Posts

Showing posts from May, 2019
Image
प्रहार रविवार, दि.२६ मे २०१९ शेतकऱ्यांना `न्याय' कोण देणार...? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) कर्जमाफी हा प्रकार आर्थिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या चुकीचा असेल तर तो सगळ्यांच्याच बाबतीत चुकीचा असायला हवा. उद्योगांची हजारो कोटींची कर्जे पडद्याआड माफ करायची आणि शेतकऱ्यांना मात्र मोठ्या दातृत्वाचा आव आणीत काही हजारांची कर्जमाफी द्यायची, हा सरकारचा दोगलेपणा नाही का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ओरड करणाऱ्यांनी सरकारला याचा जाब विचारावा. आधी उद्योगपतींना कर्जमाफी देणे बंद करावे, शेतकऱ्यांकडून ज्या दंडेलीने कर्जवसुली केली जाते तशी ती उद्योगांकडून करावी, सगळ्यांना समान न्याय द्यावा आणि हे शक्य नसेल तर सरकारने आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात ओरडणाऱ्यांनी आपली तोंडे बंद करावीत.           शेतकऱ्यांची कर्जमाफी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अलीकडील काळात तर राजकीय पक्षांसाठी जणू काही हे एक चलनी नाणे झाले आहे. निवडणुका जवळ आल्या किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश वाढला, की हमखास उपयोगी पडणारे ब्रह्मास्त्र म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वापर केला जातो. या सततच्या
Image
प्रहार  - रविवार, दि.१९ मे २०१९ मराठी तरुण मागे का? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) `....तेव्हा मराठी तरुण कुठे असतात? सगळ्याच जाती- धर्माचे...??"; तर भरपूर मंथन केल्यावर याचे मला सापडलेले उत्तर आहे, की... मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन, क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मश्गूल असतात, नको तिथे उसळतात. सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मश्गूल असतात. मिरवणुका काढण्यात मश्गूल असतात. राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मश्गूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात. नाचायचे, मारामारी, फोडाफोडी करायची, दारू प्यायची, तंबाखू घोटायचा आणि "मी कुठला धंदा करू?"; याचा विचार करत बसायचे, यातच मराठी तरुण दिवस काढतो. सगळे सुतार किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम करणारे, हे उत्तरभारतीय/राजस्थानी आहेत. आणि सगळे चांगले कारागीरच आहेत. उत्तम फर्निचर बनवतात, प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत बनवतात. दिवसभर मेहनत करतात. 'सिंगल हजेरी'... म्हणजे सकाळी नऊ ते पाच- पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा 'डबल हजेरी'...
Image
प्रहार - रविवार, दि.१२ मे २०१९ कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळू नका! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) एका घराण्याने व्यक्तिगत सुट्टीसाठी सैन्याचा वापर केला हे गरळ ओकणे खरेतर मोदींना काहीच गरजेचे नव्हते. देशात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे बोलायला खूप विषय आहेत. खरेतर मोदींना हे त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि सल्लागारांनी सांगितले पाहिजे आणि मोदींनी ते ऐकायला हवे; मात्र जर समोरचा व्यक्ती हा आपल्या सांगण्याचा गैर अर्थ काढत असेल, तर मग समोरचा सुज्ञ मनुष्य गप्प राहणेच पसंत करतो आणि मोदींचे नेमके तेच झाले आहे...             देशामध्ये सध्या मागील जवळपास एक महिन्यापासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि आता त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. २३ मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि देशाला नवीन सरकार(बहुदा मोदी वगळून) मिळणार आहे. या निवडणुकांच्या गदारोळामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडाला आहे. कुणी काय बोलावे आणि कुठल्या विषयावर बोलावे याला काही धरबंद राहिलेला नाही. खरे म्हणजे पंचवीस-तीस वर्षांअगोदर देशात अशी परिस्थिती नव्हती. विर
Image
'प्रहार'  - रविवार, दि.५ मे २०१९ 'वाट' ,' वाटसरू' आणि ' वाटाडे' ! ( लेखक :  प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) पत्रकार युवराज नायर यांनी 'DDC youtube channel'करिता `देशोन्नती'चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांची 'बुद्ध धम्म'संदर्भात एक विस्तृत मुलाखत घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल केली. तिला उदंड प्रतिसाद  मिळाला. संपादक प्रकाश पोहरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले, तर काहींच्या भुवया वर गेल्या. या विषयावर  पोहरेंनी दिनांक ११-१०-२००० या दिवशी लिहिलेला 'प्रहार' आम्ही वाचकांच्या माहितीकरिता पुनर्मुद्रित करीत  आहोत. तो वाचून आज १८ वर्षांपूर्वीसुद्धा पोहरे यांची भूमिका आणि विचार किती स्पष्ट होते याची वाचकांना  कल्पना येईल. - पुरवणी संयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तीप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तीप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता, की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती प