प्रहार, रविवार , दि. 2 मार्च, 2014, शेतकर्यांची झोळी रिकामीच......
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार , दि. 2मार्च, 2014 'शेतकर्यांचीझोळी रिकामीच;'...... केंद्रातआणि राज्यातही जोपर्यंत कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली जात नाहीतोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रती सरकारची नियत साफ नाही , असेच म्हणावे लागेल. तोपर्यंतशेतकऱ्यांच्या नावाने आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केल्या जाणाऱ्या सगळ्याच घोषणा म्हणजे`बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरणार आहे. केंद्र सरकार पाठोपाठ राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या दोन्ही अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी कुठेच दिसला नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या कोणत्याही ठोस योजना किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही घोषणा या दोन्ही अर्थसंकल्पात पाहायला मिळाल्या नाहीत. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यापूर्वीच्याही कोणत्याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही, त्यामुळे तो आता मिळेल ही अपेक्षाही तशी चुकीचीच होती. खरे तर शेतकऱ्यांसाठी काही करण्याची सरकारची नियतच नाही, तशी असती तर अनेक वायफळ खर्च टाळ...