Posts

Showing posts from October, 2014

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक! आज   भाजपजवळ मोदींसारखा चेहरा आहे, वैचारिक नेतृत्वाची फळीआहे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे संघासारख्या देशव्यापी संघटनेचे पाठबळ आहे. त्या तुलनेतसेनेकडे काहीच नाही.  सेनेच्या तुलनेत राज्यात भाजपची ताकद जास्त आहे, हा भाजपचादावा या निवडणुकीने सिद्ध केला आणि महाराष्ट्र आमचाच, महाराष्ट्रातआमचीच सत्ता, आमचाच मुख्यमंत्री असा बिनबुडाचा दर्प बाळगणाऱ्यासेनेची औकात तसेच कुवत या निवडणुकीने दाखवून दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि कोण किती पाण्यात आहे, या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाचे उत्तर एकदाचे मिळाले. गेली पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते, त्यामुळे प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका या आघाडीला बसणे क्रमप्राप्त होते, तसा तो बसलादेखील, परंतु मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. वास्तविक सेना-भाजप युतीसाठी राज्यातील वातावरण खूपच अनुकूल होते. युती कायम राहिली असती तर क

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com  रविवार, दि.19  ऑक्टोबर 2014 “ लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे ” आजकालमतदार आपल्या हक्काप्रती जागरूक झालेला दिसतो. विशेषत: तरुण मतदार अधिक सुजाण झालाआहे. या लोकांना आपला आमदार-खासदार काय करतो , कोणत्या विकासाच्या योजना आपल्या मतदारसंघातयेऊ शकतात, त्यादृष्टीने काय प्रयत्न केले जात आहेत, मतदारसंघातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आपले प्रतिनिधी नेमके कोणते प्रयत्नकरीत आहेत, त्यात काय अडचणी आहेत या सगळ्याबद्दल मतदार जागरूकझालेले दिसतात. त्यामुळे लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद निर्माण होणे गरजेचेआहे. राज्याच्याविधानसभा निवडणुका पार पडल्या. हा लेख तुम्ही वाचत असाल तेव्हा साधारण राज्याच्या विधानसभेचेचित्र स्पष्ट होत असेल,कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कुणाची सत्तायेणार, सत्ता एका पक्षाची असेल की पुन्हा युती, आघाडीचे सरकार राज्याच्या नशिबी येईल अशा अनेक प्रश्नांची उकल झालेली असेल.तत्पूर्वी लोकसभा निवडणूक झाली. देशातील जनतेने केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आणण्याचानिर्धार केला आणि

प्रहार, रविवार, दि. 12 ऑक्टोबर 2014 “वापरा आणि फेका “ सूत्र सगळीकडेच !

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि. 12  ऑक्टोबर 2014 “ वापरा आणि फेका  “  सूत्र सगळीकडेच ! आजअत्यंत स्वार्थी ,आत्मकेंद्री अशी `वापरा आणि फेकून द्या'ही प्रवृत्ती सगळ्याच क्षेत्रांत बोकाळल्यामुळे एकूणच सामाजिक मूल्यढासळत चालल्याचे दिसते. त्याचा दूरगामी परिणाम समाज, गाव,देश या व्यापक संकल्पनांवर होण्याची भीती आहे आणि हे एक मोठे संकट म्हणावेलागेल. दल हा मानवी जीवनाचा आणि एकूणच निसर्गचक्राचा एक अविभाज्य घटक आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे जसे निसर्गात बदल होताना दिसतात तसेच ते मानवी जीवनातही होताना दिसतात. बदल मुख्यत्वे भौतिक स्वरूपाचे आणि बाह्यकेंद्री असले, तरी त्याचा परिणाम मानवी स्वभावावर होणे अपरिहार्य असते आणि त्यामुळे या बदलाच्या अनुषंगाने माणसाचा स्वभाव, विचार आणि एकूणच जीवनशैली बदलत असल्याचे आढळून येते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केला, तर किती प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत, हे सहज लक्षात येईल.   पूर्वी बँकांचा कारभार म्हटला, की ते मोठ मोठे ले

प्रहार, रविवार, दि. 5 ऑक्टोबर 2014 `मिड् डे मील्' ऐवजी `मिड् डे मिल्क्' मोदी करतील काय?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com  रविवार, दि. 5 ऑक्टोबर  2014 `मिड् डे मील्' ऐवजी `मिड् डे मिल्क्'मोदी करतील काय?     नरेंद्र मोदी आपल्या कल्पक योजनांसाठीप्रसिद्ध आहेत. स्वच्छतेची आणि स्वच्छ कारभाराची त्यांना आवड आहे. मी स्वत: खात नाहीआणि कुणाला खाऊ देत नाही, हे त्यांचे ब्रिद वाक्य आहे. त्यामुळेत्यांनी मध्यान्ह भोजन योजनेतून होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावे आणि ही योजनाअधिक पारदर्शक तसेच परिणामी होण्यासाठी मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बेचवखिचडीऐवजी त्यांना सकस दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देण्याचा निर्णय किमान प्रायोगिक तत्त्वावरतरी घ्यावा.      सध्या संपूर्ण देशात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना राबविली जात आहे. योजनेचे स्वरूप आणि हेतू चांगला असला, तरी ती ज्या पद्धतीने राबविली जात आहे ती पाहता त्यातून शेवटी काहीही साध्य होणार नाही, हे स्पष्टच दिसत आहे. विद्यार्थ्यांना योग्य तो पोषक आहार मिळावा आणि गरीब घरातील मुलांना केवळ पोट भरण्यासाठी मजुरीवर जाण्याची पाळी येऊ  नये, हा

प्रहार, रविवार, दि. 21 सप्टेंबर 2014 ‘ जिओ थर्मल' उपलब्ध असतानाही ऊर्जा संकट केवळ भ्रष्टाचारामुळेच! ‘

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com    रविवार, दि. 21 सप्टेंबर 2014 ‘  जिओ थर्मल' उपलब्ध असतानाही ऊर्जा संकट केवळ भ्रष्टाचारामुळेच!  ‘ जगातील बहुतेक पुढारलेले देश अशा नव्या पर्यायांचा सढळपणे वापर करीत असताना आपण मात्र त्याच त्या पारंपरिक साधनांच्या साहाय्यानेे देशाची वाट लावण्यावर का ठाम आहोत, या प्रश्नाचे उत्तर केवळ आकंठ भ्रष्टाचारात बुडालेली नोकरशाही आणि त्यांनी हाताशी धरलेले सत्तेचे दलाल, हेच देता येईल. हे सर्व बदलायचे असेल तर जागरूक युवाशक्तीच्या जनमताचा रेटाच यामध्ये बदल करू शकतो. देशातील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि यापुढे ती अधिक गतीने वाढणार आहे. ही वाढती गरज भागविण्यासाठी सध्याचे वीजनिर्मिती प्रकल्प पुरेसे ठरणार नाही आणि त्यांची क्षमता वाढविणेदेखील शक्य होणार नाही. त्यामुळेच नव्या वीज प्रकल्पांचा घाट घातल्या जात आहे. त्यातही आण्विक ऊर्जेवर आधारित वीज प्रकल्पांसाठी अधिक हट्ट धरल्या जात आहे. वास्तविक अणू इंधनावर आधारित वीज प्रकल्प म्हणजे एक प्रचंड मोठी जोखीम असते. मानवी चुकीमुळे किंवा नैसर्गिक आघात

प्रहार, रविवार, दि. 14 सप्टेंबर 2014 ‘ कायदे बदलायला हवेत ’

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 14 सप्टेंबर 2014 ‘ कायदे बदलायला हवेत ’ कायदेहे परिस्थिती सापेक्ष आणि व्यवहार्य विचारांवर आधारित असावेत , आपल्याकडे तसे होत नाही. कायदेकरणाऱ्यांना `ग्राऊंड रिअॅलिटी'ची जाणीवनसते आणि त्यामुळे या कायद्याच्या कचाट्यात शेतकरी आणि इतर सामान्य लोक विनाकारण भरडलेजातात. सद्यस्थितीत भारतातील प्रमुख उद्योग म्हणून ओळखला जाणारा शेतीव्यवसाय हा सर्वच बाबतीत शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला आहे. नैसर्गिक आपत्ती तर त्याच्या पाचवीलाच पूजली आहे, त्यात सरकारी धोरणामुळे त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. आयात-निर्याती संबंधीचे सरकारी धोरण कायमच शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असते. सध्या याच संदर्भात कांद्याचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. कांद्याचे देशांतर्गत उत्पादन चांगले होऊनही सरकार कांद्याच्या निर्यातीला परवानगी देत नाही, उलट कांद्याची आयात मात्र सुरू आहे. त्यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत आणि त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. प्रत्येक पिकाच्या बाबतीत हेच होताना दिसते. सर

प्रहार, प्रहार, रविवार, दि. 7 सप्टेंबर 2014 ‘ धार्मिक अतिक्रमण म्हणजे जिवंत अॅटमबॉम्बच ‘

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com  प्रहार,रविवार, दि. 7 सप्टेंबर  2014 ‘ धार्मिक अतिक्रमण म्हणजे जिवंत अॅटमबॉम्बच ‘ या   देशात   इतर   कुठल्याही   प्रश्नावर   लोक   आक्रमक   होणार   नाहीत ,   परंतु   धार्मिक   श्रद्धेचा   विषय   असला , की   लगेच   लोक   रस्त्यावर   उतरतात ,   त्यांच्या   भावना   क्षुब्ध   होतात ,   दंगली   केल्या   जातात ,   लोकांच्या याच   मानसिकतेचा   गैरफायदा   घेत   सुपीक   डोके   असलेले   लोक   धार्मिक   स्थळांच्या   माध्यमातून आपल्या   दुकानदाऱ्या   चालवित   असतात.   त्यांना   माहीत   असते ,   की   धार्मिक   स्थळे   म्हणजे   जिवंत अॅटमबॉम्ब   आहेत ,   त्याची   पिन   काढण्याचे ,   त्याला   धक्का   पोहचविण्याचे   धाडस   कुणी   करणार   नाही. आज   भारतातील   जवळपास   प्रत्येक   शहरात   प्रत्येक   मोठ्या   रस्त्यावर   कुठे   ना   कुठे   असे   अतिक्रमण दिसून   येते   आणि   त्याला   हात   लावण्याची   हिंमत   कुणी   दाखवित   नाही. सध्या अनेक शहरांत अतिक्रमण हटाव मोहीम अगदी जोरात सुरू आहे. अकोल्यातही ही म