Posts

Showing posts from 2019
Image
' प्रहार '  रविवार, दि.२० ऑक्टोबर २०१९ रासायनिक शेतीचे अनुदान जैविक शेतीला द्यावे! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै.देशोन्नती)             भारतात १९६० ते १९७० च्या दशकात अन्न धान्याची चणचण होती. त्यामुळे त्या काळात मजूर शेतात काम केल्यानंतर पैशाच्या रूपात मजूरी घेण्याऐवजी अन्नधान्याच्या स्वरूपात घेत होते . एक क्विंटल ज्वारी विकल्यानंतर साधारणत: एक तोळा म्हणजे १२ ग्रॅम आणि एक क्विंटल कापूस विकल्यानंतर दोन तोळे म्हणजे २४ ग्राम सोने मिळायचे. त्यावेळेला तोळा हा १२ ग्रॅम चा होता, दशमान पद्धती लागली नव्हती. शेतीमध्ये लागणाऱ्या जवळपास सर्वच निविष्ठा जसे बियाणे, शेण खते, बैल वगैरेमध्ये शेतकरी स्वयंपूर्ण होता. *बारा बलुतेदारीमुळे गावगाडा हा सुरळीत चालत होता.*            १९७० नंतर हरीतक्रांती आली. परंपरागत बियाणे जावून हायब्रिड बियाणे आले, रासायनिक खते आली, त्यापाठोपाठ कीड आली आणि कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशके आली. देशातील शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीमध्ये आपला पुरुषार्थ गाजवला. पेव संस्कृती जाऊन धान्याची गोदामे ओसंडून वाहू लागली. भुकेने व्याकुळलेला देश उदरभरणाच्या क
Image
' प्रहार ' रविवार, दि.६ ऑक्टोबर २०१९ काँग्रेस हे धाडस करेल काय? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै.देशोन्नती) आता अन्न उगवणे हे गरजेचे राहिले नाही तर प्रक्रिया करणे ही गरज झाली आहे, हे शेतकऱ्यांना स्पष्टपणे कुणीतरी सांगितलेच पाहिजे. म्हणजे ते भविष्यात वेगळा विचार सुरू करू शकतात आणि वेळीच सावरू शकतात. सध्या विरोधात असलेली काँग्रेस जर प्रामाणिकपणे पुढे येऊन लोकांना वस्तुनिष्ठपणे भविष्यात ते काय करू शकतात याबाबत ‘ब्लु प्रिंट’ देऊ शकली तर हे होऊही शकते, मात्र त्या ताकदीचा कुणीच नेता त्यांच्याकडे नाही. शरद पवार हे करू शकले असते, मात्र त्यांच्या संदर्भात सातत्याने जाणीवपूर्वक जी प्रतिमा उभी केल्या गेली; त्याची किंमत आता काँग्रेस मोजत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, मात्र वस्तुनिष्ठ विचार करून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पुढे येऊन पवारांच्या खांद्यावर नेतृत्व देण्याचे हे धाडस करेल काय? ह्यावरच देशाचे आणि काँग्रेसचे भवितव्य सध्यातरी अवलंबून आहे.                     Oxfam च्या २०१७ च्या सर्वेक्षणानुसार १ टक्के लोकांकडे देशातला ७३ टक्के पैसा आहे, म्हणजेच ९९ टक्के लोकांकडे
Image
'प्रहार' रविवार, दि.२२ सप्टेंबर  २०१९ देवेंद्रजी, शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच..! (लेखक : प्रकाश पोहरे - संस्थापक, किसान ब्रिगेड तथा मुख्य संपादक, दै.देशोन्नती) वस्तुस्थिती ही आहे की, वर्षानुवर्षांचे शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी योजनेने सुटत नाहीत. त्यामुळे आता इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाने कर्जमाफीचे गाजर दाखवून निवडणुका लढवल्यास ‘किसान ब्रिगेड’ त्या राजकीय पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल, तर अमेरिकेसारखे देश त्यांच्या शेतकऱ्यांना जशी सबसिडी देतात, तशी भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालावर थेट सबसिडी द्या.कर्जमाफीसारख्या पोकळ उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना शेतकऱ्यांच्या पथ्यावर पाडा, असे ठणकावून सांगण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मात्र, त्याकरिता मजबूत संघटना स्थापन करून सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे, हे शेतकरी जेव्हा समजून घेऊन कृती करतील तो दिवस शेतकरी मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल हे निश्चित.                      राज्यातील फडणवीस सरकारने जू
Image
'प्रहार' रविवार, दि.१४ जुलै २०१९ समारंभातील ध्वनीप्रदूषणामुळे वैचारिक आदान-प्रदान थांबले....! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) लग्न असो अथवा इतर कोणताही कार्यक्रम असो, तो ठरल्यावेळी पार कसा पडेल, शांततेने पार कसा पडेल याची काळजी आयोजकांनी घ्यायला हवी. अलीकडे तसे होत नसल्याचे दिसते. विशेषत: लग्न समारंभात अनावश्यक गोंधळच अधिक दिसून येतो. संवाद साधता येत नाही, शांततेने कुणाशी बोलता येत नाही, लग्नाची वेळ पाळली जात नाही. ध्वनीप्रदूषण हा तर मुद्दा आहेच; परंतु त्यासोबतच अपेक्षित वैचारिक देवाण-घेवाणीला जो अडथळा निर्माण होतो, तो अधिक काळजीचा विषय ठरतो.           वैचारिक आदान-प्रदानातून सामाजिक बदल होत असतात, क्रांती होत असते. नवे विचार समाजात नव्या बाबी रूजवत असतात. हे वैचारिक आदान-प्रदान वेगवेगळ्या स्तरांवर होत असते. बहुजन समाजात कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. अशा कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटत असतात, विचारांचे आदान-प्रदान होते. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचा हेतू कदाचित ½वेगवेगळा असेल; परंतु संवाद साधणे हा सामाईक भ
Image
प्रहार रविवार, दि. ७ जुलै २०१९ प्रगती की अवनती? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) १३५ कोटी लोकांची भूक भागवायची, तर जीएम, हायब्रीड, रासायनिक शेतीला पर्याय नाही, अशी मांडणी आजकाल केली जात आहे. अशा शेतीतून पिकलेलं अन्न-धान्य सकस असणारच नाही ही साधी गोष्ट आहे. पायाभूत सुविधा- जसे पाणी, भांडवल, मुक्त बाजारपेठ आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी किंमत उपलब्ध करून न देता नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करणारी व्यवस्था ढोंगी आणि निखालस कपटी आहे. "मुँह में राम बगल में छुरी" घेऊन चालणाऱ्या व्यवस्थेत भोळ्याभाबड्या जनतेचे कॅन्सर, डायबेटीस, ब्लड प्रेशर इ. सारख्या रोगांनी असेच दिवसाढवळ्या मुडदे पडत रहाणार आहेत, कुठलाही योग किंवा आसने कामी येणार नाहीत. हा, योग शिकवणारे नक्कीच मोठे होतील हे सांगण्यासाठी कुठल्याही पंचांगाची गरज नाही. सगळा घोळ नफेखोरी, हरामखोरीने भरलेल्या दुटप्पी व्यवस्थेचा आहे आणि त्यासाठी या व्यवस्थेला डोक्यावर घेणारा पांढरपेशी वर्गच सर्वात जास्त जबाबदार आहे.            नुकतेच यवतमाळ, वर्धा, गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये नवीन तुरुंग बांधण्यात येत
Image
प्रहार रविवार, दि.१६ जून २०१९ सर्व उपद्व्याप शहरी मतदारांसाठीच...! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) हे समजणे जरुरी आहे, की सरकारच्या योजना या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कधीच तयार केल्या जात नाहीत, तर त्या शहरी भागातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवून आखल्या जात असतात, कारण सरकारला महागाई आणि ती सुद्धा फक्त खाण्या- पिण्याच्या वस्तुंची महागाई वाढू द्यायची नसते आणि त्याकरिता सरकार वाट्टेल ते उपाय योजत असते. यालाच महागाई कृत्रिमरीत्या नियंत्रणात ठेवणे असे म्हणतात.              आपला देश जरी कृषिप्रधान आहे, आणि आपली अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे, असे बोलले जाते, अर्थात त्यात तथ्य नक्कीच आहे. आपल्या देशातील एक मोठा वर्ग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. याचा अर्थ या वर्गाची आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्राचा विकास याचा थेट संबंध आहे. या पृष्ठभूमीवर विचार केला तर आपला देश अजूनही गरीब का आहे किंवा अजूनही भारत हे विकसनशील राष्ट्र का आहे, या प्रश्नाचे उत्तर कृषी क्षेत्राकडे सरकारचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हेच असू शकते. या दुर्लक्षामुळे
Image
प्रहार रविवार, दि.९ जून २०१९ असंतोष आहे;परंतु दिशाहिन..! (लेखक : प्रकाश पोहरे - संस्थापक, किसान ब्रिगेड) शेतकऱ्यांमध्ये,आदिवासींमध्ये, बेरोजगार तरुणांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आहे; परंतु त्या असंतोषाला नेमकी दिशा देणारी एकजूट त्यांच्यात नाही, त्या असंतोषाला नेमकी दिशा देणारे नेतृत्व त्यांच्याकडे नाही आणि या अशा दिशाहिन असंतोषाचा थेट फायदा या घटकांना नागविणाऱ्या राजकीय पक्षांनाच होत आहे.              नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे निकाल काहीसे अनपेक्षित नक्कीच म्हणावे लागतील. एक सर्वसाधारण अंदाज हा होता की रालोआ आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल; परंतु बहुमतासाठी काही अन्य पक्षांच्या मदतीची गरज रालोआला भासेल आणि त्या परिस्थितीत कदाचित पंतप्रधान पदाचा उमेदवारही बदलला जाऊ शकतो. रालोआला बहुमताच्या जवळपास जाण्याइतपत जागा मिळतील या अंदाजामागे तर्क अर्थातच हा होता की रालोआ किंवा भाजप विरोधकांमध्ये अपेक्षित एकजूट नव्हती. उत्तरप्रदेश, प.बंगाल, महाराष्ट्र सारख्या बड्या राज्यांमध्ये विरोधकांच्या मतविभागणीची शक्यता लक्षात घेऊन यावेळी रालोआला महा
Image
प्रहार रविवार, दि. २ जून २०१९ न्यायाचा आधार माणुसकी हवा...! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) विषमता नष्ट होऊन प्रत्येकाला माणुसकीच्या तत्त्वावर न्याय देणारी समतावादी व्यवस्था प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत या समाजातून गुन्हेगारी नष्ट होणार नाही. गुन्हेगारी ही एक प्रवृत्ती आहे आणि तिला जन्माला घातले आहे तेे अन्यायाच्या पायावर उभ्या असलेल्या इथल्या व्यवस्थेने. इथे भुकेसाठी चोरी करणे गुन्हा ठरते; परंतु हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना सन्मान दिला जातो. तात्पर्य जोपर्यंत माणुसकीच्या पायावर उभी असलेली न्यायव्यवस्था अंमलात येत नाही तोपर्यंत गुन्हेगारीच्या अभिशापातून या समाजाची सुटका नाही आणि या अभिशापासाठी सुरक्षित तसेच सुखवस्तू जीवन जगणारे समाजघटक अधिक जबाबदार आहेत. न्याय ही संकल्पना तसे पाहिले तर खूप व्यापक आहे. दंडसंहिता किंवा कायद्याची कलमे एवढ्यापुरती ही संकल्पना मर्यादित करून चालणार नाही. शेवटी हे जे पुस्तकी कायदे आहेत ते न्यायापेक्षा समाजव्यवस्था सुरळीत चालावी या उद्देशाने तयार केले आहेत. तसे नसते तर ज्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, ताकद आहे त्य
Image
प्रहार रविवार, दि.२६ मे २०१९ शेतकऱ्यांना `न्याय' कोण देणार...? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) कर्जमाफी हा प्रकार आर्थिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या चुकीचा असेल तर तो सगळ्यांच्याच बाबतीत चुकीचा असायला हवा. उद्योगांची हजारो कोटींची कर्जे पडद्याआड माफ करायची आणि शेतकऱ्यांना मात्र मोठ्या दातृत्वाचा आव आणीत काही हजारांची कर्जमाफी द्यायची, हा सरकारचा दोगलेपणा नाही का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ओरड करणाऱ्यांनी सरकारला याचा जाब विचारावा. आधी उद्योगपतींना कर्जमाफी देणे बंद करावे, शेतकऱ्यांकडून ज्या दंडेलीने कर्जवसुली केली जाते तशी ती उद्योगांकडून करावी, सगळ्यांना समान न्याय द्यावा आणि हे शक्य नसेल तर सरकारने आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात ओरडणाऱ्यांनी आपली तोंडे बंद करावीत.           शेतकऱ्यांची कर्जमाफी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अलीकडील काळात तर राजकीय पक्षांसाठी जणू काही हे एक चलनी नाणे झाले आहे. निवडणुका जवळ आल्या किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश वाढला, की हमखास उपयोगी पडणारे ब्रह्मास्त्र म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वापर केला जातो. या सततच्या
Image
प्रहार  - रविवार, दि.१९ मे २०१९ मराठी तरुण मागे का? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) `....तेव्हा मराठी तरुण कुठे असतात? सगळ्याच जाती- धर्माचे...??"; तर भरपूर मंथन केल्यावर याचे मला सापडलेले उत्तर आहे, की... मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन, क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मश्गूल असतात, नको तिथे उसळतात. सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मश्गूल असतात. मिरवणुका काढण्यात मश्गूल असतात. राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मश्गूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात. नाचायचे, मारामारी, फोडाफोडी करायची, दारू प्यायची, तंबाखू घोटायचा आणि "मी कुठला धंदा करू?"; याचा विचार करत बसायचे, यातच मराठी तरुण दिवस काढतो. सगळे सुतार किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम करणारे, हे उत्तरभारतीय/राजस्थानी आहेत. आणि सगळे चांगले कारागीरच आहेत. उत्तम फर्निचर बनवतात, प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत बनवतात. दिवसभर मेहनत करतात. 'सिंगल हजेरी'... म्हणजे सकाळी नऊ ते पाच- पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा 'डबल हजेरी'...
Image
प्रहार - रविवार, दि.१२ मे २०१९ कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळू नका! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) एका घराण्याने व्यक्तिगत सुट्टीसाठी सैन्याचा वापर केला हे गरळ ओकणे खरेतर मोदींना काहीच गरजेचे नव्हते. देशात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे बोलायला खूप विषय आहेत. खरेतर मोदींना हे त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि सल्लागारांनी सांगितले पाहिजे आणि मोदींनी ते ऐकायला हवे; मात्र जर समोरचा व्यक्ती हा आपल्या सांगण्याचा गैर अर्थ काढत असेल, तर मग समोरचा सुज्ञ मनुष्य गप्प राहणेच पसंत करतो आणि मोदींचे नेमके तेच झाले आहे...             देशामध्ये सध्या मागील जवळपास एक महिन्यापासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि आता त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. २३ मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि देशाला नवीन सरकार(बहुदा मोदी वगळून) मिळणार आहे. या निवडणुकांच्या गदारोळामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडाला आहे. कुणी काय बोलावे आणि कुठल्या विषयावर बोलावे याला काही धरबंद राहिलेला नाही. खरे म्हणजे पंचवीस-तीस वर्षांअगोदर देशात अशी परिस्थिती नव्हती. विर
Image
'प्रहार'  - रविवार, दि.५ मे २०१९ 'वाट' ,' वाटसरू' आणि ' वाटाडे' ! ( लेखक :  प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) पत्रकार युवराज नायर यांनी 'DDC youtube channel'करिता `देशोन्नती'चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांची 'बुद्ध धम्म'संदर्भात एक विस्तृत मुलाखत घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल केली. तिला उदंड प्रतिसाद  मिळाला. संपादक प्रकाश पोहरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले, तर काहींच्या भुवया वर गेल्या. या विषयावर  पोहरेंनी दिनांक ११-१०-२००० या दिवशी लिहिलेला 'प्रहार' आम्ही वाचकांच्या माहितीकरिता पुनर्मुद्रित करीत  आहोत. तो वाचून आज १८ वर्षांपूर्वीसुद्धा पोहरे यांची भूमिका आणि विचार किती स्पष्ट होते याची वाचकांना  कल्पना येईल. - पुरवणी संयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तीप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तीप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता, की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती प