प्रहार - रविवार, दि.१९ मे २०१९
मराठी तरुण मागे का?
`....तेव्हा मराठी तरुण कुठे असतात?
सगळ्याच जाती- धर्माचे...??";
तर भरपूर मंथन केल्यावर याचे मला सापडलेले उत्तर आहे, की... मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन, क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मश्गूल असतात, नको तिथे उसळतात.
सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मश्गूल असतात. मिरवणुका काढण्यात मश्गूल असतात. राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मश्गूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात. नाचायचे, मारामारी, फोडाफोडी करायची, दारू प्यायची, तंबाखू घोटायचा आणि "मी कुठला धंदा करू?"; याचा विचार करत बसायचे, यातच मराठी तरुण दिवस काढतो.
सगळे सुतार किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम करणारे, हे उत्तरभारतीय/राजस्थानी आहेत. आणि सगळे चांगले कारागीरच आहेत. उत्तम फर्निचर बनवतात, प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत बनवतात. दिवसभर मेहनत करतात.
'सिंगल हजेरी'... म्हणजे सकाळी नऊ ते पाच- पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा 'डबल हजेरी'....म्हणजे दिवसभराची अधिकतम मजुरी एक हजार.
या सगळ्यांचा 'म्होरक्या' जो आहे तो उत्तर भारतीय तरुण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. मोठ्या कारागीरांच्या हाताखाली पंधरा- सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. विनातक्रार दिवसभर काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण- भात आणि रात्री अकरानंतर यांच्यामधील एक शिकाऊ मुलगा सगळ्यांचे जेवण बनवतो.
या उत्तर भारतीय तरुण म्होरक्याच्या हाताखाली सत्तरेक कारागीर काम करतात....मन लावून काम करतात. कुठेही 'खळखळ' दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर आणि घर आकार घेत जाते.
तेव्हा प्रश्न पडतो... "मराठी कारागीर गेले कुठे सगळे?"
समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात.
उत्तर भारतीय नवरा- बायको आणि त्यांचे तीन मुलगे....सगळे भाजीच्या दुकानात राबत असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत सारे कुटुंब राबत असते.
तेव्हा मला प्रश्न पडतो...
"मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?"
कारण मेहनतीची तयारी नाही
आणि ही जाणीव मला माझा मुलगा घर बांधत असताना झाली.
वायरिंग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियन म्हणाला, की मेहनत खूप आहे 'कन्सिल वायरिंग' करण्यात. शिवाय 'कौशल्य'ही आहेच; पण हल्ली मराठी तरुण या कामात येतच नाहीत फारसे.
मला प्रश्न पडला
"मराठी तरुण गेले कुठे..?"
माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार- पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते.
इकडे मला प्रश्न पडतो..
"मराठी तरुण काय करतो...?"
परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही...दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही...पानवाला, हजाम बाहेरचा, हॉटेल मधला शेफ मराठी नाही तोही बाहेरचा. (ही परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे.)
माझ्या ओळखीचा एक विदर्भातील तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा- पंधरा हजार पगार होता फक्त. आणि विदर्भात त्याची 25 एकर शेती आहे; पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही...
मग अशा विदर्भात उ. भारतीय लोक जाऊन तिथली शेती भाडेपट्ट्यावर घेतात आणि त्यांची राखण करत टोमॅटो, मिरचीचा व्यवसाय वाढवतात.
अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते, आहे आणि पुढेही लागणार आहे.
"तेव्हा मराठी तरुण कुठे असतात? सगळ्याच जाती- धर्माचे...??"

सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मश्गूल असतात. मिरवणुका काढण्यात मश्गूल असतात. राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मश्गूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.
नाचायचे, मारामारी, फोडाफोडी करायची, दारू प्यायची, तंबाखू घोटायचा आणि "मी कुठला धंदा करू?"; याचा विचार करत बसायचे, यातच मराठी तरुण दिवस काढतो.
ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का?
पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते 'रिस्क' घेतात, मेहनत करतात, पंधरा- सोळा तास राब राब राबतात...
खर सांगा... विचार करून सांगा "आपल्याला ....आपल्या तरुणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??"
मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे; पण कुठे? गल्ली-बोळात टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात.
गल्लीमध्ये दादागिरी, भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात.
वाढदिवसाला फ्लेक्स लावून 'भावी' आमदार, खासदार नाहीच, तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात.
मोठ-मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात.
सणावाराला 'दादागिरी' करून वर्गणी जमा करायला आपलेच असतात.
शाळा, कॉलेजमध्ये तोडफोड करायला आपलेच असतात.
कोण म्हणतं मराठी माणसाचे अस्तित्व नाही????????
बघा अजूनही वेळ गेली नाही.
विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा.
फक्त बार- रेस्टॉरंटमध्ये 'संध्याकाळी बसून' गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या "नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाही."
सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित.
फेसबूकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com,
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
मराठी तरुण मागे का?
(लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती)

Comments
Post a Comment