Posts

Showing posts from March, 2014

प्रहार,रविवार , दि. 9 मार्च, 2014,‘निवडणूक हि पिकनिकची संधी ठरू नये’

रविवार , दि. 9 मार्च , 2014 ‘ निवडणूक हि पिकनिकची संधी ठरू नये’ निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत सगळेच बोलत असतात , परंतु या सगळ्या सुधारणांचे मूळ असलेल्या अनिवार्य मतदानाबद्दल कुणी फारसे बोलत नाही.   मतदान अनिवार्य झाले , तर गठ्ठा मतांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या    राजकीय पक्षांची दुकानदारी बंद होईल आणि आजकाल सगळेच राजकीय पक्ष    या गठ्ठा मतांचेच राजकारण करीत असल्याने कोणताही राजकीय पक्ष अनिवार्य मतदानाच्या बाबतीत बोलताना दिसत नाही ; परंतु जोपर्यंत मतदान सक्तीचे होत नाही तोपर्यंत सगळ्या निवडणूक सुधारणा वांझोट्या ठरणार आहेत , भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा महापूर तसाच वाहत राहणार आहे , ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकणार नाही. आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच तब्बल नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान देशाच्या विविध भागांत ही निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर 16 मे रोजी मतमोजणी होऊन पुढच्या आठ-पंधरा दिवसांत नवी लोकसभा आणि नवे सरकार आकारास येईल. ही निवडणूक देशाच्या