Posts

Showing posts from May, 2014

प्रहार, रविवार, दि. 18 मे 2014 ‘कॉंग्रेसच्या निष्क्रियतेला शेतकर्यांचा आणि उद्योजकांचा दणका......’

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि.18 मे  2014 ‘कॉंग्रेसच्या निष्क्रियतेला शेतकर्यांचा आणि उद्योजकांचा दणका......’ एकीकडेपक्षातील आव्हानांना तोंड देतानाच मोदींना त्यांनी स्वत:बद्दल ज्या प्रचंड अपेक्षानिर्माण करून ठेवल्या त्यांची पूर्तता करण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. मोदींनामिळालेले यश विदेशी कपन्यांना धार्जिण अशा एका निष्क्रिय सरकारच्या विरोधातील देशांतर्गतअसलेल्या उद्योजकांची प्रतिक्रिया आहे. लोकांमध्ये तात्पूरता हाईप निर्माण करण्याचेकाम यापूर्वी अण्णा हजारे , अरविंद केजरीवाल सारख्यांनी केले होते, पुढे त्यांचे काय झाले, याचे भान मोदींना बाळगावेच लागणारआहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेली निवडणूक प्रक्रिया म्हणून यावेळच्या निवडणुकीचा उल्लेख करता येईल. 7 एप्रिल ते 12 मे या जवळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत एकूण नऊ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. दीर्घकाळ रेंगाळलेल्या या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला. समोर आलेला निकाल बराचसा अपेक्षित आणि काहीसा अनपेक्षित असा म्हणता येईल. काँग्रेसचे सरका

प्रहार,रविवार, दि. 11 मे 2014 लाचार सरकार, मुजोर नोकरशाही....

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 11  मे  2014 लाचारसरकार, मुजोर नोकरशाही.... केंद्रीय पातळीवर नोकरशहांची संघटना इतकी मजबूत आहे आणि त्यांची दादागिरी इतकीप्रचंड आहे ,की मोदींसारख्या कणखर नेत्यालाही ते वाकवू शकतील. ही दादागिरी मोडूनकाढायला हवी, जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठीच खर्च व्हायला हवा,हे करून दाखविण्याची हिंमत असणारे सरकार ज्या दिवशी दिल्लीत स्थापन होईलतोच दिवस खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल. सध्यातरी ब्रिटिशकालीनमुजोर मानसिकतेची मजबूत नोकरशाहीच या देशाचा कारभार चालवत आहे. आपले पगार, आपले भत्ते ते मनमानी वाढवून घेत आहेत आणि जबाबदारीच्या नावावर मात्र शिमगाआहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दहा टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. केंद्र सरकारने या आधीच हा भत्ता वाढवून दिला होता, आता राज्यानेही तसा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही वाढ पूर्वलक्षी प्रभावानुसार अर्थात 1 जानेवारी 2014 पासून लागू होत आहे. या वाढीमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच

प्रहार, रविवार, दि. 27 एप्रिल 2014 ‘ दीड लाख कोटीचा लोकशाहीचा बाजार ’

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार , दि. 27 एप्रिल 2014 ‘ दीड लाख कोटीचा लोकशाहीचा बाजार ’ मतदानकेले नाही ,तर कुठलीही सुविधा मिळणार नाही म्हटल्यावर लोक बरोबर वेळात वेळ काढूनमतदानासाठी येतील, फक्त कायद्याने ही सक्ती व्हायला हवी. एकदाका मतदान करावेच लागते, हे समजल्यावर मग मत कुणाला द्यायचे याचाविचार आपोआप लोक करायला लागतील. शंभर टक्के मतदार विचारपूर्वक मतदान करायला लागले,की खोट्या, फसव्या, आमिषदाखविणाऱ्या जाहिरातबाजी आपोआप बंद होतील, प्रचारातील मुद्देअधिक वस्तुनिष्ठ होतील, प्रचारातून जाती, धर्म इतर भेद हद्दपार होतील आणि अर्थातच काळ्या पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचेप्रकारही आपोआप थांबतील. भारत हा एक गरीब देश आहे. विकसनशील वगैरे गोंडस नावाखाली आपण आपले दारिद्र्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला, तरी त्याने वस्तुस्थितीत फरक पडत नाही. देशातील 80 टक्के लोकसंख्या आजही दारिद्र्यरेषेखाली किंवा दारिद्र्यरेषेच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून उपलब्ध पैशाचा उत्पादक बाबींसाठी, रोजगार   निर्मितीसाठी

प्रहार, रविवार, दि. 20 एप्रिल 2014 ‘ थांबलेली प्रगती आणि हताश तरुणाई ‘

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 20 एप्रिल 2014 ‘ थांबलेली प्रगती आणि हताश तरुणाई ‘ हा   देश   वाचवायचा   असेल ,   प्रगतीच्या   वाटेवर   पुढे   न्यायचा   असेल   तर   हा   देश   काँग्रेसमुक्त   झाला   पाहिजे   अशी   बहुतेक   अनिवासी   भारतीयांची   इच्छा   आहे.   भ्रष्टाचार ,   पैशाचा   अपव्यय ,   प्रगतीत   अडथळे   किंवा   स्पीड   ब्रेकर   या   सगळ्यासाठी   आज   काँग्रेस   हा   एकच   पर्यायी   शब्द   आहे ,   त्यामुळे   हा   देश   जोपर्यंत   काँग्रेसच्या   मगरमिठीतून   सुटत   नाही   तोपर्यंत   देशाचा   विकास   शक्य   नाही ,   तोपर्यंत   इथली   तरुणाई ,   इथल्या   तरुणाईचा   जोश   असाच   कुजत   राहील   किंवा   विदेशात   आपल्या   प्रगतीच्या   वाटा   शोधत   राहील. सैन्य पोटावर चालते, अशी एक म्हण आहे, त्याच धर्तीवर कोणताही देश त्या देशातील तरुणांच्या ताकदीवर चालतो, प्रगती करतो असे म्हणता येईल. त्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास आज भारताकडे असलेली तरुणाईची ताकद बघता भारत सर्वात प्रगत देश व्हायला हवा होता; परंतु स्वा