Posts

Showing posts from March, 2018
Image
प्रहार रविवार, दि.11 मार्च 2018 मोदी सरकारची चांगली सुरूवात...! भौतिक विकासाची गती वाढविणे आपल्या हाती आहे आणि त्यात सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेवटी देशातील साठ टक्के वर्ग विकासापासून वंचित राहत असेल तर देश प्रगत होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाची काळजी सरकारला प्राधान्याने घ्यावीच लागेल. तरच देश प्रगतिपथावर जाईल अन्यथा शेतकरी आत्महत्या करतच राहतील. आज मोदी सरकारने सध्या तरी घोषणांच्या माध्यमातून का होईना, तशी तयारी दर्शविली आहे. उद्या त्यांचे सरकार पुन्हा आले अथवा इतर कोणत्या पक्षाचे सरकार आले तरी ही प्रक्रिया थांबणार नाही, याची दक्षता घेतली जावी, हीच अपेक्षा आहे! विकास हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. अगदी सुरुवातीला एका अणुरूपात बंदिस्त असलेल्या सृष्टीचा महास्फोटानंतर निरंतर विकास होत गेला, आकाशगंगा, सूर्यमाला निर्माण झाल्या, त्यानंतर पृथ्वी आणि कदाचित पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवर जीवसृष्टी विकसित झाली, त्यातही आधी पाण्यात जीवसृष्टी जन्माला आली नंतर जमिनीवरचे जीव निर्माण झाले, हा सगळा विकासक्रम विज्ञान आपल्याला सांगतच असतो. अगदी आजचा मानवदे
Image
प्रहार रविवार, दि.4 मार्च 2018 संघर्षाला पर्याय नाही!     आपण आपल्या शेतीला काळी आई म्हणतो, तिची सेवा केल्याने येणारी समृद्धी चिरकाल टिकणारी ठरेल, तिला ओरबाडून शेवटी हाती काहीच लागणार नाही. आपली आई आपल्या लेकरांना कधीच उपाशी ठेवत नाही, तसेच शेतीचेही आहे, शेती आपल्याला कधीच मरू देणार नाही; परंतु कष्ट, संघर्ष, जिद्द आणि हे सगळे योग्य दिशेने जाणे गरजेचे आहे. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत. त्यातील काही खरोखरच अगदी जीवघेण्या स्वरूपाच्या आहेत; परंतु समस्या आहेत म्हणून हातपाय गाळून बसता येणार नाही. खरे तर समस्या कठीण नसत्या तर त्या समस्याच नसत्या, म्हणजे त्या कठीण आहेत म्हणूनच समस्या आहेत आणि एक गोष्ट माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी की प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच, कधी ते थोड्या प्रयत्नाने मिळते तर कधी त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; परंतु प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मनोवृत्ती बदलायला हवी. सगळ्यात आधी आपल्या समोरचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधावी. कुणी तरी मदतीला येईल, सरकार सा
Image
प्रहार रविवार, दि.25 फेब्रुवारी 2018 `कर्म-ज्ञान; सप्ताहाचे आयोजन करा...! चांगले विचार, चांगल्या कल्पना केवळ डोक्यात भरून चालत नाही, त्यावर अंमल होणे गरजेचे आहे. आज आपला शेतकरी मागे आहे, आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीत जीवन जगत आहे कारण आधुनिक जगाशी, आधुनिक विचारांशी त्याने जुळवून घेतलेले नाही. आजही रिकामा वेळ तो पुस्तक वाचण्याऐवजी टाळ कुटण्यात, पायदळ वारी करण्यात किंवा देव-देव करण्यात घालवतो. तुकाराम महाराज आज असते तर त्यांनी पुन्हा एकदा; बुडती हे जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येतसे; असेच म्हटले असते. माझ्या मागच्या ;प्रहारवर असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, ईमेलद्वारे तुम्ही खूप सुंदर विवेचन केल्याचे सांगितले. त्या सगळ्यांचे आभारच आहे; परंतु मला या कौतुकापेक्षा कृतिशीलता अधिक अपेक्षित आहे. एखादा विचार ऐकल्यावर, एखादे पुस्तक वाचल्यावर खूप सुंदर अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर पडते, ते त्या विचाराचे, पुस्तकाचे यश असले तरी ते खूप मर्यादित यश ठरते. अशा पुस्तकापासून, अशा विचारांपासून प्रेरणा घेऊन