वाट्टेल तो भाव मिळेल; फक्त संख्या व शांतता हवी! प्रहार रविवार, दि.22 ऑक्टोबर 2017
प्रहार रविवार,
दि.22 ऑक्टोबर 2017
वाट्टेल तो
भाव मिळेल;
फक्त संख्या
व शांतता
हवी!
सरकार नेहमीच
आंदोलन भडकण्याची
वाट पाहत
असते किंवा
ते भडकावे
असा हेतुपुरस्सर प्रयत्न
सरकारकडून केला
जातो. आंदोलन
हिंसक झाले,
की त्या
आंदोलनाच्या मागण्यांसकट ते
दडपून टाकणे
सोपे जाते.
सरकारच्या पोलिसांचा,
लष्कराचा आणि
ताकदीचा मुकाबला
करता येणे
शक्य नाही,
त्यामुळे कुणाच्या
तरी भडकावू
भाषणाला प्रतिसाद
देऊन तोडफोड,
जाळपोळ करण्याची
चूक कोणत्याही
आंदोलकाने करू
नये, तसे
करणे म्हणजे
सरकारच्या हाती
आयते कोलीत
देण्यासारखे ठरते.
आज
भारतात
सगळीकडे
आंदोलनाचे
पीक
आलेले
दिसत
आहे.
उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे
आंदोलन,
त्यात
राहुल
गांधी
आणि
मायावती
यांच्यातील
गाजत
असलेला
वाद
सध्या
चर्चेत
आहे.
देशभरात
कुठे
ना
कुठे
आंदोलन
सुरूच
असते;
परंतु
अशी
आंदोलने
फारशी
यशस्वी
होताना
दिसत
नाहीत,
याचे
मुख्य
कारण
अशा
बहुतेक
आंदोलनात
आंदोलनकर्ते
कायदा
हातात
घेताना
दिसतात.
लोकांनी
कायदा
हातात
घेतला
की
सरकारला
त्यांचे
आंदोलन
दडपणे
सोईचे
जाते.
नक्षलवाद
ही
सरकारसमोरची
एक
मोठी
समस्या
असली
तरी
नक्षलवाद्यांसमोरदेखील सरकार हे
एक
मोठे
आव्हान
आहे,
कारण
नक्षली
हिंसाचाराच्या माध्यमातून
आपल्या
मागण्या
मान्य
करून
घेण्याचा
प्रयत्न
करीत
असतात
आणि
सरकार
त्यांच्या
गोळीला
गोळीने
उत्तर
देऊन
नक्षली
विचार
केवळ
हिंसाचारापुरता मर्यादित
ठेवण्यात
यशस्वी
होत
असते.
नक्षल्यांच्या मूळ
मागण्यांकडे
किंवा
गरीब,
आदिवासींच्या
छळवणुकीकडे
सरकारचे
लक्ष
वेधण्यात
नक्षली
अयशस्वी
होत
आहेत,
याचे
कारणच
त्यांनी
स्वीकारलेला
हिंसेचा
मार्ग
हे
आहे.
प्रश्न कितीही
जटील
असला
आणि
संघर्ष
कितीही
मोठ्या
शक्तींशी
असला
तरी
त्यातून
मार्ग
निघू
शकतो,
हे
केवळ
भारतालाच
नव्हे
तर
जगाला
दाखवून
देणारा
महापुरूष
याच
देशात
जन्माला
आला
होता.
महात्मा
गांधींनी
हे
जगाला
दाखवून
दिले
होते
की
अहिंसा
आणि
शांततामय
मार्गाने,
परंतु
निग्रहाने
आंदोलन
रेटले
तर
शक्तीमान
सरकारलादेखील
त्यासमोर
झुकावे
लागते.
'दे
दी
तुने
आजादी
बिना
खड्ग,
बिना
ढाल,
साबरमती
के
संत
तुने
कर
दिया
कमाल'
या
काव्यपंक्तीतून गांधींजींच्या आंदोलनाचा
गौरव
तर
झालाच
आहे,
शिवाय
त्यांनी
निवडलेल्या
मार्गाची
यथार्थता
त्यातून
स्पष्ट
करण्यात
आली
आहे.
हातात
कुठलेही
शस्त्र
न
घेता,
थोडक्यात
सरकारला
आंदोलन
दडपून
टाकण्याची
कुठलीही
संधी
न
देता
आंदोलन
झाले
तरच
ते
यशस्वी
होऊ
शकते.
अगदी
अलीकडे
अण्णा
हजारेंनी
त्याच
मार्गाचा
वापर
करीत
केंद्र
सरकारला
झुकण्यास
भाग
पाडले.
अण्णांच्या
आंदोलनाला
समाजाच्या
सर्वच
स्तरातून
मोठा
प्रतिसाद
मिळाला.
सामान्य
लोक
अण्णांच्या
समर्थनार्थ
रस्त्यावर
उतरले,
कार्पोरेट
जगतातील
लोकांचाही
त्यांना
पाठिंबा
मिळाला,
चित्रपटसृष्टीतील लोकदेखील
या
आंदोलनात
प्रत्यक्ष
अथवा
अप्रत्यक्षपणे सामील
झाले.
लोकांचा
एवढा
अभूतपूर्व
प्रतिसाद
अण्णांना
लाभला
याचे
कारणच
हे
होते
की
त्यांचे
आंदोलन
अहिंसक
होते.
हातात
कोणतेही
शस्त्र
न
घेता
त्यांनी
शक्तीमान
सरकारविरूद्ध
युद्ध
छेडले
होते.
या
आंदोलनाला
हिंसक
वळण
लागले
असते
तर
सरकारला
हे
आंदोलन
चिरडून
टाकणे
सहज
शक्य
झाले
असते;
परंतु
निशस्त्र
नैतिक
ताकदीपुढे
सरकारचे
काही
चालू
शकले
नाही.
खरेतर लोकांना
रस्त्यावर
उतरण्याचे
आव्हान
करणे
सोपे
असते,
परंतु
रस्त्यावर
उतरलेल्या
लोकांना
काबूत
ठेवणे,
त्यांच्या
उत्साहाला
आणि
क्रोधाला
योग्य
वेसण
घालणे
खूप
कठीण
असते.
आंदोलनाच्या
नेतृत्वाची
इथेच
खरी
परीक्षा
होते.
बरेचदा
जमावाचे
हिंसक
होणे
ही
सहज
प्रक्रिया
ठरते
आणि
त्यानंतर
अशा
जमावाला
आवरणे
नेत्यांनाही
शक्य
होत
नाही.
जमाव
एकवेळ
हिंसक
झाला
की
पोलिस
आणि
लष्कर
सक्रिय
होते
आणि
पुढे
त्या
आंदोलनाची
पुरती
वाट
लागते.
त्यामुळे
कोणतेही
आंदोलन
यशस्वी
करायचे
असेल
किंवा
व्हायचे
असेल
तर
संख्येसोबत
शांतता
आणि
अधिक
परिणामकारक
अहिंसक
मार्ग
अवलंबणे
भाग
ठरते.
आम्ही
1993 साली
कापूस
सीमापार
आंदोलन
राबविले.
आमच्याजवळ
कोणतेही
शस्त्र
नव्हते,
हजारो
निशस्त्र,
परंतु
निग्रही
शेतकऱ्यांचे
पाठबळ
आमच्याकडे
होते,
शेतकरी
हजारोंच्या
संख्येने
कोणताही
कायदा
न
मोडता
आंदोलनात
सहभागी
झाले
होते
आणि
म्हणूनच
पोलिसांना
केवळ
बघ्याची
भूमिका
घ्यावी
लागली
होती.
पोलिसांनी
एके
ठिकाणी
केलेला
अतिरेकी
गोळीबार
वगळता
या
संपूर्ण
आंदोलनाला
कुठेही
हिंसेचे
गालबोट
लागले
नव्हते
आणि
म्हणूनच
या
आंदोलनाला
अभूतपूर्व
यश
मिळाले.
संख्या,
शांतता,
संयम
आणि
निर्धार
या
चतुसूत्रीवर
कोणत्याही
आंदोलनाची
यशस्वीता
अवलंबून
असते.
आजही
अनेक
ठिकाणी
शेतकऱ्यांवर
अन्याय
होत
आहेत,
त्यातून
शेतकऱ्यांची
आंदोलने
उभी
होत
आहेत;
परंतु
आंदोलक
शेतकऱ्यांना
योग्य
नेतृत्व
न
मिळाल्यामुळे
आंदोलनाची
दिशा
भरकटताना
दिसते,
आंदोलन
हिंसक
होते
आणि
सरकारला
ते
दडपून
टाकणे
सोईचे
जाते.
सध्या
विदर्भात
मोठ्या
प्रमाणावर
विजेचे
टॉवर्स
उभारण्याचे
काम
सुरू
आहे.
हे
टॉवर्स
शेतकऱ्यांच्या शेतात
उभे
केले
जात
आहेत
आणि
त्यासाठी
शेतकऱ्यांची
सुपिक
जमीन
हडपली
जात
आहे.
शेतातील
उभ्या
हिरव्यागार
झाडांची
कत्तल
केली
जात
आहे.
या
अन्यायाला
साथ
आहे
ती
1867 सालच्या
पोस्ट
अॅण्ड
टेलिग्राफ
कायद्याची;
हा
कायदा
अजूनही
तसाच
लागू
आहे.
या
कायद्यानुसार
शेतात
टेलिफोनचे
खंबे
उभे
करता
येतात;
अर्थात
त्यासाठी
फारशी
जागा
लागत
नाही;
परंतु
याच
कायद्याचा
आधार
घेत
खासगी
वीज
कंपन्या
आपली
मोठाली
टॉवर्स
शेतकऱ्यांच्या शेतात उभी
करत
आहेत.
अधिक खेदाची बाब
म्हणजे
आपल्या
शेजारच्या
शेतकऱ्याच्या
शेताची
अशी
धुळधाण
होत
असताना
बाजूचा
शेतकरी
आपल्याला
काय
त्याचे,
अशी
भूमिका
घेत
स्वस्थ
आहे.
ही
मानसिकता
अतिशय
दुर्दैवी
म्हणावी
लागेल.
आज
हे
संकट
त्याच्यावर
ओढवले
आहे,
उद्या
आपल्यावरही
ओढवू
शकेल,
असे
त्याला
वाटत
नाही.
शेतकऱ्यांमध्ये संघटन
नाही,
संघटन
झाले तर
त्याला
योग्य
नेतृत्व
मिळत
नाही,
त्यामुळे
शेतकऱ्यांची
आंदोलने
फसतात
आणि
सरकारचे
फावते.
आज
तुरीचे,
सोयाबिनचे,
कापसाचे
भाव
पडले;
परंतु
कुठेही
शेतकऱ्यांमध्ये आक्रोश
दिसत
नाही.
संघटनाहिन
आणि
नेतृत्वहिन
शेतकरी
सरकारच्या
जुलूमी
मोगलाईला
मूकपणे
बळी
पडत
आहे.
पेट्रोलचे
भाव
वाढले,
डिझेल
आणि
गॅसचे
वाढणार
आहेतच;
परंतु
या
जुलूमी
भाववाढीविरोधात कुणी
रस्त्यावर
उतरायला
तयार
नाहीत.
खते
मिळत
नाही
भाववाढीकरीता
पाकीटामागे
25 रुपये
खाण्याच्या
नादात
उशीरा
निर्णय
दिल्यामुळे
बी.टी. बियाणे
अजूनही
उपलब्ध
नाहीत
त्यामुळे
शेतकरी
अजूनच
परेशान
आहे.
मात्र
विद्रोह
कुठेच
नाही.
सगळा
समाज
विखुरला
आहे.
जात्यात
भरडल्या
जाणाऱ्यांना
सुपातले
हसत
आहेत,
उद्या
आपल्यावरही
तीच
वेळ
येणार
याची
त्यांना
कल्पना
नाही.
या
विखुरलेल्या
समाजाला
एकत्र
करून
एक
सशक्त
आंदोलन
उभे
करणाऱ्या
पाच
बोटांची
वज्रमुठ
तयार
करून
तिचा
प्रहार
सरकारवर
करणाऱ्या
नेतृत्वाची
आज
शेतकरी
समाजाला
नितांत
गरज
आहे.
सगळे
प्रश्न
सुटू
शकतात;
फक्त
डोळसपणे
आंदोलन
करण्याची
गरज
आहे.
सगळ्यात
महत्त्वाचे
म्हणजे
आंदोलन
अहिंसक
असायला
हवे,
कायदा
हातात
घेऊन
सरकारला
ते
आंदोलन
चिरडण्याची
संधी
मिळू
देता
कामा
नये.
शेतकऱ्यांनी
आपल्या
मागण्यासाठी
आंदोलन
करताना
हे
पथ्य
पाळायलाच
हवे,
सरळ
आपल्या
घरून
बिछाने,
दोन-चार
दिवस
पुरेल
एवढी
शिदोरी
आणि
8-10 दिवसाचा
शिधा
आटा
व
कुटूंबाला
घेऊन
यायची
आणि
रस्त्यावर
ठिय्या
मांडायची
तयारी
करुन
आंदोलनात
बसण्याची
तयारी
ठेवून
करुनच
आंदोलनात
उतरावे
कुठलीही
नारेबाजी,
घोषणा,
तोडफोड,
जाळपोळ
करण्याची
गरज
नाही.
हजारोंच्या
संख्येने
ठिय्या
आंदोलन
करायचे
आणि
सोबत
व्हिडिओ
कॅमेरे
ठेवायचे.
आपल्या
आंदोलनाचे
चित्रिकरण
करून
एक
मोठा
पुरावा
आपल्याजवळ
बाळगायचा.
आजकाल
व्हिडिओ
कॅमेरे
बरेच
स्वस्त
झाले
आहेत,
मोबाईलमध्येदेखील चित्रिकरण
होऊ
शकते.
सरकारच्या
पोलिसांना
कुठलीही
संधी
द्यायची
नाही.
आधुनिक
काळात
लेखणी
आणि
कॅमेरे
ही
अतिशय
महत्त्वाची
शस्त्रे
आहेत,
त्यांचा
वापर
करायचा.
त्यातून
कुठलीही
हिंसा
होत
नाही
आणि
आंदोलनदेखील
अतिशय
परिणामकारक
ठरते.
अशाप्रकारे
शांततामय
मार्गाने
आणि
अर्थातच
प्रचंड
संख्येन
एकत्र
येऊन
आंदोलन
केले
तर
सरकारला
झुकावेच
लागेल.
कोणताही
कायदा
हातात
न
घेतल्यामुळे
सरकारला
कोणावर
खटला
दाखल
करता
येणार
नाही,
कुणाला
तुरूंगात
डांबता
येणार
नाही
आणि
पुराव्यासाठी
चित्रिकरण
उपलब्ध
असेलच!
तात्पर्य
डोके
शांत
ठेवून
शांततामय
मार्गाने
आंदोलन
केले
तरच
ते
यशस्वी
होऊ
शकते.
सरकार
नेहमीच
आंदोलन
भडकण्याची
वाट
पाहत
असते
किंवा
ते
भडकावे
असा
हेतूपुरस्सर
प्रयत्न
सरकारकडून
केला
जातो.
आंदोलन
हिंसक
झाले
की
त्या
आंदोलनाच्या
मागण्यांसकट
आणि
नेत्यासह
ते
दडपून
टाकणे
सोपे
जाते.
सरकारच्या
पोलिसांचा,
लष्कराचा
आणि
ताकदीचा
मुकाबला
करता
येणे
शक्य
नाही,
त्यामुळे
कुणाच्या
तरी
भडकाऊ
भाषणाला
प्रतिसाद
देऊन
तोडफोड,
जाळपोळ
करण्याची
चूक
कोणत्याही
आंदोलकाने
करू
नये,
तसे
करणे
म्हणजे
सरकारच्या
हाती
आयते
कोलित
देण्यासारखे
ठरते.
त्यापेक्षा
आपल्या
गांधीबाबांनी
दाखविलेला
मार्ग
खूप
प्रशस्त
आहे.
एवढ्या
मोठ्या
ब्रिटिश
सत्तेला
त्यांनी
याच
मार्गाने
घालविले
होते,
इथे
तर
आपलेच
सरकार
आहे,
या
सरकारला
झुकविणे
फारसे
कठीण
नाही;
परंतु
भान
बाळगायला
हवे,
विवेक
जागृत
ठेवायला
हवा.
संख्या,
शांतता,
संयम
आणि
निर्धार
या
चार
गोष्टींचा
परिणामकारक
वापर
केला
तर
सगळ्या
समस्या
सहज
सुटू
शकतील!
फेसबुकवर
प्रहार
वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर
भेट
देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप
करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile
No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया
देताना
कृपया
आपले
नाव,
गाव
लिहा.

Comments
Post a Comment