Posts

Showing posts from March, 2015

प्रहार, रविवार, दि. 8 मार्च 2015 अस्सल गोवंश आहे तरी कुठे?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com      रविवार, दि. 8 मार्च 2015 अस्सल गोवंश आहे तरी कुठे ? भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे  1960-70 च्या दशकात जेव्हा पहिल्यांदागोहत्या बंदी कायद्याची मागणी करण्यात आली होती तेव्हाच तो कायदा केल्या गेला असता,तर देशी गाई बचावल्या असत्या आणि त्यांचा शेतकऱ्यांना बराच आर्थिक आधारमिळाला असता, परंतु भारतीय गोवंश संपवून टाकण्यात आला आणि इकडच्यावातावरणाशी जुळवून न घेता येणाऱ्या संकरीत गाइंर्ची पैदास वाढविण्यात आली. परिणामीशेतकऱ्यांकडचे  अस्सलगोधन आपोआप संपुष्टात येत गेले.  सरकारला गोहत्या होऊ नये असे खरोखर वाटत असेल, तर सरकारनेब्राझीलमधून उत्तम दर्जाच्या आणि भारतीय वंश असलेल्याच गाइंर्ची आयात करावी,त्या शेतकऱ्यांना वाटाव्या, अन्यथा गोवंश हत्याबंदीमुळेविकल्याही जात नाहीत म्हणून  शेतकऱ्यांनी मोकाट सोडलेल्या गाई पोसण्यासाठी सरकारला ठिकठिकाणी पांजरपोळ उभेकरावे लागतील. महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या गोवंश हत्या बंदी विधेयकावर नुकतीच राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि गेली 19 वर्षे रेंगाळत असलेला ह

प्रहार,रविवार, दि. 1 मार्च 2015 “शेतकरी अदखलपात्रच!”

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com      रविवार, दि. 1 मार्च 2015 “ शेतकरी अदखलपात्रच! ” राज्यकर्ते   बेपर्वा   आहेत   आणि   राज्यकर्त्यांना   हलवून   जागे   करण्याची   जबाबदारी   ज्यांच्यावर   आहे   ती माध्यमे   आज   केवळ   पैसा   गोळा   करण्याच्या   मागे   लागली   आहेत.   छोट्या   पडद्यावर   फालतू   क्रिकेटला जितका   वेळ   मिळतो   त्याच्या   एक   टक्काही   वेळ   शेतकऱ्यांच्या   प्रश्नांना   मिळाला   तरी   खूप   काही   साध्य होऊ   शकते ;   परंतु   तसे   होताना   दिसत   नाही.   शेतकरी   सगळ्यांसाठीच   अदखलपात्र   ठरला   आहे.   त्याने शेतात   राबावे ,   पीक   काढावे ,   आमची   पोटे   भरावी ,   हीच   सगळ्यांची   भावना   आहे ;   परंतु   या शेतकऱ्यांनाही   पोट   आहे ,   त्यांनाही   प्रापंचिक   अडचणींचा   सामना   करावा   लागतो ,   याची   मात्र कुणालाच   जाणीव   नाही. माध्यमांना समाजाचा आरसा म्हटले जाते, माध्यमांमधून जे काही दिसते किंवा माध्यमात जे काही उमटते ते समाजाच्या सद्यस्थितीचे दर्शक असते, असा समज आहे, खरे तर अलीकडील

प्रहार,रविवार, दि. 22 फेब्रुवारी 2015 " हतबल विद्यार्थी,असहाय पालक!"

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com      रविवार, दि. 22 फेब्रुवारी  2015 हतबल विद्यार्थी ,असहाय पालक! दहावी-बारावी   परीक्षेच्या   दरम्यान   विश्वचषकाचे   सामने   सुरू   आहेत ,   चांगली   दीड   महिना   ही   स्पर्धा रंगणार   आहे   आणि   नंतर   एप्रिल-मेमध्ये   महाविद्यालयीन   परीक्षा   सुरू   असताना   आयपीएलची   सर्कस सुरू   होणार   आहे.   एकूण   काय   तर   वर्षभराच्या   तयारीचा   कस   जिथे   लागणार   असतो   तिथेच   नेमके   हे क्रिकेटचे   काळे   मांजर   विद्यार्थ्यांना   आडवे   जाते.   इतर   गोंगाटाच्या   साथीला   हा   क्रिकेटचा   ज्वर   असतो आणि   त्यातून   विद्यार्थ्यांचे   मात्र   पार   वाटोळे   होते ,   सगळ्यांना   हे   कळते ,   समजते ,   जाणवते ,   परंतु   कुणी काहीच   करू   शकत   नाही   आणि   हीच   मोठी   खेदाची   बाब   आहे. नेमेचि येतो तो पावसाळा' या उक्तीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आली, की क्रिकेटचा  तापही सोबतच येत असतो. दरवर्षीचेच हे नाटक आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आणि क्रिकेटच्या आं