Posts

Showing posts from April, 2021

हतबल मुख्यमंत्री आणि निर्ढावलेले प्रशासन...!

Image
‘प्रहार’ रविवार, दि. १८  एप्रिल २०२१ हतबल मुख्यमंत्री आणि निर्ढावलेले प्रशासन...!    (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  महाराष्ट्रातील कोरोना आता एक राजकीय आजार आणि हत्यार ठरू पाहत आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या आणि महाराष्ट्रात आपली सत्ता आणू पाहणार्‍या भाजपच्या खेळीला अननुभवी उद्धव ठाकरे सरकार बळी पडत आहे. तसे नसते तर या सरकारने लॉकडाऊन करीत जनतेत असंतोष निर्माण होऊ दिला नसता.     कोणत्याही कारणाने परिस्थिती बिघडली, सर्वसामान्यांना त्रास होऊ लागला की कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य असते की परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे. महाराष्ट्र सरकारला मात्र परिस्थिती पूर्वपदावर आणण्यापेक्षा चिघळविण्यातच अधिक रस दिसत आहे.      सध्या कोरोना काळात या सरकारकडे सगळ्या प्रश्नावर बंदी हेच एकमेव उत्तर आहे. त्यात सरकारमधील अंतर्गत कलहामुळे म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने हे सरकार प्रशासनावर मोठ्या प्रमाणात विसंबून असल्याचे दिसते.     यापूर्वीचे मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यमंत्री सुद्धा न होता थेट मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळापासून प्रश

टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!

Image
‘प्रहार’ रविवार, दि. ४  एप्रिल २०२१ टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!    (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  लोकांचे मनोधैर्य कायम राखायचे असेल, तर सरकारने सकारात्मक पाऊल उचलायला हवे. अनेक आजार केवळ मानसिक दौर्बल्यातूनही बळावत असतात. सध्या तर साधा खोकला, सर्दी, ताप असलेला माणूसही कोरोनाच्या धास्तीने अर्धमेला होत आहे. लोकांच्या मनातील ही भीती काढणे गरजेचे आहे, ही भीती काढण्याऐवजी छाती दडपणारे आकडे आणि कठोर टाळेबंदीच्या धमक्या देऊन सामान्य लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरच सरकार प्रहार करीत असल्याचे दिसते.       राज्यावर किंवा देशावर एखादे संकट कोसळले किंवा कोसळू पाहत असेल, तर राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य राज्यातील जनतेला धीर देणे, सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याबाबत लोकांना आश्वस्त करणे हेच असते; परंतु इथे सगळे उलटेच पाहायला मिळत आहे. दर दिवशी आकडेवारीचा बागूलबुवा उभा करीत आधीच भेदरलेल्या लोकांना अधिक घाबरविण्याचे काम सरकार करीत आहे. त्यात अजून भर घालीत निर्बंध, कठोर निर्बंध, मर्यादित टाळेबंदी, कठोर टाळेबंदी असे शब्दप्रयोग र