Posts

Showing posts from September, 2017

शिवाजी शिक्षण संस्थेतील परिवर्तनाचे शिल्पकार !

Image

विकलांग विरोधी पक्षाला पर्याय काय ? पहार २४ सेप्टेंबर २०१७

Image
प्रहार    रविवार , दि . 24  सप्टेंबर   2017 विकलांग विरोधी पक्षाला पर्याय काय ? गंगा शुध्द होईल की नाही हे भविष्यात समजेल ; मात्र भाजपाने स्वत : ची गंगाजली शुध्द करून घेत स्वत : ला आर्थिकदृष्ट्या आणि पर्यायाने राजकीयदृष्ट्या समृध्द करून घेतले यात काही शंका नाही ; मात्र विरोधी पक्ष विकलांग झाल्यामुळे धोक्यात आलेली लोकशाही हाच खरा चिंतेचा विषय आहे ! भाजपच्या केंद्रातल्या सरकारचा साडे - तीन आणि राज्यातल्या सरकारचा तीन वर्षांचा कारभार पाहिला तर ' अच्छे दिन ' हे केवळ स्वप्नच ठरले असल्याचे स्पष्टच दिसत आहे . महागाई कमी झालेली नाहीच , शिवाय कृषी उत्पादनाच्या महागाईचा ज्यांना थेट फायदा व्हायला हवा त्या शेतकऱ्यांच्या पदरातही काही पडताना दिसत नाही . शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत , कर्जमाफीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना अक्षरश : बनवत आहे . खरे तर या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे . सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यां