प्रहार - रविवार, दि.१२ मे २०१९
कमरेचे सोडून
एका घराण्याने व्यक्तिगत सुट्टीसाठी सैन्याचा वापर केला हे गरळ ओकणे खरेतर मोदींना काहीच गरजेचे नव्हते. देशात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे बोलायला खूप विषय आहेत. खरेतर मोदींना हे त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि सल्लागारांनी सांगितले पाहिजे आणि मोदींनी ते ऐकायला हवे; मात्र जर समोरचा व्यक्ती हा आपल्या सांगण्याचा गैर अर्थ काढत असेल, तर मग समोरचा सुज्ञ मनुष्य गप्प राहणेच पसंत करतो आणि मोदींचे नेमके तेच झाले आहे...
देशामध्ये सध्या मागील जवळपास एक महिन्यापासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि आता त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. २३ मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि देशाला नवीन सरकार(बहुदा मोदी वगळून) मिळणार आहे. या निवडणुकांच्या गदारोळामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडाला आहे.
कुणी काय बोलावे आणि कुठल्या विषयावर बोलावे याला काही धरबंद राहिलेला नाही. खरे म्हणजे पंचवीस-तीस वर्षांअगोदर देशात अशी परिस्थिती नव्हती. विरोधी पक्षसुद्धा आरोप-प्रत्यारोप करताना कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत नव्हते आणि प्रचाराची एक विशिष्ट पातळी राखल्या जात होती. प्रत्येकजण स्वत:ची आणि पक्षाची आब राखून बोलत असायचा, आरोप-प्रत्यारोप करत असायचा आणि त्याचबरोबर निवडून आल्यानंतर स्वत:चा पक्ष काय करणार आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर विरोधकांचे काय चुकले हेसुद्धा सांगितले जायचे; मात्र त्याला काही एक पातळी होती. आता मात्र देशात जे काही चालू आहे ते पाहिले आणि ऐकले म्हणजे 'एनडीटीव्ही'चे रवीश कुमार म्हणतात त्याप्रमाणे "अडीच महिने कुठलाच न्यूज चॅनल पाहू नका" हेच योग्य आहे, असे वाटायला लागते.
सध्या मोदींना केवळ गांधी घराणे आणि राहुल गांधी याशिवाय बोलायला दुसरा विषय त्यांचे सहकारी किंवा सल्लागार देतच नाहीत, असे दिसते. त्यामुळे पंतप्रधानपदाची रया घालवणारे मोदी खोटे तर बोलतातच; पण दोन वेगवेगळी सत्ये एकत्र करून त्यातून सोयीचे असत्य कसे मांडायचे हेसुद्धा त्यांना अवगत झाले आहे.
काल त्यांनी केलेला आरोप- की "दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कौटुंबिक सहलीसाठी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा उपयोग केला". या आरोपाच्या चिंंध्या खुद्द निवृत्त व्हाइस ऍडमिरल विनोद पसरिचा आणि निवृत्त नौदल प्रमुख एल. रामदास यांनी केल्या आणि मोदी किती खोट बोलतात हे जगासमोर आले. त्यांनी सांगितले, की 'आयएनएस विराट'वर पंतप्रधान राजीव गांधी सपत्नीक आले होते ते अधिकृत भेटीवर आणि तेही फक्त दोन दिवसांसाठीच. त्या भेटीचा फोटोही त्यांनी प्रसृत केला आहे.
राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीच्या काळात म्हणजे १९८४ ते १९८९मध्ये पसरिचा 'आयएनएस विराट'चे प्रमुख अधिकारी होते. सर्व राजशिष्टाचार, नियमांचे पालन करूनच ही भेट झाली होती, आणि एकही विदेशी नागरिक व्यक्ती तेव्हा जहाजावर आली नव्हती.
मोदी जेव्हा असले आरोप करतात तेव्हा एकच गोष्ट स्पष्ट होते, की त्यांना वाटते कुणालाही विकत घेता येते, किंवा त्यांच्यासाठी जशी न्यायालये, निवडणूक आयोग, सीबीआय, मीडिया वाकतात तसेच सैन्यही वाकू शकेल किंवा कदाचित इतर काही लोक जसे दडपणाखाली गप्प राहतात, तसे कुणीच काही प्रतिवाद करणार नाही; मात्र मोदी हे विसरतात की ते जरी हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत तरी देशात अजूनही लोकशाहीवर विश्वास ठेवून आणि तिचा मान राखून जगणारे असंख्य लोक आहेत.
पंतप्रधानपदी पोहचलेल्या व्यक्तीने खोट्या आरोपांच्या आधारे चिखल उडवणे टाळावे एवढी समज आणि नैतिकता आता या माणसाकडून अपेक्षितच नाही; पण मीडियाच्या उपकारामुळे एक असत्य पसरले... त्यामुळे मग भलेभले लोकही नाकाने कांदे सोलत, `छे पण असे राजीव गांधींनी केले, तर ते चूकच"; वगैरे भाबडे उद्गार काढू लागले म्हणून हे लिहावेसे वाटले. इंग्रजीत आलेले लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर ते इतर भाषांतून पोहोचवायला हवे, यामुळे हे लिहिणे मला भाग पडत आहे.
एका घराण्याने व्यक्तिगत सुट्टीसाठी सैन्याचा वापर केला हे गरळ ओकणे खरेतर मोदींना काहीच गरजेचे नव्हते. देशात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे बोलायला खूप विषय आहेत. खरेतर मोदींना हे त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि सल्लागारांनी सांगितले पाहिजे आणि मोदींनी ते ऐकायला हवे; मात्र जर समोरचा व्यक्ती हा आपल्या सांगण्याचा 'गैर'अर्थ काढत असेल, तर मग समोरचा सुज्ञ मनुष्य गप्प राहणेच पसंत करतो आणि मोदींचे नेमके तेच झाले आहे. खरेतर ही तद्दन चुकीची माहिती ज्याने कुणी पंतप्रधानांकडे दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याला असे करताना आपण नौदल आणि नौदलाच्या तत्कालीन व्यक्तींचा अपमान करतो आहोत एवढे भान असायला हवे होते; मात्र टुणूक टुणूक उड्या मारणारे मोदीचाटक सध्या चाळीस पैशाला पासरी उपलब्ध आहेत. त्यामुळे विराटचा मार्ग बदलून गांधी कुटुंबीयांसाठी ती वापरली गेली, असा धादांत खोटा आरोप हलकटपणे करण्यात त्यांना लाज किंवा भीती वाटणारच नाही, कारण यापेक्षाही अधिक जहरी हलकटपणा मोदींच्या कंपूने यापूर्वी करून झाला आहेच. विराट नौका लक्षद्वीपला दहा दिवस थांबवून घेण्यात आल्याचा विनोदी आरोपही या टोळीने चालवला आहे.
राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मोदींची ही 'लावरीस कार्टी' काय वाट्टेल ते पसरवत असतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केल्यानंतर तरी मोदींनी आणि त्यांच्या अंधभक्तांनी किमान सावध होणे गरजेचे होते; मात्र सावध न होता `आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" या उक्तीप्रमाणे चेकाळून मग ते अजूनच बेतालपणे वागू लागले हे देशाचे आणि मोदींचे दुर्दैवच म्हणायला हवे.
माजी नौदलप्रमुख ऍडमिरल रामदास यांनी स्पष्ट सांगितले आहे, की विराटच काय कोणतेच नौदलाचे जहाज गांधी कुटुंबीयांच्या व्यक्तिगत वापरासाठी कुठेही वळवण्यात आले नव्हते, आणि कोणत्याही नौदलाच्या जहाजावर विदेशी नागरिक व्यक्ती कधीही आल्या नव्हत्या. जे दोन दिवस राजीव गांधी विराटवर आले होते ते कशासाठी, तर त्रिवेंद्रममधील कार्यक्रमानंतर द्वीप-विकास मंडळाची सभा जी कधी अंदमानला होते, कधी लक्षद्वीपला होते, ती त्यावेळी लक्षद्वीपला होती. त्यासाठी त्यांनी विराटमधून प्रवास केला होता, हेही माजी ऍडमिरल रामदास यांनी स्पष्ट केले. लक्षद्वीपातील बंगाराम या बेटावर सुट्टीसाठी जाण्याची राजीव गांधींची वेळ वेगळी होती. त्यात नौदलाचा संबंध कुटुंबीयांशी नव्हता.
पंतप्रधान म्हणून जी सुरक्षा देणे गरजेचे होते तेवढाच संबंध नौदलाचा होता. या सहलीचा राहाणे, जेवणे, प्रवास यांतील कुटुंबीयांचा सर्व खर्च गांधी कुटुंबीयांनीच दिला. सोनिया गांधींच्या माहेरच्या लोकांची या सहलीत उपस्थिती होतीच.
राजीव गांधींच्या घरचे सहलीला येण्यासारखे कुणीच उरले नव्हते... म्हणून ते नव्हते.
खरेतर ज्याप्रमाणे राहुल गांधींनी, "सुप्रीम कोर्टाने `चौकीदार चोर है' असे त्यांच्या निकालात म्हटले, असे मी बोलण्याच्या ओघात बोललो"; असे म्हटले आणि त्याबद्दल कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे जशी राहुल गांधी यांची उंची वाढली त्याचप्रमाणे मोदींनीसुद्धा आता ऍडमिरल रामदास यांच्या कथनानंतर दिलगिरी व्यक्त करायला हवी; मात्र ते मोदींच्या स्वभावात बसणारे नाही. खोटे बोलणे आणि दाबून खोटे बोलणे म्हणजे काय असते; त्याचे अनेक नमुने सध्या पाहायला मिळत आहेत. खरेतर खोटे बोलणे हा एक मानसिक आजार किंवा सवय आहे किंवा संस्काराचा भाग आहे; मात्र असे खोटे बोलण्याचा रोग जडलेल्या किंवा सवय पडलेल्यांचे आपण काय करणार?
खरेतर या विषयावर लिहिण्याची मला काहीच गरज नव्हती. मी काँग्रेसच्या विचारधारेचा किंवा गांधी घराण्याचा पाठीराखा आहे, असाही आरोप माझ्यावर होऊ शकतो; मात्र माझे २०१४ पूर्वीचे लेख ज्यांनी वाचले असतील त्यांना मी त्या काळात शेतकरी आत्महत्या या विषयावरून काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर किती टीका करीत होतो याची खात्री असल्याने मी हे लिहीत आहे, कारण मुद्दा हा पंतप्रधान पदाच्या गरिमेचा आहे.
पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने कसे वागले पाहिजे याचे उत्तम उदाहरण मनमोहन सिंग यांनी घालून दिलेले आहे. शेतकरी आत्महत्या या विषयावर चर्चा करण्यासाठी २००७ साली त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला २ तास ४० मिनिटे वेळ दिला होता आणि मी मांडलेल्या मुद्यांची आणि मोहन धारियाजींच्या उपोषणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन महिन्याभरात ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना जाहीर केली होती. हा ताजा इतिहास आहे. असे म्हणतात, की "युद्धात आणि प्रेमात सगळे क्षम्य असते". आता त्याला "युद्धात, प्रेमात, व्यापारात आणि राजकारणात सगळे क्षम्य असते" अशी टीप जरी जोडली, तरी पंतप्रधानपदी पोहोचलेल्या माणसाने किमान काही पथ्ये पाळली पाहिजेत असे मोदींना, भाजपाच्या वरिष्ठ धुरिणांना आणि भाजपाला मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांना सांगावेसे वाटते.
फेसबूकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com,
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
कमरेचे सोडून
डोक्याला गुंडाळू नका!
(लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती)

Comments
Post a Comment