Posts

Showing posts from June, 2014

प्रहार, रविवार, दि. 15 जून 2014 शेतकरी आत्महत्यांची सुपारी घेतलिका ????

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com      रविवार, दि.15  जून  2014 शेतकरीआत्महत्यांची सुपारी घेतलिका ???? लोकसभा निवडणुकीत जबर दणका बसल्यावरही राज्यातील आघाडी सरकारला कुठलीही जाग आल्याचे चित्र दिसत नाही. अर्थात अशी जाग येण्यासाठी सरकार जिवंत असायला हवे, सरकारमध्ये संवेदनशीलता असायला हवी. सतत पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आघाडीला एकप्रकारची गुर्मी चढली आहे. आपण काहीही केले तरी जाब विचारणारा कुणी नाही, कसाही कारभार केला तरी शेवटी जातीपातीची गणिते आपल्यालाच साथ देतात आणि आपली सत्ता अबाधित राहते, या भ्रमात आघाडी सध्या वावरत आहे. सामान्य जनता चिडली म्हणजे ही सगळी गणिते कोलमडून पडतात, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले; परंतु त्यातून शहाणपण घ्यायला आघाडी सरकार तयार दिसत नाही.  लोकसभेत मोदींची लाट होती, विधानसभेत ती असणार नाही, त्यामुळे सत्तासुंदरी पुन्हा आपल्यालाच वरमाला घालेल, असा जबर, परंतु फुकाचा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे. या राज्यात शेतकऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या किमान 60 टक्के आहे, हा शेतकरीच कोणत्य

प्रहार, रविवार, दि. 1 जून 2014 “शिक्षण आणि शिक्षणाचेहि अपग्रेडेशन गरजेचे”

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com   रविवार ,   दि.   1    जून    2014 “ शिक्षण आणि शिक्षणाचेहि अपग्रेडेशन गरजेचे ” जेलोक अगदीच गरीब ,हातावर पोट असणारे आहेत त्यांना सरकारी शाळांशिवाय पर्याय नाही;परंतु सरकारी शाळांची आजची अवस्था पाहता सरकारने या शाळांच्या माध्यमातूनगरिबांच्या शिक्षणाची चेष्टाच मांडलेली दिसते. शिक्षणाच्या कुठल्याही आधुनिक सोडा,अगदी प्राथमिकही सुविधा नाही, इंग्रजीचा गंध नाही,संगणक तर दूरूनही दिसत नाही. इमारतींची अवस्था तर अशी आहे, की शाळेपेक्षा जनावरांचा गोठा असल्याचा भास व्हावा. अशा शाळेतून शिक्षण देणाऱ्याशिक्षकांचे पगार तेवढे वाढले; परंतु त्यांच्या ज्ञानाच्या कक्षारूंदावल्या नाहीत. मे-जून महिना उजाडला, की वर्तमानपत्रात मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची घसरणारी पटसंख्या, अतिरिक्त ठरू पाहणारे शिक्षक, मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली भटकंती, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्याने बंद पडू पाहणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळा, जिल्हा परिषद- महापालिका सारख्या स्थानिक स्वराज्य

प्रहार, रविवार 25 मे 2014 ‘धोरणलकता... राज्यातील आघाडी सरकारचाही ठरणार???’

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com   रविवार   25  मे  2014 ‘धोरणलकता...राज्यातील आघाडी सरकारचाही ठरणार???’ महाराष्ट्रसरकारच्या निष्क्रिय आणि धोरणलकव्याने ग्रस्त कारभाराच्या विरोधात मतदारांनी एकदा रोषव्यक्त केला आहे ,याचा अर्थ पुन्हा तो रोष व्यक्त होणार नाही, असाहोत नाही. जुने दाखले देऊन काँग्रेसचे काही नेते विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधातमतदान होणार नाही, असे आज सांगत असले, तरीलोकांना गृहीत धरण्याचे आणि मूर्ख समजण्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. नेतृत्व आणि धोरण बदलण्याची महाराष्ट्रातीलकाँग्रेस आघाडी सरकारने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर लोकसभेतजे झाले तेच विधानसभेतही होण्याची दाट शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या त्सुनामीत केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार पार ध्वस्त झाले. हा तडाखा इतका जबर होता, की राज्याराज्यांत त्याचे पडसाद उमटले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आसामचे मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. इकडे महाराष्ट्रातही मोदींच्या त्सुनामीने काँग्रेस आघाडी सरकार पार हा