Posts

Showing posts from August, 2016

प्रहार शेतकरी संघटनेशिवाय पर्याय नाही! रविवार, दि.28 ऑगस्ट 2016

Image
शेतकऱ्यांमध्ये एकी नाही , सरकारला नमवू शकेल असे संघटन नाही . हे संघटन उभे करावे लागेल . अंजनगावात त्याची सुरुवात झाली आहे , परंतु त्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे . संपूर्ण राज्यातला , देशातला शेतकरी एकाचवेळी पेटून उठला तर कोणत्याही सरकारची त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत होणार नाही . सत्तेत किंवा विरोधात असलेल्या राजकीय पक्षांची दुखती नस म्हणजे मतपेढी आहे . शेतकऱ्यांनी आपली अशी मतपेढी उभारली आणि ती एकसंध ठेवली तर हे सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासमोर गोंडा घोळतील . तीन टक्के कर्मचारी जे करू शकतात ते साठ टक्के शेतकरी का करू शकत नाही , याचे सोपे उत्तर शेतकरी संघटित नसणे हेच आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सरकारने घडवून आणलेले खून आहेत , सरकारी धोरणामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत , हा आरोप कुण्या त्रस्त शेतकऱ्याने केलेला नसून त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या आणि आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या देवेंद्र फडणविसांनी केला होता .