‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!
रविवार, दि. २१ फेब्रुवारी २०२१ (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) नैसर्गिक, विना-रसायन शेती करणारे कितीतरी प्रामाणिक शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि हाच विचार करून आम्ही मग शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आम्हाला ठाऊक आहेत, तसेच त्यांचे परिवारजनही. आता एक मोठा परिवारच तयार झालाय. रोज नवनवे लोक या मोहिमेत सामील होत चाललेत. जैविक शेती मिशन माध्यमातून त्यांची मोक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र चालू करून दिलीत. ग्राहकांनासुद्धा आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे वास्तव उमगू लागलं आहे. आज जगाला अनेक असाध्य आजारांनी व असाध्य रोगांनी घेरले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हे असे पाचवीला पूजलेले आजार झाले आहेत, की जे एखाद्या व्यक्तीला झाले तर ते त्याच्या मृत्यूपर्यंत साथ देतात, सोबतच त्याचे सर्व अर्थकारण आणि घरातील वातावरण खराब करतात. या संदर्भात मी आपल्याला केवळ एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे, *'काय तुम्हाला अशी व्यक्ती माहिती आहे का, की जिला वर उल्लेखित कुठल्याही प्रकारचा एखादा आजार झाला आणि तिने...