Golden Days In My Life..

दोस्तांनो ,,, 
मागील 8 - 9 महिन्यात दोस्तांचा एक मस्त ग्रुप तयार झालाय ,,, सकाळी साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठणे, पाचला जॉगिंग, साडेपाच ते सात वाजेपर्यंत सूर्यनमस्कार ,योगासने आणि नंतर प्राणायाम ,,, तर कधी स्विमिंग ,,, नंतर गरमागरम काढा ,,,, संपूर्ण दोन अडीच तास तास कसे जातात कळतच नाहीत ,,, आणि सध्या मस्त गुलाबी थंडी सुरू आहे ,,,, 
नंतर नाष्टा झाला की 9 ते 1 वाजेपर्यंत माझ्या शेतातील पेरूच्या बागेतील विविध कामे किंवा कधी काकडी तर कधी पिकलेले पेरू तोडतांना जॉब satisfaction चा जो आनंद मिळतो त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही एका किलो मध्ये दोन किंवा तीनच पेरू बसतात ,,, आणि पेरू व काकडीची चव तर अशी की तुम्ही खातच राहाल कारण 100% ऑरगॅनिक ,,, पेरू तोडता तोडता झाडाची कटिंग सुरू असते ,,, तसेच पेरू तोडतांना इयर फोन लावून महत्त्वाच्या विषयावर फोन सुद्धा चालू असतात ,,,, उन्हात काम करत असल्यामुळे विटामिन डी सुद्धा मिळते ,,,, म्हणजे 4 इन वन ,,,, 
सकाळ कधी होते आणि रात्र कधी येते कळतच नाही आणि झोप ,,, अरे बेडवर पडल्यावर डोळे कधी बंद होतात कळतच नाही। 

सगळे जग कोरोनाच्या भीतीने लॉक डाऊन मधे गलीत गात्र झालेले असतांना मला मात्र मागील 8 - 9 महिने कसे गेले ते कळलेच नाही

Golden Days of life असं काहीतरी म्हणतात ते हेच एवढे मात्र मी नक्की सांगू शकतो ,,, 
ज्याला कुणाला डोके साफ करायचे आहे आणि 2-3 दिवस एन्जॉय करायचे आहे त्यांचे स्वागत आहे ,,, 

येण्यापूर्वी फोन जरूर कराल नाहीतर येऊन जाल भसकन ,,, आणि जिरवाल माझी

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017