Posts

Image
  ‘प्रहार’   रविवार, दि. २८  फेब्रुवारी २०२१ ‘शेतकरी जगला , तरच  देश जगेल!'    (लेखक :  प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष, ‘किसान ब्रिगेड’)  असे म्हणतात की, 'अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी...!' हे जाणूनच दिल्लीत लाखो शेतकरी सलग तीन महिन्यांपासून घरदार सोडून आणि लाखो ट्रॅक्टर घेऊन देशभरातल्या शेतकर्‍यांच्या हक्काची लढाई जेव्हा लढत आहेत, तेव्हा आपण किमान सायकल मार्च तर काढू शकतो!!! त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता 'किसान ब्रिगेड'तर्फे ३ मार्च ते १७ मार्च, अशी १४ दिवसांची सायकल यात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३ तारखेला मातृतीर्थ सिंदखेडराजाहून या सायकल यात्रेला प्रारंभ होणार आहे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा, अमरावती मार्गे अकोल्याला समारोप असा ६ जिल्ह्यांतील एकंदर ९०० कि.मी.चा प्रवास ही यात्रा करणार आहे. समाजातील प्रत्येक जण या यात्रेत सहभाग घेऊ शकतो.          तुम्ही जंगलात आग लागली असताना चोचीत पाणी नेऊन टाकणार्‍या चिमणीची बोधकथा ऐकली असेल. ...

‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!

Image
रविवार, दि. २१  फेब्रुवारी २०२१ (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  नैसर्गिक, विना-रसायन शेती करणारे कितीतरी प्रामाणिक शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि हाच विचार करून आम्ही मग शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आम्हाला ठाऊक आहेत, तसेच त्यांचे परिवारजनही. आता एक मोठा परिवारच तयार झालाय. रोज नवनवे लोक या मोहिमेत सामील होत चाललेत. जैविक शेती मिशन माध्यमातून त्यांची मोक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र चालू करून दिलीत. ग्राहकांनासुद्धा आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे वास्तव उमगू लागलं आहे.        आज जगाला अनेक असाध्य आजारांनी व असाध्य रोगांनी घेरले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हे असे पाचवीला पूजलेले आजार झाले आहेत, की जे एखाद्या व्यक्तीला झाले तर ते त्याच्या मृत्यूपर्यंत साथ देतात, सोबतच त्याचे सर्व अर्थकारण आणि घरातील वातावरण खराब करतात. या संदर्भात मी आपल्याला केवळ एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे, *'काय तुम्हाला अशी व्यक्ती माहिती आहे का, की जिला वर उल्लेखित कुठल्याही प्रकारचा एखादा आजार झाला आणि तिने...
Image
  ‘प्रहार’ रविवार, दि. १४ फेब्रुवारी २०२१ ‘हम दो, हमारे दो'...! (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) लोकसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, अदानी यांची नावे न घेता जे म्हटले, की 'हे सरकार 'हम दो हमारे दो' या घोषणेवर चालले आहे'; ते तंतोतंत खरे आहे. परिणाम सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. सध्या भारतामध्ये मोदी सरकारच्या अशा वागण्यामुळे अडचणीची गोष्ट निर्माण झालेली दिसते ती अशी, की जिथे लोकशाही असूनही तिचा विस्तार आणि अंमलबजावणी होण्याऐवजी तिथे लोकशाहीचा बँडबाजा वाजलाय. लोकशाहीचे विसर्जन करण्याचा मोदी सरकारचा डाव दिसतोय. भांडवलदारांच्या चरणी लोकशाही वाहून टाकली गेली आहेच. मोदी सरकारचा हा हटवादीपणा आणि शेतकर् ‍ यांना 'खलिस्तानी' म्हणणार् ‍ या त्यांच्या समर्थक टोळ्यांची टगेगिरी, गुंडगिरी आता देशाची किती अप्रतिष्ठा करणार आणि हे सगळे कोण आणि केव्हा थांबवणार? हा चिंतनाचा विषय आहे. मोदी सरकारने लोकसभेत बहुमताच्या जोरावर, खरे तर 'व्हीप'च्या माध्यमातू...

धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*

Image
*‘प्रहार’* रविवार, दि. २७ डिसेंबर २०२० *धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) _आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे, तेव्हा उठा आणि कामाला लागा._           पूर्वी शेतकरी शेतमाल घरी ठेवून असायचा आणि व्यापारी किंवा अडते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल जमा करायचे. त्या वेळेला मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त होती आणि शेतकरी बियाणे, खते, मनुष्यबळ या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणजेच शेतकरी ‘दाता’ होता आणि शहरात राहणारे ‘याचक’ होते.           *हरित क्रांती झाली...

सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...!

Image
  'प्रहार' रविवार, दि. २० डिसेंबर २०२० सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...! (लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) शेतीची झालेली दुरावस्था आणि सातत्याने शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हे सर्व पाहता आता या मुद्द्यांवर म्हणजे शेतकऱ्यांच्या संख्येनुसार शेतकरी प्रतिनिधी हे विधानसभा व विधान परिषदेत तसेच लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हे असणे आणि त्या अनुषंगाने लढा उभारणे हाच शेतकरी समस्यांवरचा अंतिम उपाय ठरणार आहे. ज्याप्रमाणे केवळ तीन टक्के असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटनेच्या, एकजुटीच्या बळावर स्वतःकरिता वेतन आयोग लागू करून घेतला त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनी या या मुद्यावर एकत्रित येऊन आपल्या हक्काचे प्रतिनिधी निवडणे आज कायमस्वरूपी तोडगा राहणार आहे; अन्यथा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे जे हाल झाले आहेत ते येणाऱ्या दिवसात सुद्धा सुरू राहतील.          राजधानी दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहचल्याचे दिसत आहे. सरकारच्या कोणत्याही चक्रव्युहात न अडकण्याची खबरदारी शेतकरी घेत आहेत. आंदोलन...

*पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार**आणि हतबल मोदी सरकार...!*

Image
    *'प्रहार'* रविवार, दि. १३ डिसेंबर २०२० *पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार* *आणि हतबल मोदी सरकार...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपवून शेती क्षेत्र कार्पोरेट क्षेत्राच्या हवाली करण्याची ही खेळी आहे. शिवाय शेतकर्‍यांना असलेले हमीभावाचे संरक्षणही काढण्याचा डाव त्यामागे आहे. वास्तविक शेती हे क्षेत्र सामायिक सूचीत समाविष्ट आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार शेती क्षेत्रासाठी नियम, कायदे करू शकतात, परंतु या नव्या कायद्याने राज्य सरकारच्या हातून शेती क्षेत्र निसटणार आहे आणि त्यावर केंद्राचे पूर्ण नियंत्रण येणार आहे. कार्पोरेट क्षेत्राला विना अडथळा शेती क्षेत्रात धुडगूस घालता यावा, यासाठीच हे केले जात आहे. या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमधील तफावत प्रकर्षाने दिसून येत आहे. पंजाबकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र आज जर काही शिकला नाही तर येणार्‍या काळात महाराष्ट्राचे निश्चितपणे फार मोठे नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे आणि गावागावात किसान ब्रिगे...

गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. ६ डिसेंबर २०२० *गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _दिल्लीश्वरांना मराठी माणूस, मराठी मुलूख सतत खूपत असतो ही ऐतिहासिक परंपरा आजही कायम आहे. गुजरातचा किंवा अन्य कोणत्याही राज्याचा विकास होत असेल तर त्यात आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु महाराष्ट्राची मुंडी पिरगाळून या विकासाचे इमले उभे होत असतील तर ती बाब निषेधार्हच म्हणायला हवी._              दिल्लीच्या सिंहासनावर बसून संपूर्ण देशावर सत्ता गाजविण्याच्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिले कडवे आव्हान दिले ते या महाराष्ट्राने, या मराठी मातीने. या मातीचा अंगभूत गुण असलेल्या शौर्याला आकार आणि दिशा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका उभारली. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाहीला एकाचवेळी टक्कर देत शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले. अख्खा देश आपल्या टाचेखाली आणणार्‍या मोगली सल्तनतला हे छोटेसे स्वराज्य शेवटपर्यंत संपविता आले नाही. *दिल्लीश्वरांना कुणी आव्हान दिलेले तेव्ह...

कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२० *कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्‍या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्‍यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे._     सध्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला *कोरोना नामक नव्या आतंकवादाने* अगदी झपाटून टाकले आहे. हा कोरोना कशामुळे होतो, माहीत नाही. म्हणजे कोरोनाबाधित...

*'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२० *'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _मतदान यंत्रामुळे आता निकाल झटपट मिळतात, व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पार पडते, बोगस मतदान होत नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते, बुथ कॅप्चरिंग हा प्रकार आता जवळपास हद्दपार झाला, असे अनेक चांगले बदल निवडणूक आयोग दाखवू शकते किंवा सांगण्यासारखे असे अनेक मुद्दे निवडणूक आयोगाकडे आहेत, परंतु ही मतदान यंत्रे आणि नंतरची मतमोजणी निर्दोष असते का, यावर मात्र अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जातात. या मतदान यंत्रात हेराफेरी करता येते, असा अनेकांचा दावा आहे. निवडणूक आयोगाने (?) हे सगळे आक्षेप मागेच फेटाळून लावले आणि यापुढे निवडणुकांसाठी मतदान यंत्रेच वापरली जातील, असे ठामपणे सांगितले. याचा अर्थ निवडणूक आयोगाचे हे मत बदलत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया यंत्राद्वारेच पार पडणार आहे आणि ही यंत्रे कशी करामत दाखवतात, हे वारंवार दिसून आले आहे._       भारतात मतदान यंत्राच्या माध्यमातून घेण्यास सुरूवात...