Posts

Showing posts from April, 2017

शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा बुद्धिभेद! प्रहार रविवार, दि.30 एप्रिल 2017

Image
प्रहार रविवार , दि .30 एप्रिल 2017 शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा बुद्धिभेद ! लोकशाहीत सर्वाधिक ताकद मतांची आणि त्यातही एकगठ्ठा मतांची आहे . शेतकऱ्यांनी आता आपली अशी एकगठ्ठा मतांची ताकद उभी करावी . जोपर्यंत सत्तेत कोण येईल हे ठरविण्याचा अधिकार शेतकरी आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत त्यांची दुरवस्था संपणार नाही . शेतकऱ्यांच्या आत्महत्या , शेतकऱ्यांची कर्जमाफी , हमीभाव , सरकारी खरेदी यंत्रणेकडून शेतीमालाची खरेदी करण्यासाठी केली जाणारी टाळाटाळ , सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचे तर सध्या हे ट्रेन्डचे विषय आहेत , म्हणजे सर्वाधिक चर्चा , घुसळण याच विषयावर सुरू आहे . ही सगळी चर्चा होत असताना किंवा केली जात असताना एकूण समाजामध्ये अगदी उभी फूट पडल्याचे दिसते . ती फूट अर्थात आताच पडली असे नाही , अगदी देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजतागायत ही फूट पडलेली आहे . त्या फुटीला ` इंडिया ' विरुद्ध ` भारत ' असे स्वरूप प्राप्त झाले आहे . साधारण सुखवस्तू समजला जाणारा , म्हणजे ज्य