Posts

Showing posts from January, 2015

प्रहार, रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या!

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या! जे    लोक   सवलती   न   घेण्याइतके   आर्थिकदृष्ट्या   सक्षम   आहेत   त्यांनी   सवलती   घ्याव्यात   का   आणि सरकारनेही   त्यांना   त्या   द्याव्यात   का ,   हा   कळीचा   प्रश्न   आहे.   विशेषत:   सरकारी   तिजोरीची    अवस्था फारशी   चांगली   नसताना   सवलतींवर ,   सबसिडींवर   अशी   उधळपट्टी   करणे   सरकारला   कसे   परवडू शकते.   खरे   तर   ज्या   लोकांची   आर्थिक   परिस्थिती   चांगली   आहे   त्या   लोकांनी   स्वत:हून   पुढाकार   घेत या   सवलती   नाकारायला   हव्या.   लोकांना   स्वत:हूनच   हे   कळायला   हवे   आणि   त्यांना   तसे   कळत   नसेल तर   सरकारने   आपल्या   धोरणात ,   कायद्यात   बदल   करून   मदत ,   सवलत   खऱ्या   गरजवंतांनाच   मिळेल अशी   तरतूद   करायला   हवी. राज्यात सध्या दुष्काळाचे वातावरण आहे, अवेळी पाऊस, गारपीट यांमुळे शेतकऱ्यांच्या हाती येऊ पाहणारे पीक हातचे गेले आहे. नोकरदारांचे पगार एवढे वाढले आहेत, की राज्याची

प्रहार, रविवार, दि. 18 जानेवारी 2015 पोळीवर तूप ओढून घ्या;पण किती?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com     रविवार , दि. 18   जानेवारी 2015 पोळीवर तूप ओढून घ्या ; पण किती ? सरकारने कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या धोरणात आता आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे , कारण सरकारी कर्मचारी आणि इतर यांच्यातील भेदभाव आता ठळकपणे समोर येत आहे. खरेतर सरकारने सर्वांना समान न्याय आणि सर्वांना समान संधी या धोरणाचा स्वीकार करायला हवा आणि त्याची सुरुवात एका घरात एकालाच सरकारी नोकरी या निर्णयाने , तसेच पेन्शन बंद आणि निवृत्ती वय 50 वर आणूनच व्हायला हवी. मागच्या ' प्रहार ' मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सरकारकडून होत असलेले लाड या विषयावर भाष्य केले आणि अनेक लोकांनी , त्यात बरेचसे सरकारी कर्मचारीदेखील होते , आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत , हे प्रत्यक्ष भेटीतून , दूरध्वनीच्या माध्यमातून आणि ई-मेलद्वारे कळविले. सरकार सामान्य नागरिक आणि आपले कर्मचारी यांच्यात भेदभाव करते , ही तर वस्तुस्थिती आहेच. आ