आपल्या मातेसोबतच कुकर्म करण्यासारखे ठरते. तुकोबा पुढे म्हणतात, ''जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळा लावू नये गळा'', म्हणजे जिथे आपण कीर्तन करतो तिथे धनाची अपेक्षा तर ठेवू नयेच, शिवाय तिथे अन्नदेखील सेवन करू नये. पुढे तर तुकोबा असेही म्हणतात, की ''तुका म्हणे द्रव्य घेती, देती ते दोन्ही नरका जाती'' तुकोबांची ही सगळी वचने काय सांगतात?
कीर्तन, प्रवचन हे एक प्रभावी माध्यम नक्कीच आहे; परंतु ते त्याच प्रभावीपणे आणि तितक्याच निरपेक्ष
भावनेने वापरायला हवे. उध्दव गाडेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज वाघ असो किंवा मधुकर खोडे महाराज, रामेश्वर खोडे महाराज असो, अथवा सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज असो, अशा अनेक मंडळींच्या कीर्तन-प्रवचनातून खरे प्रबोधन होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा गाडगे महाराज यांची परंपरा हे लोक खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत, तसेच ही मंडळी जमेल तसे समाजकार्य आपापल्या पध्दतीने करीत आहेत. कुणी गरीब मुलांना शिकवत आहेत, तर कुणी त्यांच्या भोजनाची सोय करीत आहेत, तर कुणी बालसंस्कार शिबिरे चालवत आहेत. वा गोरक्षणे तरी उघडली आहेत. व्यसन मुक्तीचे, ग्राम स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. बाकीच्या बहुतेक बुवा, महाराजांनी भक्ती विकण्याचा धंदाच सुरू केला आहे. आमचा विरोध या अशा धंदेवाईक आणि त्याला साथ देणाऱ्या कथित भक्तांना आहे.
खरेतर आपल्या धर्मग्रंथात, पुराणात ईश्वर हा निर्गुण, निराकार असल्याचे म्हटले आहे, मानस भक्तीला, ज्यात
कुठलाही उपचार नसतो, अवडंबर नसते, श्रेष्ठ मानले आहे; परंतु हे समजून घ्यायला हवे. निर्गुण, निराकार ईश्वराची साकार रूपात आराधना करायची असेल, त्याची भक्ती करायची असेल तर तो ईश्वर निसर्गात शोधा, तो ईश्वर कर्मात शोधा, आपल्या शेतीलाच ईश्वर माना, आपल्या नित्यकर्मालाच भक्तीचे स्वरूप द्या. इतर कुणाची तरी पोटे भरणारी अवडंबर कशाला माजवायची? पंढरीची वारी करता, तशीच ज्ञानाचीही वारी करा, जिथे मोजक्या नैसर्गिक साधनसंपत्तीतही आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन आणि उत्पन्न चांगल्याप्रकारे वाढविले आहे, तिथेही भेट द्या. पंढरीची वारी जगायचे कशासाठी हे सांगत असेल, तर ही ज्ञानवारी जगायचे कसे हे सांगून जाईल. ज्ञान आता केवळ कीर्तन, प्रवचनातूनच मिळत नाही, अनेक आधुनिक साधने आता तुमच्या हाताशी आहेत. लिहिता-वाचता येणाऱ्यांचे प्रमाण आता खूप वाढले आहे, त्यामुळे उत्तम पुस्तके, संगणक, मोबाईल या सगळ्यांच्या माध्यमातून आधुनिक ज्ञान प्राप्त करा. तुमचे आध्यात्मिक आयुष्य जितके महत्त्वाचे तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तुमचे भौतिक आयुष्य आहे. आध्यात्म तुम्हाला क्षणभर देवाच्या दारी उभे ठाकल्याने चारी मुक्ती साधण्याचे आश्वासन देत असेल, तर मग भक्तीचे अवडंबर माजविण्याचे कारणच काय? त्यापेक्षा त्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि शक्ती भौतिक आयुष्य
सुखी आणि समृद्ध करण्यासाठी सत्कारणी लावावे, असे आम्ही किंवा अन्य कुणी सांगत असतील तर त्यांचे कुठे चुकत आहे? काळ बदलत आहे, बदलत्या काळासोबत ज्ञानार्जनाची साधनेही बदलत आहेत, या आधुनिक साधनांचा वापर करून आपल्या ज्ञानाची, विवेकाची क्षितिजे विस्तारावीच लागतील. काळासोबत जे बदलले नाही, ते काळाच्या प्रवाहात गडप झाले, हा इतिहास तरी किमान लक्षात घ्यावा! संतांनीच म्हटल्याप्रमाणे,
नलगे तीर्थीचे भ्रमण।
नलगे दंडन मुंडण।
नलगे पंचांगी साधना।
तुम्ही आठवा मधुसूदना गा...।।
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
काळासोबत चालावेच लागेल!
पंढरीची वारी करता, तशीच ज्ञानाचीही वारी करा, जिथे मोजक्या नैसर्गिक साधनसंपत्तीतही आधुनिक प्रयोग
करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन आणि उत्पन्न चांगल्याप्रकारे वाढविले आहे, तिथेही भेट द्या. पंढरीची वारीजगायचे कशासाठी हे सांगत असेल, तर ही ज्ञानवारी जगायचे कसे हे सांगून जाईल. ज्ञान आता केवळ कीर्तन,

Comments
Post a Comment