Posts

Showing posts from June, 2017

समृद्धी नेमकी कुणाची? प्रहार रविवार, दि. 25 जून 2017

Image
                                     प्रहार रविवार , दि . 25 जून   2017       आज नागपूर - मुंबई असा पूर्व - पश्चिम महामार्ग बांधल्या जात आहे , उद्या उत्तर - दक्षिण अशा मार्गाची टूम निघू शकते . रस्ते तसेच इतर मोठमोठे प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली शेतजमिनी नष्ट करण्याचा घाट घातल्या जात आहे , शिवाय अशा प्रकल्पांतून होणारा भ्रष्टाचार हादेखील एक विषय आहेच . चाळीस हजार कोटींचा प्रकल्प म्हटल्यावर त्यातील दहा टक्के म्हणजे चार हजार कोटी खालपासून वरपर्यंत वाटल्या गेले असतील . हा खर्च संबंधित कंपनी कामाच्या दर्जात तडजोड करून भरून काढते . एकूण काय तर एकमेकांची पोटे भरण्यासाठी असे सगळे उद्योग चाललेले असतात . समृद्धी यांच्या घरात जाते आणि भिकेला लागतात ते सामान्य शेतकरी !    सध्या राज्यभरात शेतकऱ्यांचा उद्रेक दिसून येत आहे . कर्जमाफी , शेतमालाला योग्य भाव या नेहमीच्या मागणीसोबतच यावेळी सरकारच्या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला विरोध हेदेखील शेतकऱ्यांच्या असंतोषाचे एक कारण आहे . हा समृद्धी