Posts

Showing posts from January, 2017

आता तरी शेतकऱ्यांनी नाक दाबावे...! प्रहार रविवार, दि.29 जानेवारी 2017

Image
प्रहार रविवार , दि .29 जानेवारी 2017          आता तरी शेतकऱ्यांनी नाक दाबावे ...! इतर कोणतेही काम करून शेतकरी पैसा मिळवू शकतो , मुळात तो कष्टकरी आहे , त्यामुळे त्याच्यासाठी पोटापुरते पैसे कमविणे जड जाणार नाही . सांगायचे तात्पर्य शेतकऱ्यांनी आता एकदा सरकारचे , पांढरपेशा समाजाचे नाक दाबावेच म्हणजे या लोकांना शेतकऱ्यांची खरी किंमत कळेल आणि शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचे पातक ते करणार नाहीत . सरकारच्या शेती आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला , हे तर सत्यच आहे , परंतु दोष केवळ सरकारचाच नाही . समाजातील इतर घटक , विशेषत : बहुबोला मध्यमवर्गीय घटक जो उत्पन्नासाठी थेेट शेतीवर अवलंबून नाही त्यानेही शेतकऱ्यांच्या शोषणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावलेलाच आहे . काही दिवसांपूर्वी एका परिचिताने एक पोस्ट मला पाठविली . त्यात त्याने सांगितले , की एका शेतकऱ्याने एक टेम्पो भरून टमाटे बाजारात विकण्यासाठी आणले ; परंतु बाजारात आल्यावर त्याला जो भाव मिळत होता त्यातून त्याचा