मुळापासून विचार करा ! प्रहार रविवार, दि. 8 ऑक्टोबर 2017
प्रहार रविवार,
दि. 8 ऑक्टोबर 2017
मुळापासून विचार करा !
मुळापासून विचार करा !
स्वच्छता बाळगणे,
आपला परिसर
स्वच्छ ठेवणे
ही एक
प्रवृत्ती आहे.
विदेशात, युरोपीय
देशात लोकांना
स्वच्छता ठेवा
असे सांगावे
लागत नाही,
तिथे कुठेही
स्वच्छता अभियान
राबवावे लागत
नाही, कारण
स्वच्छता ठेवणे
हा त्यांच्या
स्वभावाचाच भाग
आहे. भारतात
तशी प्रवृत्ती
लोकांमध्ये नाही,
ही वस्तुस्थिती आधी
मान्य करावी
लागेल आणि
एकवेळ ही
वस्तुस्थिती मान्य
केल्यानंतर या
लोकांना ज्या
भाषेत समजते
त्याच भाषेत
सांगावे लागेल.
इथे प्रबोधन
कामाचे नाही,
इथे सेलिब्रेटींनी हातात
झाडू घेऊन
फोटोसेशन करण्याने
कोणताही आदर्श
निर्माण होणार
नाही. इथे
भाषा दंडुक्याचीच चालते.
कायदे कडक
हवेत, ते
प्रभावीपणे राबविले
गेले पाहिजे
आणि कायदा
राबविणारी यंत्रणा
प्रामाणिक असायला
पाहिजे.
एखादी
चांगली
योजना
किंवा
चांगला
विचार
अंमलबजावणी
करताना
चुकीच्या
दिशेने
गेला
तर
त्याची
कशी
फजिती
होते,
याचे
उत्तम
उदाहरण
म्हणून
मोदींनी
सुरू
केलेल्या
स्वच्छता
अभियानाचा
उल्लेख
करावा
लागेल.
परवा
गांधी
जयंतीच्या
दिवशी
बोलताना
मोदींनी
खरे
तर
आपल्या
अपयशाची
कबुली
देत
असे
म्हटले,
की
लाख
मोदी
किंवा
हजार
गांधी
आले
तरी
हे
अभियान
यशस्वी
होऊ
शकत
नाही
जोपर्यंत
देशाचा
प्रत्येक
नागरिक
या
अभियानात
सामील
होणार
नाही.
खरे
तर
सार्वजनिक
ठिकाणी
स्वच्छता
ठेवणे,
त्यासाठी
अभियान
राबविणे
वगैरे
कामे
पंतप्रधानांची नाहीतच.
पंतप्रधानांनी पंतप्रधानांचीच कामे
करावी;
परंतु
पंतप्रधान
नरेंद्र
मोदींचा
हा
अट्टाहास
दिसून
येतो,
की
सगळे
काही
मी
एकटाच
करेन
आणि
सगळ्याचे
श्रेय
मला
एकट्यालाच
मिळायला
हवे.
असे
होऊ
शकत
नाही,
एकटा
माणूस
काही
करू
शकत
नाही,
ते
अपेक्षितही
नाही,
विशेषत:
भारतासारख्या
खंडप्राय
देशात
तर
ते
शक्यच
नाही.
3 वर्षांमध्ये
मा.
नरेंद्र
मोदींना
हे
समजले
हेही
नसे
थोडके.
सरकारने
निर्णय
घेणे,
धोरणात्मक
दिशा
निश्चित
करणे,
त्या
अनुषंगाने
कायद्यात
आवश्यक
त्या
सुधारणा
करणे,
संसदेत
चर्चा
करून
एखाद्या
निर्णयाच्या
बाबतीत
किंवा
धोरणाच्या
संदर्भात
चिकित्सा
करणे
अपेक्षित
आहे.
निर्णय
घेतल्यानंतर
त्याची
अंमलबजावणी
करणाऱ्या
यंत्रणा
स्वतंत्र
असाव्यात,
त्या
आहेतही;
परंतु
मोदींचा
आग्रह
म्हणजे
निर्णय
मीच
घेणार,
झाडू
हातात
घेऊन
त्याची
अंमलबजावणीही
मीच
करणार,
मीच
माझी
टिमकी
मिरविणार,
सगळीकडे
मीच
असणार
असा
असतो.
परराष्ट्रमंत्री सुषमा
स्वराज
आहेत,
परंतु
परदेश
दौऱ्यावर
मीच
जाणार,
विविध
देशांच्या
प्रमुखांना
मीच
भेटणार,
अर्थमंत्री
अरूण
जेटली
आहेत,
परंतु
नोटाबंदी
सारखा
निर्णय
मीच
घेणार,
'जीएसटी'
मीच
आणणार,
संरक्षणमंत्री आधी
पर्रिकर
आणि
आता
निर्मला
सीतारामन
आहेत;
परंतु
संरक्षण
खात्याचे
सगळे
निर्णय
मोदी
आणि
त्यांचे
लाडके
अजित
डोवालच
घेणार.
मोदी
सोळा
तास,
अठरा
तास
काम
करतात,
कधी
सुट्टी
घेत
नाही
वगैरे
ठीक
आहे,
परंतु
सगळे
काही
मीच
करणार
असा
त्यांचा
अट्टाहास
असेल
तर
त्यांचा
दिवस
चोवीस
नव्हे,
तर
चोवीस
हजार
तासांचा
असायला
हवा.
'टीमवर्क'वर
मोदींचा
विश्वास
नाही,
विश्वास
नाही
म्हणण्यापेक्षा कोणत्याही
यशात
इतर
कुणी
भागीदार
असणे
त्यांना
मान्य
नाही.
या
`मी'पणाच्या
अट्टाहासामुळेच सगळा
घोळ
होताना
दिसत
आहे.
स्वच्छता
अभियानाची
जी
वाट
लागली
आहे
आणि
त्याची
कबुली
मोदींनीच
दिली
आहे,
त्यामागेदेखील हेच
कारण
आहे.
सरकारमधील
मंत्री
हातात
झाडू
घेऊन
रस्त्यावर
उतरत
आहेत,
त्यांचे
पाहून
मग
आमदार,
नोकरशहा
फोटोसेशन
करत
आहे,
हा
काय
प्रकार,
हे
समजायला
मार्ग
नाही.
हे
मंत्र्यांचे,
आमदार,
खासदारांचे
किंवा
सेलिबे्रटींचे वगैरे
काम
नाही.
सार्वजनिक
ठिकाणी
साफसफाई
करण्यासाठी
स्थानिक
प्रशासनाचा
वेगळा
कर्मचारी
वर्ग
असतो.
हे
लोक
काम
करत
नाही
किंवा
त्यांच्याकडून काम
करवून
घेणे
तुम्हाला
जमत
नाही,
याची
कबुलीच
तुम्ही
साफसफाईसाठी
रस्त्यावर
उतरून
देत
आहात.
स्वच्छता
अभियान
म्हटले,
की
आधी
हातात
झाडू
घेऊन
लोक
रस्त्यावर
उतरतात.
स्वच्छता
अभियानासाठी
झाडूपेक्षा
अगोदर
कचरापेट्या
जागोजागी
लावणे
अधिक
महत्त्वाच्या
आहेत.
देशभरात
या
कचरापेट्यांची पुरेशी
व्यवस्था
नाही,
म्हणूनच
कचरा
रस्त्यावर
येत
आहे.
त्याहीपेक्षा
महत्त्वाची
बाब
म्हणजे
प्रबोधनाने,
उपदेशाने,
समोर
आदर्श
वगैरे
ठेवल्याने
लोक
सुधारतात
या
प्रचंड
मोठ्या
भ्रमातून
सरकार
आणि
सरकारच्या
यंत्रणांनी
बाहेर
येणे
गरजेचे
आहे.
शंभरपैकी
फार
तर
वीस
लोकांवर
अशा
प्रबोधनाचा
वगैरे
परिणाम
होतो,
इतर
एेंशी
टक्क्यांना
ताळ्यावर
आणायचे
असेल
तर
कायद्याचा
बडगाच
हवा.
इंग्रजांच्या
काळात
देशातील
कायदा-सुव्यवस्था
स्थिती
अधिक
चांगली
होती. पोलिस
यंत्रणेचा
आणि
कायद्याचा
तसा
धाक
होता.
एखादाही
पोलिस
गावात
आला,
की
सारे
गाव
कसे
चिडीचूप
व्हायचे.
तो
धाक
आता
उरलेला
नाही.
तो
धाक
पुन्हा
निर्माण
करणे
गरजेचे
आहे.
स्वच्छतेच्या
संदर्भात
बोलायचे,
तर
लोकांना
आधी
तशा
सुविधा
उपलब्ध
करून
द्यायला
हव्यात.
दर
हजार-पाचशे
फुटांवर
कचराकुंड्या ठेवायला
हव्या,
त्या
कचराकुंड्यांची नियमित
सफाई
व्हायला
हवी.
चार
पावले
पुढे
गेल्यावर
कचराकुंडी
आहे,
हे
लोकांना
माहीत
असेल
तर
ते
कचरा
रस्त्यावर
टाकणारच
नाहीत.
शहरात
आणि
खेड्यातही
साधारण
पाचशे
किंवा
हजार
मीटरच्या
अंतरावर
चांगल्या
प्रतीचे
सार्वजनिक
स्वच्छतागृह
असायला
हवे
आणि
ती
स्वच्छतागृहे
स्वच्छ
राहतील
याची
काळजी
घेणारी
यंत्रणा
हवी.
हे
काम
एखाद्या
सेवाभावी
संस्थेला
द्यायला
हवे.
त्यानंतरच
उघड्यावर
शौचास
बसणाऱ्या
लोकांवर
कारवाई
करता
येईल.
या
किमान
पायाभूत
सुविधा
उपलब्ध
करून
दिल्यानंतर
कायद्याच्या
बडग्याचा
वापर
सुरू
करावा.
शहरात
आणि
ग्रामीण
भागातही
ठिकठिकाणी
चांगले,
दर्जेदार
सीसीटीव्ही
कॅमेरे
लावावे.
सगळ्या
प्रकारच्या
पायाभूत
सुविधा
उपलब्ध
करून
दिल्यानंतरही
जे
लोक
रस्त्यावर
कचरा
टाकत
असतील,
उघड्यावर
शौचास
बसत
असतील,
कुठेही
पान-तंबाखू
खाऊन
थुंकत
असतील
त्यांना
सीसीटीव्हीचे
फुटेज
तपासून
आणि
नंतर
पकडून
तिथेच,
जागेवरच
जबर
दंड
करावा.
हा
दंड
किमान
पाच
हजार
तरी
असायला
हवा.
कोणतीही
चौकशी
नाही,
अपील
नाही,
काही
नाही.
त्याला
कॅमेऱ्यात
आलेले
फोटो
दाखवायचे,
हा
तूच
आहे
हे
दाखवावे
आणि
सरळ
तिथेच
दंड
लावायचा,
दंड
भरू
शकत
नसेल
तर
थेट
तुरूंगात
रवानगी
करायची.
आपल्या
देशातील
लोकांची
मानसिकता
'हंटरवाली'
आहे.
हंटर
बसल्याशिवाय
ते
सुधरत
नाहीत.
हा
हंटर
आता
आर्थिक
स्वरूपात
असावा.
हे
एकदा
सुरू
झाले
की
प्रत्येकाला
दंड
करण्याची
वेळच
येणार
नाही.
दोन-चार
लोकांना
दंड
झाला
किंवा
तुरूंगवारी
झाली,
की
बाकीचे
आपोआपच
वठणीवर
येतात.
सध्या
होत
काय
आहे
की
एक
जण
रस्त्यावर
कचरा
फेकतो,
निघून
जातो,
काही
होत
नाही.
त्याचे
पाहून
दुसराही
तसाच
करतो,
त्या
दोघांचे
काही
झाले
नाही
म्हटल्यावर
बाकीचेही
आम्हीच
काय
स्वच्छतेचा
ठेका
घेतला,
असे
म्हणत
रस्त्यावर
कचरा
टाकून
मोकळे
होतात;
परंतु
पहिल्याला
रस्त्यावर
कचरा
टाकला
म्हणून
पाच
हजारांचा
दंड
झाला
हे
पाहिले
की
दुसरा
आणि
त्यानंतरचे
सगळे
आपोआप
कचरापेटी
कुठे
आहे
ते
शोधू
लागतील,
कचरापेटी
दिसेपर्यंत
तो
कचरा
आपल्याजवळच
ठेवतील.
मुळात
स्वच्छता
बाळगणे,
आपला
परिसर
स्वच्छ
ठेवणे
ही
एक
प्रवृत्ती
आहे.
विदेशात,
युरोपीय
देशात
लोकांना
स्वच्छता
ठेवा
असे
सांगावे
लागत
नाही,
तिथे
कुठेही
स्वच्छता
अभियान
राबवावे
लागत
नाही,
कारण
स्वच्छता
ठेवणे
हा
त्यांच्या
स्वभावाचाच
भाग
आहे.
भारतात
तशी
प्रवृत्ती
लोकांमध्ये
नाही,
ही
वस्तुस्थिती
आधी
मान्य
करावी
लागेल
आणि
एकवेळ
ही
वस्तुस्थिती
मान्य
केल्यानंतर
या
लोकांना
ज्या
भाषेत
समजते
त्याच
भाषेत
सांगावे
लागेल.
इथे
प्रबोधन
कामाचे
नाही,
इथे
सेलिब्रेटींनी हातात
झाडू
घेऊन
फोटोसेशन
करण्याने
कोणताही
आदर्श
निर्माण
होणार
नाही.
इथे
भाषा
दंडुक्याचीच
चालते.
कायदे
कडक
हवेत,
ते
प्रभावीपणे
राबविले
गेले
पाहिजे
आणि
कायदा
राबविणारी
यंत्रणा
प्रामाणिक
असायला
पाहिजे.
दुबईत
एखाद्या
कारचालकाने
जोरात
हॉर्न
वाजविला
तरी
पुढच्याच
चेकपॉईटला
ती
कार
बाजूला
घेतली
जाते
आणि
त्या
कारचालकावर
किंवा
कारच्या
मालकावर
इतका
जबर
दंड
लादल्या
जातो
की
पुन्हा
आयुष्यात
कधीही
हॉर्नवर
त्याचा
हातच
जाऊ
नये.
हे
यासाठी
होऊ
शकते
की
दुबईतील
ट्रॅफिक
इतकी
शिस्तबद्ध
आहे
की
हॉर्न
वाजवायची
गरजच
पडत
नाही.
त्या
लोकांनी
आधी
ट्रॅफिकचे
नियम
कडक
केले,
तशा
सुविधा
उपलब्ध
करून
दिल्या
आणि
नंतरच
नियम
मोडणाऱ्यांना
कडक
शिक्षा
करायला
सुरुवात
केली.
आपल्याकडचे
स्वच्छता
अभियान
यशस्वी
करायचे
असेल
किंवा
स्वच्छता
अभियान
राबविण्याची
वेळच
येऊ
द्यायची
नसेल
तर
स्वच्छतेच्या
साधनांसंदर्भात म्हणजे
कचराकुंड्या,
सार्वजनिक
संडास,
मुताऱ्या वगैरेंसंदर्भात लोकांची
कोणतीही
तक्रार
असणार
नाही
याची
संबंधित
यंत्रणांनी
आधी
खबरदारी
घ्यावी
आणि
नंतर
सगळ्या
सुविधा
उपलब्ध
असतानाही
कुणी
अस्वच्छता
पसरवित
असेल
तर
त्याला
इतका
जबर
दंड
करावा
की
त्यांची
दुसऱ्यांदा
तशी
करण्याची
आणि
त्याला
पाहून
दुसऱ्या
कुणाला
घाण
पसरवायची
हिंमतच
होणार
नाही.
ठिकठिकाणी
कचरापेट्या,
त्यादेखील
नियमित
स्वच्छ
होणाऱ्या,
ठराविक
अंतरावर
स्वच्छ
असलेली
स्वच्छतागृहे,
पाण्याची
मुबलक
व्यवस्था
या
सगळ्या
सुविधा
स्थानिक
प्रशासनाने
उपलब्ध
करून
द्याव्यात
त्यासाठी जो पैसा
केंद्र
आणि
राज्य
खर्च
करते
तो
पैसा
कल्पकतेने
वापरणाऱ्या
कुठल्यातरी
सेवाभावी
संस्थेचा
शोध
घेऊन
त्यांना
द्यावा
आणि
त्याच
वाटल्यास
यंत्रणेला
पुरेसे
अधिकार
देत
स्वच्छतेचे
नियम
न
पाळणाऱ्यांना
जबर
दंड
जागेवरच
आकारण्याची
परवानगी
द्यावी.
असे
झाले
तर
अवघ्या
सहा
महिन्यांत
संपूर्ण
देश
कसा
स्वच्छ
होतो
ते
बघा!
फेसबुकवर
प्रहार
वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर
भेट
देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप
करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile
No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया
देताना
कृपया
आपले
नाव,
गाव
लिहा.

Comments
Post a Comment