Posts

Showing posts from November, 2020

कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२० *कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्‍या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्‍यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे._     सध्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला *कोरोना नामक नव्या आतंकवादाने* अगदी झपाटून टाकले आहे. हा कोरोना कशामुळे होतो, माहीत नाही. म्हणजे कोरोनाबाधित

*'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२० *'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _मतदान यंत्रामुळे आता निकाल झटपट मिळतात, व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पार पडते, बोगस मतदान होत नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते, बुथ कॅप्चरिंग हा प्रकार आता जवळपास हद्दपार झाला, असे अनेक चांगले बदल निवडणूक आयोग दाखवू शकते किंवा सांगण्यासारखे असे अनेक मुद्दे निवडणूक आयोगाकडे आहेत, परंतु ही मतदान यंत्रे आणि नंतरची मतमोजणी निर्दोष असते का, यावर मात्र अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जातात. या मतदान यंत्रात हेराफेरी करता येते, असा अनेकांचा दावा आहे. निवडणूक आयोगाने (?) हे सगळे आक्षेप मागेच फेटाळून लावले आणि यापुढे निवडणुकांसाठी मतदान यंत्रेच वापरली जातील, असे ठामपणे सांगितले. याचा अर्थ निवडणूक आयोगाचे हे मत बदलत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया यंत्राद्वारेच पार पडणार आहे आणि ही यंत्रे कशी करामत दाखवतात, हे वारंवार दिसून आले आहे._       भारतात मतदान यंत्राच्या माध्यमातून घेण्यास सुरूवात

Golden Days In My Life..

दोस्तांनो ,,,  मागील 8 - 9 महिन्यात दोस्तांचा एक मस्त ग्रुप तयार झालाय ,,, सकाळी साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठणे, पाचला जॉगिंग, साडेपाच ते सात वाजेपर्यंत सूर्यनमस्कार ,योगासने आणि नंतर प्राणायाम ,,, तर कधी स्विमिंग ,,, नंतर गरमागरम काढा ,,,, संपूर्ण दोन अडीच तास तास कसे जातात कळतच नाहीत ,,, आणि सध्या मस्त गुलाबी थंडी सुरू आहे ,,,,  नंतर नाष्टा झाला की 9 ते 1 वाजेपर्यंत माझ्या शेतातील पेरूच्या बागेतील विविध कामे किंवा कधी काकडी तर कधी पिकलेले पेरू तोडतांना जॉब satisfaction चा जो आनंद मिळतो त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही एका किलो मध्ये दोन किंवा तीनच पेरू बसतात ,,, आणि पेरू व काकडीची चव तर अशी की तुम्ही खातच राहाल कारण 100% ऑरगॅनिक ,,, पेरू तोडता तोडता झाडाची कटिंग सुरू असते ,,, तसेच पेरू तोडतांना इयर फोन लावून महत्त्वाच्या विषयावर फोन सुद्धा चालू असतात ,,,, उन्हात काम करत असल्यामुळे विटामिन डी सुद्धा मिळते ,,,, म्हणजे 4 इन वन ,,,,  सकाळ कधी होते आणि रात्र कधी येते कळतच नाही आणि झोप ,,, अरे बेडवर पडल्यावर डोळे कधी बंद होतात कळतच नाही।  सगळे जग कोरोनाच्या भीतीने लॉक डाऊन मधे गलीत गात

कोरोनाच्या भयातून बाहेर पडा आपली बिघडलेली दिनचर्या पूर्वपदावर आणा ....

Image
*दीपावली* निमित्त आपणा सर्वांना *लक्ष लक्ष शुभेच्छा!*   * *हि दीपावली आपल्या जीवनात आनंद व सुखासमाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!*  * *निरोगी राहण्यासाठी विषमुक्त , भेसळमुक्त शेतमालाचा आग्रह धरा* ,,,,,,*  *हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिले भरल्यापेक्षा शेतकऱ्यांना थोडे अधिकचे पैसे देणे चांगले* *  *लवकर झोपा, लवकर उठा , योगासने व प्राणायाम करा, निरोगी रहा* *शुभेच्छुक:* *प्रकाश पोहरे* *किसान ब्रिगेड* 9822593921 2prakashpohare@gmail.com

जे दिल्लीत शक्य झाले ते मुंबईत का नाही !!

 ' प्रहार ' रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२० जे दिल्लीत शक्य झाले ते मुंबईत का नाही !! (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) मर्यादित उत्पन्न स्त्रोत असूनही दिल्लीत आम आदमीचे जगणे सुसह्य, सुखकारक होऊ शकते आणि प्रचंड उत्पन्न असूनही मुंबईकर जनतेला मात्र हाल सोसावे लागत असतील तर हे अंतर राज्यकर्त्यांमध्ये असलेल्या दुरदृष्टीच्या, इच्छाशक्तीच्या अभावाने पडत आहे. हा अभाव तेव्हाच निर्माण होतो जेव्हा राजकारण स्वार्थप्रेरित असते. राजकारण समाजहितासाठी होत असेल तर त्याचे स्वरूप कसे असू शकते, हे पाहायचे असेल तर तुम्ही दिल्लीत जा आणि राजकारण पैशाच्या दलदलीत फसले असेल तर सामान्य लोकांची कशी परवड होते हे पाहायचे असेल तर मुंबईत जा, असेच म्हणावे लागेल.   राजकारणाची नाळ सर्वसामान्यांच्या हिताशी जुळलेली नसणे ही एक खूप मोठी समस्या आहे आणि ती अगदी जागतिक आहे. जगभरातील काही मोजके अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देश सोडले तर बहुतेक देशांमध्ये राजकारण स्वार्थी वृत्तीने प्रेरित असल्याचे दिसते. देशाची सत्ता या राजकीय लोकांच्या हाती असते, कधी हा तर कधी तो पक्ष सत्तेत असतो,