Posts

Showing posts from July, 2014

प्रहार, रविवार, दि. 13 जुलै 2014 “ शेतकर्यांसाठी अच्छे दिन येतील का “?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com   रविवार, दि. 13 जुलै  2014     “  शेतकर्यांसाठी अच्छे दिन येतील का  “ ? सामान्य जनतेच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची आर्थिक नीती कशी असेल, यापुढच्या काळात देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे `अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींच्या राजवटीत कायमच `बुरे दिन'चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था सुधारेल की नाही, या प्रश्नांची थेट उत्तरे अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मिळत नसली, तरी जे संकेत त्यांनी दिले आहे ते पाहता कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा आहे आणि उद्याचा अधिक चांगला असेल, असे शेतकरी म्हणू शकतात. निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मनमोहन सरकारचे कृषी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. कदाचित शेतकऱ्यांना त्या आरोपात तथ्य वाटले असावे आणि म्हणूनच मोदींच्या हाती सत्ता सोपविण्याचा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने घेतला. त्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांच्य

प्रहार,रविवार, दि. 6 जुलै 2014 शेतकर्यांचा वाली कोण?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com      रविवार, दि. 6 जुलै  2014 शेतकर्यांचावाली कोण? महाराष्ट्र अभूतपूर्व दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मृग नक्षत्रापासून खरे तर पावसाला सुरुवात होते, याच नक्षत्रात सगळ्या पेरण्या पूर्ण होतात. सात जूनला हे नक्षत्र लागले, परंतु आता जवळपास महिना उलटून गेल्यावरही पावसाचा पत्ता नाही. हा लेख लिहित असताना तरी राज्यात कुठेही पाऊस झाल्याची बातमी आली नाही आणि पुढचे किमान आठ दिवस पाऊस येणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मोसमी पावसाने दिलेल्या या दणक्यामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला आहे. शेतीचे वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. मूंग, उडीद आता पेरण्यात अर्थ नाही आणि दुसरे काही पेरायचे, तर बियाण्यांची तरतूद होईलच याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांना अन्य पर्यायी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे, परंतु त्याबद्दल सरकार काहीच बोलायला तयार नाही. उशिरा येऊ घातलेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही, मार्गदर्शन मिळाले, तरी प्

प्रहार, रविवार, दि. 29 जून 2014 “ देशातील माणसे गेली कुठे? ”

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com   रविवार, दि. 29  जून  2014 “   देशातील माणसे गेली कुठे?  ” या देशात माणसे भरपूर आहेत , परंतु ती दिसत कुठेच नाहीत,अशी परिस्थिती आहे. शेतावर काम करताना कुणी दिसत नाही, कारखान्यात राबणारे मजूर दिसत नाहीत, घाम गाळून दाम कमाविण्याचीवृत्तीच या देशातून हद्दपार झाली आहे. सगळ्यांना सगळे काही फुकट हवे आहे आणि मायबापसरकार लोककल्याणकारी राज्याच्या नावाखाली बहुतेकांना फुकटात सगळे काही पुरविण्याचाअट्टहास बाळगत आहे. देशापुढे सध्या सर्वात मोठी समस्या कोणती असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर बेरोजगारी असे देता येईल आणि ते योग्यही आहे. जवळपास सव्वाशे कोटींचा हा देश आहे, खरे तर ही प्रचंड लोकसंख्या वरदान ठरू शकते, परंतु त्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते, ज्या दिशेने व्हायला हवे होते तसे ते झाले नाही. त्यामुळे एक प्रचंड मोठा विरोधाभास आपल्या देशात पाहायला मिळतो. बेरोजगारी ही मोठी समस्या असलेल्या या देशात अनेक उद्योजकांपुढे मजूर, कारागिर नसणे ही समस्या आहे, तर शेतात काम करायला माणसे मिळत नसल्याने शेत