प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक! आज भाजपजवळ मोदींसारखा चेहरा आहे, वैचारिक नेतृत्वाची फळीआहे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे संघासारख्या देशव्यापी संघटनेचे पाठबळ आहे. त्या तुलनेतसेनेकडे काहीच नाही. सेनेच्या तुलनेत राज्यात भाजपची ताकद जास्त आहे, हा भाजपचादावा या निवडणुकीने सिद्ध केला आणि महाराष्ट्र आमचाच, महाराष्ट्रातआमचीच सत्ता, आमचाच मुख्यमंत्री असा बिनबुडाचा दर्प बाळगणाऱ्यासेनेची औकात तसेच कुवत या निवडणुकीने दाखवून दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि कोण किती पाण्यात आहे, या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाचे उत्तर एकदाचे मिळाले. गेली पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते, त्यामुळे प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका या आघाडीला बसणे क्रमप्राप्त होते, तसा तो बसलादेखील, परंतु मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. वास्तविक सेना-भाजप युतीसाठी राज्यातील वातावरण खूपच अनुकूल होते. युती कायम राहिली असती तर क