Posts

Showing posts from February, 2018
Image
प्रहार रविवार, दि.18 फेब्रुवारी   2018   शेतकऱ्यांनी कर्मयोगी बनावे!   शेतकऱ्यांनी आता बुद्धिवादी, कर्मवादी बनावे. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांबच राहावे, आपली शेती, आपला उद्योग, आपला धंदा आणि यातून चार पैसे कसे वाचतील याची हिकमत अवगत करावी, आणि तोच माल उत्पादित करावा ज्याची बाजारात मागणी आहे. त्यावर थोडी प्रक्रिया आणि पॅकिंग करून त्यापासून जास्त पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करावा. सप्ताह, पारायणे, कथा, किर्तने हे निव्वळ वेळ वाया घालविण्याचे उद्योग आहेत. त्या बुवा-बाबांच्या कमाईचा तो भाग आहे, त्यांचे खिसे आणि पोट भरण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वेळ आणि पैसा सार्थकी लावा. शेवटी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य तुमच्या कष्टावरच अवलंबून आहे, कोणताही देव आणि कोणतेही सरकार तुमच्या मदतीला धावून येणार नाही. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी मानली जाते. या सगळ्या संतमंडळींनी समाजाच्या प्रबोधनाचे काम केले आहे. भिक्तयोगासोबतच कर्मयोगाचाही त्यांनी तितक्याच हिरिरीने प्रचार आणि प्रसार केला. 'आधी प्रपंच करावा नेटका' असा संदेश देणाऱ्या
Image
प्रहार रविवार , दि .11 फेबु्रवारी 2018 बजेटच्या भोपळ्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावे ! नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांच्या हाती एक आभासी भोपळा दिला आहे . त्यातून काहीच साध्य होणार नाही . अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर दोनच पर्याय उरतात , त्यापैकी पहिला म्हणजे शेती विकून शहरात स्थायिक होणे , हा आहे . शेती विकून आलेल्या पैशाच्या व्याजावर शेतकरी आरामात चार घास सुखाने आयुष्यभर खाऊ शकतात . त्या व्याजातून मिळणारा पैसा आज शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा नक्कीच अधिक असेल . तसे करायचे नसेल आणि शेती सोडवत नसेल तर दुसरा पर्याय शेतीतला खर्च शक्य तितका कमी करून उत्पन्न वाढविणे हा आहे . रासायनिक शेतीने शेतीचे अर्थशास्त्रच उलटेपालटे करून टाकले आणि शेतकऱ्याला कर्जबाजारी केले , हे स्पष्टच आहे . त्या जाळ्यातून बाहेर निघायचे असेल तर शेतकऱ्यांनी अत्यल्प खर्चाच्या जैविक शेतीची कास धरायला हवी . सरकार काही करेल या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये . स्वत : च आपल्या शेतीच्या खर्चाचा योग्य