Posts

Showing posts from February, 2015

प्रहार,रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2015 दिल्लीचा दणका भाजपसाठी इष्टापत्ती?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2015 दिल्लीचा दणका भाजपसाठी इष्टापत्ती ? भाजपने   दिल्लीचा   `सेफ्टी   व्हॉल्व्ह 'सारखा   वापर   केला.   लोकांचा   रोष   दिल्लीच्या   माध्यमातून   कमी करण्यात   भाजप   यशस्वी   झाला.   अर्थात   हा   एक   तर्क   आहे ,   परंतु   ज्या   पद्धतीने ,   ज्या   रणनीतीने भाजपने   दिल्ली   लढविली   ते   पाहता   या   तर्काला   नक्कीच   आधार   मिळतो.   पुढे   मोठी   झेप   घेण्यापूर्वी थोडी   माघार   घेण्यासारखा   हा   प्रकार   आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला. हा पराभव अनपेक्षित नव्हता; परंतु तो इतका दणदणीत असेल, असे वाटले नव्हते. आम आदमी पक्षाला चाळीसपर्यंत जागा मिळतील, असा सगळ्यांचाच अंदाज होता, कदाचित आम आदमी पक्षालाही तीच अपेक्षा होती; परंतु जो निकाल समोर आला तो सगळ्यांनाच हादरवून टाकणारा होता. वास्तविक दिल्लीत भाजपचे संघटन `आप'सह इतर कोणत्याही पक्षांपेक्षा अधिक चांगले आहे, शिवाय संघाचे नेटवर्कदेखील भाजपच्या दिमतीला असते. त्याच जोरावर आठ महि

प्रहार, रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2015 महागाई भत्ता वाढताच कसा?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि. 8 फेब्रुवारी  2015 महागाई भत्ता वाढताच कसा? तुम्ही तिकडे भीक मागा, परंतु आमचे खिसे भरा, ही कर्मचारी संघटनांची दांडगाईची भूमिका असते आणि प्रत्येक सरकार त्यांची ही दादागिरी सहन करत आले आहे, हे सरकारदेखील त्याला अपवाद ठरणार नाही. खरे तर बहुमत असलेल्या सरकारने ठाम भूमिका घेऊन समोर यायला हवे. मूळात महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क कसा ठरू शकतो, हाच प्रश्न आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गेल्या जुलैमध्ये सात टक्के महागाई भत्ता लागू केला, या सात टक्के भत्त्यासह एकूण भत्ता 107 टक्क्यांवर म्हणजेच मूळ पगाराच्या दुपटीपेक्षाही अधिक झाला. केंद्राने लागू केलेला हा सात टक्के महागाई भत्ता अजून राज्याने  लागू केला नाही म्हणून राज्य कर्मचारी ओरड करीत आहेत. आता पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होईल. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या करारानुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता लागू करणे भाग आहे, त्यामुळे आज नाही तर उद्या  राज्यालाही के

प्रहार,रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2015 विकास हवा,परंतु विषमता टाळून!

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com       रविवार , दि. 1 फेब्रुवारी   2015 विकास हवा , परंतु विषमता टाळून! शेती या देशाचा आर्थिक कणा आहे , त्यामुळे विकासाचे कोणतेही मॉडेल उभे करताना शेती आणि उद्योग , शेतकरी आणि उद्योजक यांच्यात योग्य समन्वय राखला जाणे अपेक्षित आहे. मोदींची मुख्यमंत्री म्हणून आधीची आणि पंतप्रधान म्हणून आताची कामगिरी पाहता मोदींना केवळ औद्योगिक विकासातच रस असल्याचे दिसते. रस्ते चकाचक करणे , शहरे चकाचक करणे यातच त्यांना स्वारस्य आहे ; परंतु खरा भारत खेड्यात राहतो , ही खेडी समृद्ध झाली नाही तर ` इंडिया ' समृद्ध होणार नाही , हे वास्तव त्यांनी लक्षात घ्यायला हवे. नरेंद्र मोदींनी विकासाचे आश्वासन देत देश काबीज केला. ` सबका साथ , सबका विकास ' ही त्यांची घोषणा लोकांनी उचलून धरली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही काँग्रेसेतर पक्षाला स्वबळावर केंद्रात स्थापन करता आली नव्हती , तो पराक्रम मोदींनी क