प्रहार, रविवार, दि. 29 मार्च 2015 मनेका आणि सरकार!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 29 मार्च 2015
मनेका आणि सरकार!
जगातील समस्त प्राणीमात्रांचे सुख-दु:ख केवळ आपल्यालाच कळते, आपणच त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो, इतर सगळे जग या प्राणी जगताचे निर्मूलन करण्यास टपलेले आहे, त्यांचा प्रचंड छळवाद या जगाने मांडला आहे, या स्वयंप्रेरित विचारांमध्ये मनेका गांधी इतक्या गुरफटल्या आहेत, की त्यांना प्रत्येक प्राणी शोषित आणि प्रत्येक माणूस शोषक वाटतो. त्यांच्या भूतदयावादाचा अतिरेक इतरांना खूप त्रास देणारा ठरत आहे. अर्थात त्यांचा भूतदयावाद अगदीच चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. प्राणीमात्रांवर दया करायलाच पाहिजे, शेवटी त्यांचाही जीव असतो, त्यांची काळजी घ्यायलाच हवी, परंतु या भूतदयेचाही अतिरेक व्हायला नको.
हिटलर-मुसोलिनीच्या काळात प्रचारात आलेला `फॅसिझम' हा शब्द त्यानंतर सातत्याने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जगात नांदता राहिला आहे. अतिरेकी किंवा उन्मादी विचार, मग ते कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असो, त्याला फॅसिझम म्हणता येईल. हा शब्द केवळ आतंकवाद किंवा सामूहिक दहशतीशीच संबंधित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. साधेपणाचा किंवा अहिंसक वृत्तीचा अतिरेकी हादेखील एक प्रकारचा फॅसिझमच आहे. शेवटी फॅसिझम हा चुकीचाच असतो, कारण चांगुलपणाचा अतिरेकदेखील वाईट असतो. आपले टोकाचे विचार त्या विचारांचा अनुषंगिक परिणाम लक्षात न घेता आक्रमकपणे मांडणे, किंवा मी म्हणतो तेच सत्य आणि ते इतरांनीही मान्य करावे असा आग्रह धरणे हा जर फॅसिझम असेल, तर आपल्या देशात अशा फॅसिस्ट वृत्तीचे अनेक माणसे आहेत, असे म्हणावे लागेल. या प्रत्येकाला आपण तितके बरोबर आणि इतर सगळे जग चूक असे वाटत असते. अशाच काही फॅसिस्ट लोकांमध्ये टोकाच्या पर्यावरणवादी मनेका गांधी यांचाही समावेश होतो. जगातील समस्त प्राणीमात्रांचे सुख-दु:ख केवळ आपल्यालाच कळते, आपणच त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो, इतर सगळे जग या प्राणी जगताचे निर्मूलन करण्यास टपलेले आहे, त्यांचा प्रचंड छळवाद या जगाने मांडला आहे, या स्वयंप्रेरित विचारांमध्ये मनेका गांधी इतक्या गुरफटल्या आहेत, की त्यांना प्रत्येक प्राणी शोषित आणि प्रत्येक माणूस शोषक वाटतो. त्यांच्या भूतदयावादाचा अतिरेक इतरांना खूप त्रास देणारा ठरत आहे. उद्या कदाचित अशीही परिस्थिती येऊ शकते, की शहरातले साधे पिसाळलेले कुत्रे मारायचे असेल, तर पालिकेच्या लोकांना मनेका गांधींकडून `एनओसी' आणावी लागेल. अर्थात त्यांचा भूतदयावाद अगदीच चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. प्राणीमात्रांवर दया करायलाच पाहिजे, शेवटी त्यांचाही जीव असतो, त्यांची काळजी घ्यायलाच हवी, परंतु या भूतदयेचाही अतिरेक व्हायला नको. मध्यंतरी त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये फिनाईलच्या ऐवजी गोमूत्रापासून तयार केलेले गोनाईल वापरण्याची सूचना केली होती, सूचना काही फार वाईट नाही, परंतु केवळ सूचना करून काही व्हायचे नाही, व्यावसायिक स्तरावर गोनाईलचे उत्पादन कसे घेता येईल, याचाही विचार करायला हवा. मनेका गांधींची अडचण ही आहे, की त्या भराभर समस्या आणि त्यावरचे उपाय सूचवितात, परंतु त्याच्या इतर अनुषंगिक परिणामांचा विचार करीत नाहीत. मागे एकदा पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला होता. कुत्र्यांचा अशाप्रकारे जीव घेणे रानटीपणा आहे, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु मग या पिसाळलेल्या कुत्र्यांचे काय करायचे, हेदेखील त्यांनी सांगायला हवे. पिसाळलेली, रोगट, लूत लागलेली कुत्री गावभर भटकत राहिली तर त्याचा सार्वजनिक आरोग्यावर किती भयंकर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव मनेकाबाइंर्ना आहे का? सर्कशीतील प्राण्यांच्या वापरावर त्यांनी आक्षेप घेतला आणि अनेक सर्कशी कायमच्या बंद झाल्या. कित्येकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली, सर्कशीतील प्राण्यांना जंगलात सोडण्यात आले, परंतु कायम मनुष्याच्या सहवासात राहिलेल्या या प्राण्यांना जंगलातले वातावरण मानवले नाही, जंगलातील आव्हाने ते स्वीकारू शकले नाही आणि बहुतेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. मध्यंतरीच्या काळात तर गाईचे दूध पिणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या गाईचे रक्तप्राशन करणे ठरते, असा शोध मनेकाबाइंर्नी लावला आणि गाईच्या दुधावर केवळ तिच्या वासरांचाच हक्क आहे, असे ठासून सांगितले. जगभरातील दूध डेअऱ्या बंद पाडणाराच हा तर्क होता, बरे झाले मनेकाबाइंर्चे हे विधान कुणी गांभीर्याने घेतले नाही. वन्य प्राण्यांच्या बाबतीत असाच एकतर्फी भूतदयावादी विचार मांडला जात असतो. वन्य प्राण्यांची विनाकारण शिकार होऊ नये, हे कुणालाही मान्य असेल, परंतु हे प्राणी शेतात घुसून शेतकऱ्यांनी घाम गाळून, रक्ताचे पाणी करून उभे केलेले पीक एका रात्रीतून नष्ट करीत असतील तर त्यांच्यावर दया कशी दाखविता येईल? त्यांच्यावर दया दाखवायची असेल, तर मरणाला टेकलेल्या शेतकऱ्यांना कुणी दया दाखवायची? शेवटी प्रत्येक जीव हा जगण्यासाठीच धडपडत असतो.
जिवेष्णा, अर्थात जगण्याची तीऋा इच्छा हाच या जीवसृष्टीचा आधार आहे. त्यामुळे हे जगणे जेव्हा इतर कुणामुळे संकटात येत आहे, असे वाटते तेव्हा ते संकट जमेल त्या मार्गाने दूर करण्याचा अधिकार जीवसृष्टीतील प्रत्येकालाच आहे. अर्थात त्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडू शकतो, परंतु निसर्गाने ती काळजीदेखील व्यवस्थित घेतली आहे. हरिणांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाघ, सिंह यांसारखे प्राणी जंगलात असतात आणि वाघ, सिंहांची संख्या वाढू नये म्हणून त्यांचा जननदर आणि पिलांचे जगण्याचे प्रमाण कमी असते. ही सगळी नैसर्गिक व्यवस्थाच आहे. कळपात मागे राहिलेल्या एखाद्या अशक्त पिलावर वाघ हल्ला करून त्याची शिकार करतो, त्यावेळी त्या पिलाच्या आईला काय वाटेल याचा विचार करण्याची त्याला गरज नसते आणि त्या पिलाच्या आईनेदेखील कधीतरी या पिलाचे असेच मरण होणार होते, कदाचित आपलेही एखादे दिवशी असेच मरण येईल, हे गृहीत धरलेले असते. हरणाच्या आईला काय वाटेल, त्याची भावंडे किती दु:खी होतील, असा विचार करून वाघाने शिकार करायची नाही, म्हटले तर त्याला उपाशीच मरावे लागेल. सांगायचे तात्पर्य `जिवो जिवश्च जिवनम्' हा जगाचा नियम आहे, इथे प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर जगतो आणि हीच इथली नैसर्गिक व्यवस्था आहे. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केव्हाही निषेधार्हच असतो. दुसऱ्याचा जीव न घेता जगायचा प्रयत्न स्वत: मनेकाबाई तरी करू शकतात का? आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही आमच्या भोजनासाठी इतर कोणत्याही प्राण्यांचा बळी घेत नाही, असे कदाचित त्या म्हणू शकतील, पण मग त्यांच्या शाकाहारामध्ये ज्या वनस्पतींचा समावेश होतो, त्या वनस्पतींना जीव नसतो का? हाती कोयता घेऊन किती निर्दयपणे ज्वारीची, बाजरीची कणसे छाटली जातात, हे त्यांनी कधी शेतात जाऊन पाहिले आहे का? समुद्र किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या आहारात माशांचा समावेश असणारच, ते स्वाभाविकच आहे, मग मासे मारणे हीदेखील हिंसाच नाही का? अधिक महत्त्वाचे म्हणजे समुद्रातील जे मोठे मासे अन्य लहान माशांना खातात त्यांना भूतदयावाद कसा शिकवायचा? मनेका गांधींच्या आग्रहाखातर अगदी उद्यापासून या देशात सगळ्या प्रकारच्या हिंसेवर बंदी आणली, तर अवघ्या दहा वर्षांत परिस्थिती इतकी विकोपाला गेलेली असेल, तर माणसांना रस्त्यावरून चालायलाच जागा उरणार नाही. सगळीकडे मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी, डुकरे, कोंबड्या यांचेच साम्राज्य दिसेल. सांगायचे तात्पर्य भूतदयावाद किंवा अन्य कोणताही `इझम्' एका मर्यादेपर्यंतच योग्य असतो आणि त्या मर्यादेपर्यंत त्याचे पालन करायलाही हवे, परंतु त्याचा अतिरेक व्हायला लागला तर औषधापेक्षा दुखणे बरे होते, असे म्हणण्याची वेळ येईल.
मनेका बाइंर्मुळे महाराष्ट्रात बैलाच्या शर्यतीवर म्हणजेच शंकरपटांवर बंदी लावल्या गेली, मात्र मुंबई, पुणे, बेंगलोर येथे घोड्यांच्या शर्यती सुरूच आहेत. त्यावर बंदी नाही. जुगार खेळायला बंदी आहे; मात्र या घोड्यांवर खुलेआम बेटिंग केल्या जाते. मनेका बाइंर्चा ``इझम'' आणि सरकारचा ``दुटप्पीपणा'' हा असा एकांगी आहे. या सगळ्यांवर उपाय म्हणजे, सर्व पिसाळलेली, खरुजलेली कुत्री मनेका बाइंर्च्या घराच्या अंगणामध्ये सोडून देणे आणि असे तद्दन फालतू कायदे लोकांनी सामूहिकपणे झुगारून टाकणे.
Comments
Post a Comment