Posts

Showing posts from 2016

प्रहार 2016 मोदींची नोटबंदी आणि विरोधकांचे नक्राश्रू ! रविवार, दि.20 नोव्हेंबर

Image
दीर्घ कालावधीनंतर देशहितासाठी एखादा कठोर निर्णय घेऊन तितक्याच कठोरपणे तो   अंमलात आणणारा पंतप्रधान देशाला लाभला आहे . हा निर्णय चूक की बरोबर या प्रश्नाचे उत्तर काळच देईल , परंतु निर्णय घेतला जात आहे , सरकार काम करीत आहे हीच उपलब्धी खूप मोठी म्हणावी लागेल . शेवटी अपेक्षा हीच आहे की याच कठोरपणे आणि नियोजनबद्धपणे मोदींनी शेतकऱ्यांच्याही हिताचे निर्णय घ्यावे . कोण किती ओरड करीत आहे , याची पर्वा त्यांनी करू नये , कारण कोणते निर्णय देशहिताचे आहेत हे लोकांना चांगल्याप्रकारे कळते आणि अशा देशहिताच्या निर्णयासाठी विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहील . देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खूप मोठे आणि धाडसी पाऊल उचलत एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला . सकाळी पंतप्रधानांच्या मनात आले आणि त्यांनी संध्याकाळी या निर्णयाची घोषणा केली , असा काही हा प्रकार नव्हता . या सगळ्या प्रकारा