Posts

Showing posts from November, 2018
Image
' प्रहार'    रविवार, दि.15 एप्रिल 2018 बंद करा हा दौलतजादा...! हे खरे आहे की देशातील गरिबांची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे आणि या गरीब, वंचितांपर्यंत सगळ्या सोईसुविधा घेऊन जाण्यासाठी सरकारला 'आहे रे' वर्गातील लोकांकडून अधिक कर वसूल करावा लागतो; परंतु ही व्यवस्था कायमस्वरूपी असू शकत नाही. पायात ताकद निर्माण होईल, चालण्याचा सराव होईल तोपर्यंत पांगूळगाडे दिले पाहिजे, अशी ताकद निर्माण झाल्यावर पांगूळगाडे काढून घेणे गरजेचे आहे, परंतु सध्या हे होत आहे, की या पांगूळगाड्यांनाच लोक पाय समजत आहेत आणि त्यांचा तो भ्रम कायम ठेवण्यात सरकार स्वत:ला धन्य मानत आहे. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. एअर इंडिया या सरकारी मालकीच्या विमान कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या विमान प्रवास भाड्यात अर्धी कपात केली आहे. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक अर्ध्या पैशातच विमान प्रवास करू शकतील. आधीच तोट्यात चालणाऱ्या या विमान कंपनीला अशा सवलती देणे कसे काय परवडते? प्रवासी आणि मालवाहतुक भाड्यात या विमान कंपनीने वाढ केली असती, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांमध्ये कपात केली असती, भारतातल्या भार

आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !

Image
*'प्रहार'*, रविवार दि. २८ अॉक्टोबर २०१८ *आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !* (लेखक : *प्रकाश पोहरे* मुख्य संपादक, दै. देशोन्नती) _शेतकऱ्यांनीच कुणावरच विसंबून न राहता अंतर्मुख होऊन विचार करावा. मागच्या प्रहारमध्ये मी सांगितल्या नुसार काहीतरी वेगळी संकल्पना राबविल्याशिवाय आता केवळ शेतीमध्ये गुजारा होऊ शकत नाही हे पक्के ध्यानी धरा आणि त्याकरिता हातपाय हलवायला आजच सुरुवात करा, अन्यथा नाकातोंडात पाणी गेलेले आहेच , आता बुडायला फार वेळ लागणार नाही._ न्यूयॉर्कच्या ब्रुक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला. त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. १३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेला एक जुना कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?" जॉर्डन उत्तरला "अ