Posts

Showing posts from August, 2017

शेतकरीच शेतकऱ्यांच्या दुर्दशेला जबाबदार! प्रहार रविवार, दि.13 ऑगस्ट 2017

Image
प्रहार रविवार , दि .13 ऑगस्ट 2017 शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत आहे . त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही , विजेचा प्रश्न आहे , सिंचनाचा प्रश्न आहे , बाजारातील पिळवणुकीचा प्रश्न आहे , पीक विम्याचा प्रश्न आहे , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमाल मातीमोल विकल्या परिणामी झालेल्या कर्जापासून मुक्तता म्हणजेच सातबारा कोरा करणे असो , असे शेकडो प्रश्न आहेत आणि या सगळ्यांसाठी सरकारची धोरणे कारणीभूत आहे . लढायचे आहे ते हा अन्याय दूर करण्यासाठीच . आपला लढा सरकारच्या विरोधात नसून सरकारच्या धोरणांच्या विरोधात आहे , हे वारंवार स्पष्ट केले आहे . आणि त्यासाठीच अहिंसक , शांततामय आंदोलनाची हाक आम्ही दिली आहे . ` सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जे करील तयांचे ' असे एक संतवचन आहे . या जगात सहज किंवा बसल्या जागेवर   आणि मागितल्याशिवाय कुणालाही काहीही मिळत नाही आणि त्यात आपल्याला जे काही मिळवायचे ते आपल्यापेक्षा शक्तीशाली घटकांशी लढवून मिळवायचे असेल तर जीव