Posts

Showing posts from May, 2016

प्रहार रविवार, दि.29 मे 2016 बहुजन ऐक्यात दरार पाडण्यासाठी `सैराट' कारस्थान!

Image
ज्या समाजाने गावाच्या , राज्याच्या , देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले , बलिदान केले , त्याचे वर्णन कोणत्याही कलाकृतीतून पाहायला किंवा ऐकायला मिळत नाही . शिक्षणासारख्या क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती मोठे काम केले , हे महाराष्ट्रालाच काय उभ्या देशाला माहीत आहे . पंजाबराव देशमुखांचे योगदान नजरेआड कसे करता येईल ? परंतु मराठा समाजाचे हे सुधारणावादी , पुरोगामी रूप कधीच पुढे आणले जात नाही . गावचा पाटील म्हटला की तो मराठाच असणार आणि तो बदफैलीच असणार , रंगेल असणार , रगेल आणि नालायक असणार हे जणू काही ठरवून टाकण्यात आले आहे . इतर अनेक बाबतीत परंपरागत गृहितकांना छेद देणाऱ्या ' सैराट ' या चित्रपटाला या ठाशीव आणि घोटीव अपप्रचाराला मात्र छेद देता आला नाही .   सध्या राज्यात ' सैराट ' चित्रपटाने अगदी धूम माजवली आहे . उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत . ' सैराट ' च्या धुंदीत अवघा महाराष्ट्र झिंग झिंग झिंगाट झाल्याचे दिसत आहे . अर्थात